22 January 2025 10:27 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, खात्यात जमा होणार 1,56,81,573 रुपये, पगाराप्रमाणे रक्कम जाणून घ्या HDFC Mutual Fund | श्रीमंत करणारी HDFC म्युच्युअल फंडाची योजना, मिळेल तगडा परतावा, इथे पैसा वेगाने वाढतो SBI Mutual Fund | नोकरदारांनो बँक FD विसरा, 'या' म्युच्युअल फंड योजना 31 टक्केपर्यंत परतावा देत पैशाने पैसा वाढवतील Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, स्टॉक BUY करावा का - NSE: TATASTEEL Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप कंपनीच्या नफ्यात घट, तरीही ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: TATATECH Penny Stocks | प्राईस 88 पैसे, एका वडापावच्या किंमतीत 20 शेअर्स खरेदी करा, यापूर्वी 633% परतावा दिला - Penny Stocks 2025 Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनी शेअरने 1 महिन्यात 53% परतावा दिला, खरेदीची संधी सोडू नका - NSE: APOLLO
x

मराठा आरक्षणासाठी प्रसंगी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात सर्व पक्षीय शिष्टमंडळ घेऊन पंतप्रधानांना भेटू - उपमुख्यमंत्री

Maratha reservation

पुणे, ०७ मे | मराठा आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टाचा आलेला निकाल धक्कादायक आहे. मात्र मराठा समाजाला आरक्षण देण्यास आम्ही कटिबद्ध आहोत, असं सांगतानाच वेळ आल्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सर्व पक्षीय शिष्टमंडळ घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊ, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुण्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कोरोना परिस्थिती, लॉकडाऊनपासून ते मराठा आरक्षणावर प्रतिक्रिया व्यक्त केली. देवेंद्र फडणवीस सरकारने मराठा आरक्षणासाठी वकिलांची जी फौज ठेवली होती. तीच फौज मराठा आरक्षणाची बाजू मांडण्यासाठी ठेवण्यात आली होती, असं सांगतानाच सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणावर दिलेला निर्णय धक्कादायक आहे. परंतु, सरकार आरक्षण देण्यास कटीबद्ध आहे.

येत्या जुलैमध्ये पावसाळी अधिवेशन होणार आहे. किंवा आवश्यकता पडल्यास मध्येच एक दिवसाचं अधिवेशन घेऊन एक ठराव करण्यात येईल. वेळ पडल्यास सर्व पक्षीयांना घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पंतप्रधानांची भेट घेऊन मराठा आरक्षणाचा तिढा सोडवू, असं अजित पवार यांनी सांगितलं

 

News English Summary: The decision of the Supreme Court regarding Maratha reservation is shocking. However, we are committed to give reservations to the Maratha community, saying that if the time comes, we will meet Prime Minister Narendra Modi with an all-party delegation led by Chief Minister Uddhav Thackeray, said Deputy Chief Minister Ajit Pawar.

News English Title: We could meet PM Narendra Modi under leadership of CM Uddhav Thackeray regarding Maratha Reservation news updates.

हॅशटॅग्स

#Maratha Kranti Morcha(221)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x