22 November 2024 2:19 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

त्या 12 आमदारांच्या नियुक्तीचा निर्णय कधी घेणार आहात? | हायकोर्टाचा राज्यपालांच्या सचिवांना प्रश्न

Bhagat Singh Koshyari

मुंबई, २२ मे | मागील अनेक महिन्यांपासून विधानपरिषदेतील राज्यपाल नियुक्त आमदारांचा प्रश्न प्रलंबित आहे. राज्य सरकारने एकूण 12 नियोजित आमदारांची यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे पाठवून कित्येक महिने झाले आहेत. मात्र, अद्याप कोश्यारी यांनी महाविकास आघाडी सरकारने दिलेल्या यादीला मान्यता दिलेली नाही. दरम्यान यावरून महाविकास आघाडीने सातत्याने राज्यपाल व भाजपला यामुळे घेरण्याचा प्रयत्न केला असल्याचे आपल्याला अनेकदा पाहायला मिळाले आहे.

दरम्यान याच 12 आमदारांच्या नियुक्तीच्या वादावरुन आता मुंबई उच्च न्यायालयाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या सचिवांना प्रश्न विचारला आहे. राज्य मंत्रिमंडळानं शिफारस केलेल्या.12 सदस्यांबाबत निर्णय कधी घेणार आहात? अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाकडून करण्यात आलीय. त्यामुळे गेल्या 6 महिन्यांपासून सुरु असलेल्या वादावर आता तोडगा निघण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मुंबई उच्च न्यायालयाने राज्यपालांच्या सचिवांनाच प्रश्न केल्यानं याबाबत आता हालचाल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

न्या. काठावाला आणि न्या. तावडे यांच्या खंडपीठापुढं यासंबंधीच्या याचिकेवर सुनावणी झाली. सामाजिक कार्यकर्ते रतनसोली लुथ यांनी ही याचिका दाखल केलीय. वकील गौरव श्रीवास्तव त्यांची बाजू मांडतायत. राज्य सरकारबरोबरच्या संघर्षामुळंच राज्यपालांनी 12 आमदारांच्या शिफारशीवर निर्णय घेतला नाही, असा युक्तिवाद श्रीवास्तव यांनी केला. इतर राज्यांमध्ये एका दिवसात निर्णय झाल्याची उदाहरणं त्यांनी कोर्टाला दाखवून दिली. घटनादत्त अधिकारांचं वहन करण्यात राज्यपाल अपयशी ठरल्याचा आरोपही याचिकेत करण्यात आला आहे.

 

News English Summary: The Mumbai High Court has now questioned Governor Bhagat Singh Koshyari’s secretary over the dispute over the appointment of 12 MLAs. When are you going to decide on the 12 members recommended by the state cabinet? Such a request has been made by the Mumbai High Court.

News English Title: When are you going to decide on the 12 members recommended by the state cabinet question asked by Bombay high court to Governor news updates.

हॅशटॅग्स

#MahaVikasAghadi(137)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x