15 November 2024 2:53 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअरबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून रेटिंग अपडेट - NSE: SUZLON IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागणार, ग्रे-मार्केटमधून फायद्याचे संकेत - GMP IPO Horoscope Today | रखडलेली कामे पूर्ण होतील, आजचा दिवस 'या' राशींसाठी अत्यंत खास, आजचे राशीभविष्य काय सांगते पहा Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर रॉकेट होणार, फायद्याचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रेटिंग अपग्रेड, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट, कमाईची मोठी संधी - NSE: HAL Vedanta Share Price | वेदांता कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, मालामाल करणार शेअर - NSE: VEDL
x

आम्ही तिघांनाच राजे मानतो | पुतळे जाळलेत तरी आमची भूमिका बदलणार नाही

Vanchit Bahujan Aghadi, Prakash Ambedkar, Udayanraje Bhonsale, MP Chhtrapati Sambhajiraje

मुंबई, १० ऑक्टोबर : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी काढण्यात येणाऱ्या मराठा समाजाच्या मोर्चाला वंचित बहुजन आघाडीनं पाठिंबा जाहीर केला होता. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पुण्यात याची घोषणा केली होती. ही घोषणा करतानाच प्रकाश आंबेडकर यांनी छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यावर टीका केली. उदयनराजे यांचा नामोल्लेख टाळत “एक राजा बिनडोक आहे,” असं आंबेडकर म्हणाले.

मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी दोन्ही राजाने नेतृत्व करावे, अशी मागणी होत होती. त्या प्रश्नावर प्रकाश आंबेडकर यांनी भूमिका मांडली. “दोन्ही राजांचा बंदला पाठिंबा आहे, कुठे वाचनात आलं नाही. एक राजा तर बिनडोक असल्याचे मी म्हणेन, तर दुसरे संभाजी राजे यांनी आरक्षणाबद्दल घेतलेली भूमिका बरोबर आहे. पण ते आरक्षणापेक्षा इतर गोष्टींवर अधिकभर देत असल्याचं मला दिसतंय असं ते म्हणाले होते.

तसेच आम्हाला आरक्षण मिळाले नाही तर इतरांचे रद्द करा, असे म्हणणे चुकीचे आहे. ही मागणी करणारा राजा बिनडोक आहे. राज्यघटना कळत नसताना त्यांना भाजपाने राज्यसभेवर कसे पाठवले, असा सवाल उपस्थित करत वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी नाव न घेता खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यावर निशाणा साधल्याने उदयनराजेंच्या समर्थकांनी प्रकाश आंबेडकरांवर टीकास्त्र सोडलं होतं.

आता त्यालाच प्रकाश आंबेडकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. प्रकाश आंबेडकर ट्विट करत म्हणाले की, राजे सम्राट अशोक,छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शाहू महाराज या तिघांनाच आम्ही राजे मानतो. वंचित बहुजन आघाडीने घेतलेली भूमिका मराठा आरक्षणाच्या बाजूची आहे. पुतळे जाळा, काहीही केले तरी आम्ही आमची भूमिका व पक्षाची भूमिका बदलणार नाहीत. ही भूमिका वैचारिक आहे,आणि ती कायम राहील, असं प्रकाश आंबेडकरांनी सांगितले आहे.

 

News English Summary: Prakash Ambedkar tweeted, “We consider King Samrat Ashoka, Chhatrapati Shivaji Maharaj and Chhatrapati Shahu Maharaj as kings.” The role played by the deprived Bahujan Alliance is in favor of Maratha reservation. Burn the statues, no matter what we do, we will not change our role and the role of the party. This role is ideological, and it will continue, said Prakash Ambedkar.

News English Title: We consider only three as kings said president of the Vanchit Bahujan Aghadi Prakash Ambedkar Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#Prakash Ambedkar(119)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x