17 April 2025 5:36 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | नोकरदारांनो, डोळे झाकुन पैसे गुंतवा या SBI फंडात, एसआयपी वर दिला 1,04,23,471 रुपये परतावा EPFO Pension Amount | तुमचा बेसिक पगार किती आहे? खाजगी कंपनी पगारदारांना महिना 6,429 रुपये पेन्शन मिळणार, अपडेट आली Gratuity on Salary | खाजगी कंपनी पगारदारांच्या खात्यात ग्रेच्युटीचे 4,03,846 रुपये जमा होणार, फायद्याची अपडेट जाणून घ्या Horoscope Today | 17 एप्रिल 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या GTL Share Price | जीटीएल इन्फ्रा पेनी स्टॉकमध्ये तेजी, जोरदार खरेदी, पुढची टार्गेट प्राईस किती? - NSE: GTLINFRA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 17 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IREDA Share Price | सुसाट तेजी, इरेडा शेअरमध्ये 5.65 टक्क्यांची तेजी, PSU स्टॉकची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IREDA
x

पवारांकडून हिंदुंच्या श्रद्धेचा अपमान, हिंदुत्ववादी ठाकरे गप्प का? - विनायक मेटे

CM Uddhav Thackeray silent, Sharad Pawar, Ram Mandir, Vinayak Mete

नाशिक, २० जुलै : अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या पार्श्वभूमीवर राजकारण तापायला सुरुवात झाली आहे. येत्या ५ ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचे भूमिपूजन होणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, देशात सध्या राम मंदिर बांधून कोरोना जाणार आहे का, असा खोचक सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी उपस्थित केला होता.

पवार म्हणाले होते, “कोरोना हे देशावरचे मोठे संकट आहे. त्यावर यशस्वीपणे मात करण्यासाठी राज्य व केंद्र सरकार एकत्रित आले पाहिजे. एकमेकांशी योग्य समन्वय साधून काम झाले पाहिजे. कोरोनाचे भयसंकट परतवून लावण्यासाठी कोणत्या गोष्टींना महत्त्व द्यायचे, हे प्राधान्याने ठरविले पाहिजे. परंतू, मंदिर बांधून कोरोनाचं संकट दूर होईल, असं काही मंडळींना वाटतं आहे. राम मंदिर बांधून कोरोना आटोक्यात येत असेल तर भूमिपूजन अवश्य करा. फक्त करोनाचं संकट दूर व्हावं हीच आमची इच्छा आहे.”

यावर प्रतिक्रिया देताना शिवसंग्रामचे विनायक मेटे म्हणाले की, ‘मंदिर बांधून करोना जाणार नाही असं त्याचं म्हणणं असेल तर मंदिर न बांधून तो जाणार आहे का,’ असा प्रश्न मेटे यांनी पवारांना केला. ‘शरद पवारांनी हिंदू समाजाच्या श्रद्धेचा अवमान केला आहे. स्वत:ला हिंदू नेते म्हणवणारे मुख्यमंत्री आता मूग गिळन गप्प का? त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी,’ असं आव्हानही मेटे यांनी उद्धव ठाकरे यांना दिलं.

दूध दरासाठी भाजपनं आज सुरू केलेल्या आंदोलनात मेटे यांची संघटनाही उतरली आहे. जिल्हाधिकारी मांढरे यांना मागण्यांचे निवेदन दिल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्यावरही त्यांनी टीका केली. ‘राजू शेट्टी हे आता शेतकऱ्यांचे नेते राहिलेले नाहीत. त्यांची आंदोलनं दाखवण्यापुरती आहेत,’ असं मेटे म्हणाले.

 

News English Summary: Vinayak Mete of Shiv Sangram said, “If he says that Corona will not go after building a temple, will he go without building a temple,” Mete asked Pawar. Sharad Pawar has insulted the faith of the Hindu community. Why is the Chief Minister, who calls himself a Hindu leader, silent now? They should clarify their role

News English Title: Why CM Uddhav Thackeray silent on Sharad Pawar Ram Mandir statement Shivsangram leader Vinayak Mete asked News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#UddhavThackeray(413)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या