पवार भेटीबद्दल चित्रा वाघ यांनी अर्धसत्य मांडलं | हे आहे पूर्ण सत्य जे स्वतः पवारांनी सांगितलेलं
मुंबई, २७ फेब्रुवारी: पूजा चव्हाण प्रकरणामध्ये वनमंत्री संजय राठोड यांच्या अटकेसाठी आक्रमक झालेल्या चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्याविरुद्ध लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने 12 फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल केला आहे. यानंतर आता चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद घेत भाष्य केले आहे. यासोबतच आज पवार साहेबांची खूप आठवण येत असल्याचेही त्या म्हणाल्या.
चित्रा वाघ प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाल्या की, ‘5 जुलै 2016 रोजी माझ्या पतीवर आरोप झाले. त्यानंतर 7 जुलैला ईदच्या दिवशी मी शरद पवार यांना भेटायला गेले. त्यावेळी शरद पवार यांनी माझ्याकडे एफआयआरची प्रत मागितली. ही प्रत नीट वाचल्यानंतर तुझा नवरा या सगळ्यात कुठेच नाही, असे शरद पवार यांनी मला सांगितले. त्यामुळेच आज सकाळपासून मला शरद पवार साहेबांची खूप आठवण येत आहे, असे चित्रा वाघ यांनी सांगितले.
मात्र चित्र वाघ जुनी आठवण सांगताना भावनेच्या भरात चित्र वाघ जे बोलून गेल्या त्यातून त्यांचे पती किशोर वाघ यांना अडकविण्याचं तत्कालीन फडणवीस सरकारचा हात होता का अशी चर्चा समाज माध्यमांवर रंगली आहे. कारण चित्र वाघ सांगतात त्याप्रमाणे पवारांनी प्रतिक्रिया दिली होती, त्याप्रमाणे अर्थ तसाच काढता येऊ शकतो. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे चित्र वाघ यांनी पत्रकार परिषदेत अर्धसत्य समोर ठेवलं. जे स्वतः पवारांनी त्यांच्या पक्ष त्यागानंतर प्रसार माध्यमांसमोर सांगितलं होतं.
त्यावेळी पवार यासंदर्भात म्हणाले होते, ‘चित्रा वाघ माझ्याकडे आल्या होत्या. त्यांचे पती किशोर वाघ यांची चौकशी सुरू आहे. त्यामुळे त्या घाबरलेल्या होत्या. आमच्या बचावासाठी मी पक्ष सोडून जात आहे, असं सांगितल्याचं शरद पवार यांनी म्हटलं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अडचणीत सापडलेल्या नेत्यांच्या सहकारी संस्थांना मदत करण्याच्या नावाखाली भाजपमध्ये येण्यासाठी किंवा निवडणूक लढवण्यासाठी भाजप दबाव टाकत आहेत, असा आरोप शरद पवारांनी केला होता.
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर चित्रा वाघ चांगल्याच प्रकाशझोतात आल्या होत्या. राष्ट्रवादीने त्यांच्यावर महिला प्रदेशाध्यक्षपदाची मोठी जबाबदारी सुद्धा टाकली होती. मात्र पतीवर ट्रॅप होताच त्या शांत झालेल्या पहायला मिळाले. आपले पती या प्रकरणातून सहीसलामत सुटावेत हे चित्रा वाघ यांचे प्रयत्न आहेत आणि त्यासाठी त्यांना भाजपची मदत लागेल. त्यामुळेच चित्रा वाघ यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला होता, असं बोललं जातं होतं. त्यामुळे आज पती निर्दोष असल्याचा कांगावा करणाऱ्या चित्र वाघ इतक्या ठाम होत्या तर त्यांना त्यासाठी भाजप प्रवेश करण्याची काहीच गरज नव्हती. तसेच त्यामुळे नक्कीच त्यांच्या पतीची बाजू देखील चुकीची असणार यात शंका नाही जे चौकशीअंती समोर येईल.
News English Summary: At that time, Pawar had said in this regard, ‘Chitra Wagh had come to me. Her husband Kishor Wagh is under investigation. So she was scared. Sharad Pawar said that he was leaving the party to defend us. Sharad Pawar had alleged that the BJP was pressuring him to join the BJP or contest the elections in the name of helping the co-operatives of the troubled leaders of the NCP.
News English Title: What Sharad Pawar was said about Kishor Wagh ACB case in BJP Ruling news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Pan Card Online | 90% लोकांना ठाऊक नाही पॅनकार्ड मार्फत लोन कसा मिळतो, कशा पद्धतीने अप्लाय करा, माहिती जाणून घ्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर 1,723 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, ब्रोकरेज रिपोर्ट जारी - NSE: RELAINCE
- Home Loan Benefits | गृहकर्ज घेणे डोक्याला टेन्शन वाटतंय, आधी हे फायदे सुद्धा समजून घ्या, मिळतील अनेक फायदे
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरवर टॉप ब्रोकरेज बुलिश, शेअर मालामाल करणार, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE
- RVNL Share Price | टेक्निकल चार्टवर मोठे संकेत, RVNL शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला - NSE: RVNL
- Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
- Motilal Oswal Mutual Fund | पगारदारांनो इकडे लक्ष द्या, 'ही' म्युच्युअल फंड योजना 1 लाखांवर देईल 6,13,521 रुपये परतावा
- Shark Tank India | महिला सुद्धा सुरु करू शकतात असा स्टार्टअप, आई-मुलीच्या स्टार्टअपला शार्क टँक इंडियातून फंडिंग
- NBCC Share Price | पीएसयू NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मिळेल मजबूत परतावा - NSE: NBCC
- Bank Account Alert | कमी पगारात सुद्धा तुमच्या बँक खात्यात पैसा टिकेल आणि वाढेल सुद्धा, 'या' 5 टिप्स फॉलो करा