16 January 2025 5:43 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | म्युच्युअल फंड असावा तर असा, बिनधास्त गुंतवणूक करा, मिळेल करोडोत परतावा Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉकमध्ये तुफान तेजीचे संकेत, कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Personal Loan | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार योग्य आहे का, इथे जाणून घ्या योग्य माहिती, कर्ज घेण्यास सोपे जाईल Reliance Power Share Price | 39 रुपयाच्या पॉवर शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RPOWER Yes Bank Share Price | येस बँक शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, बँकेबाबत फायद्याची अपडेट, रिपोर्ट जारी - NES: YESBANK EPFO Passbook | पगारदारांसाठी EPFO ची नवीन सेवा, EPF रक्कम लवकरात लवकर काढता येणार, अपडेट जाणून घ्या Penny Stocks | 1 रुपयाचा पेनी स्टॉक तेजीत, गुंतवणूकदारांची मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2025
x

महाराजांचा अपमान करणाऱ्या भाजपच्या हलवणकरांना उदयनराजे विनंती करणार कि ?

Chhatrapati Shivaji Maharaj, BJP Former MLA Halvankar

पुणे : छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आज पत्रकार परिषद घेऊन अनेक मुद्यांवर राज्यांच लक्ष वेधलं आहे. उदयनराजे भोसलेंनी राजकारणासाठी पत्रकार परिषद घेतली नसल्याचं सुरूवातीलाच स्पष्ट केलं. मात्र असं असलं तरीही त्यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांवर टीका केली आहे.

छत्रपतींच्या घराण्याची यापुढे बदनामी कराल तर गाठ माझ्याशी आहे हे भुंकणाऱ्यांनी लक्षात ठेवाव. विनंती फिनंती करत बसणार नाही पुस्तक प्रकाशन बंद करायलाच लावत असतो. राजेशाही असती तर पुस्तक काढणारा तो गोयल पुन्हा दिसला नसता असं म्हटलं आहे. मात्र आता वाद निवळण्यास सुरुवात झालेली असताना भाजपचे माजी आमदार हळवणकर यांनी थेट छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारं विधान केलं आहे आणि त्यामुळे आता छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज नेमकी या भाजप आमदारावर काय कारवाई करणार ते पाहावं लागणार आहे.

‘आज के शिवाजी : नरेंद्र मोदी’ या पुस्तकासंदर्भातील वादावर प्रितिक्रिया देताना भाजपाचे माजी आमदार सुरेश हळवणकर यांनी मुक्ताफळे उधळली आहेत. “पंतप्रधान नरेंद्र मोदींशी शिवाजी महाराजांची तुलना करणे चुकीचे नाही. या पुस्तकाचे लेखकाचे मी समर्थन करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवाजी महाराजांच्या तुलनेत गैर काहीच नाही. ही तुलना म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मानच आहे,” असं मत हळवणकर यांनी भाजपाच्या बैठकीमध्ये बोलताना व्यक्त केलं.

‘नरेंद्र मोदी हेच शिवाजी’ असे सांगणाऱ्या लेखकावर कारवाई का झाली नाही? पुस्तकामुळे भडका उडाला व लोकांच्या भावनांचा उद्रेक झाला. हे सर्व जाणूनबुजून करणाऱ्या फुटकळ लेखकाला भारतीय जनता पक्षातून एव्हाना हाकलून का दिले नाही ? असे प्रश्न उपस्थित करण्यात येत असताना भाजपचे माजी आमदार सुरेश हळवणकर यांनी मुक्ताफळे उधळली आहे.

 

Web Title:  what action former MP Udayanraje will take on BJP Former MLA Halvankar over statement on Chhatrapati Shivaji Maharaj.

हॅशटॅग्स

#Udayanraje Bhosale(54)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x