27 January 2025 10:16 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bonus Share News | फायदा घ्या, ही कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: SBC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरमध्ये 55% तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RELIANCE IRFC Share Price | आयआरएफसी शेअर 6 महिन्यात 30% घसरला, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, पुढे काय होणार - NSE: IRFC RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा इशारा, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: RVNL CIBIL Score | सिबिल स्कोर खराब झालाय, कोणत्याही प्रकारचे कर्ज मिळणार नाही, 'हे' 4 परिणाम होतील EPFO Passbook | लवकरच पगारदारांना ATM च्या माध्यमातून काढता येणार EPF मधील पैसे, अपडेट जाणून घ्या Penny Stocks | कर्ज मुक्त कंपनीचा 2 रुपयाचा पेनी स्टॉक मालामाल करतोय, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: ESSENTIA
x

मुख्यमंत्री होण्याआधी राजकारणात फडणवीसांचं काही वेगळं स्थान नव्हतं: शरद पवार

NCP President Sharad Pawar, Devendra Fadnavis

मुंबई: २०१४च्या निवडणुकीनंतर मोदी लाटेत राज्याच्या राजकारणात भारतीय जनता पक्षातील माहित नसलेले चेहरे देखील थेट मंत्रीपदी विराजमान झाले होते. अगदी देवेंद्र फडणवीस देखील त्यातीलच एक उदाहरण म्हटल्यास वावगं ठरणार नाही. अगदी विरोधी पक्षनेते पदी देखील त्यांनी काही विशेष कामगिरी बजावली नव्हती. मात्र २०१४च्या विधानसभा निवडणुकीनंतर गोपीनाथ मुंडे यांचा आकस्मित मृत्यू झाला आणि मोदींच्या तालावर नाचेल आणि नागपूरच्या आरएसएस लॉबीमुळे देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पदाची लॉटरी लागली होती हे सर्वश्रुत आहे. कारण भाजपात विरोधी पक्षनेते पद मिळेल याची शास्वती ते स्वतः सुद्धा देऊ शकणार नव्हते.

विशेष म्हणजे राजकारणातील ओळख नसलेल्या अनेक भाजप नेत्यांची राज्यात २०१४ नंतर लॉटरी लागली होती. त्यात चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन नावाचे कोणी नेते राज्याच्या राजकारणात आहेत हे महाराष्ट्रातील लोकांना माहीतही नव्हतं. त्यामुळे २०१४ नंतर भाजपसाठी राजकीय दृष्ट्या सर्वकाही एकतर्फी असल्याने हेच नेते थेट “संकटमोचक” झाले जे हास्यास्पद होतं. मात्र स्वतःला मुख्यमंत्र्यांच्या मर्जीतले दाखवून या नेत्यांनी देखील स्वतःचा राजकीय स्वार्थ साधला होता. मात्र २०१९मधील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर परिस्थिती एकतर्फी राहिली नाही आणि याच नेत्यांमधील संकटमोचक “संकटात” सापडल्याचं दिसलं, त्यात भाजपचं संकट दूर करणं सोडा, थेट कॅमेऱ्यावर बोलण्यास देखील हे नेते तयार होतं नव्हते. त्यामुळे मोदी लाटेतील फडणवीस, चंद्रकांत पाटील आणि गिरीश महाजन यांची कुवत ही १०० टक्के दिल्लीवर अवलंबून आहे हे देखील सिद्ध झालं. या नेत्यांच्या बाबतीत एक गोष्ट विशेष म्हणावी लागेल आणि ती म्हणजे हे तीन नेते राज्यातील शरद पवार ते शिवसेना आमच्यासमोर पाणी कम चाय असल्याच्या अविर्भावातच वावरायचे. आम्ही म्हणजेच या राज्याच्या राजकारणाचे भाग्य विधाते अशीच यांची नेहमीची देहबोली असल्याचं वेळीवेळी समोर आलं आणि नेमका तोच धागा शरद पवार यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत बोलून दाखवला आहे.

यावेळी शरद पवार अनुभव व्यक्त करताना म्हणाले की, ‘अनेकांना वाटलं ‘मी म्हणजेच महाराष्ट्र, मी म्हणेल तो महाराष्ट्र, माझ्या आसपास कुणीच नाही… हा ‘मी’ पणाचा दर्प जो देवेंद्र फडणवीस यांनी दाखवला, तो लोकांना सहन झाला नाही आणि त्याचीच किंमत त्यांना मोजावी लागली,’ अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी फडणवीस यांच्या सध्याच्या पीछेहाटीचं विश्लेषण केलं आहे.

राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र विकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्यांदाच शरद पवार यांनी दीर्घ मुलाखत दिली. त्यात त्यांनी अनेक गोष्टींचा गौप्यस्फोट करताना फडणवीस यांच्या राजकीय वाटचालीवरही भाष्य केलं. ‘मी पुन्हा येईन…’ या घोषणेत मला काही वावगं वाटत नाही. तुम्हाला लोकांचा पाठिंबा असेल तर तुम्ही त्याचा उपयोग संघटनेसाठी करून घेणं अजिबात चुकीचं नाही. परंतु, त्यात दर्प असता कामा नये. देवेंद्र फडणवीस यांच्या अलीकडच्या भाषणात सत्तेचा दर्प अधिक होता. ‘शरद पवार हे इतिहासजमा झालेलं नाव आहे. आता मीच आहे. मी म्हणजे सगळं. बाकी सगळे तुच्छ अशी भूमिका मांडण्याचा प्रयत्न त्यांनी केला. महाराष्ट्रातील लोकांना हे आवडत नाही. लोकांना ‘मी’पणा आवडत नाही. विनम्रता आवडते,’ असं पवार म्हणाले.

मुख्यमंत्री होण्याआधी महाराष्ट्राच्या राजकारणात फडणवीसांचं काही वेगळं स्थान नव्हतं. ते नागपूरचे महापौर होते. तेथील महापालिकेत त्यांचं योगदान असेल. विधानसभेत सक्रिय सभासद म्हणून त्यांचा नावलौकिक होता. या निश्चितच जमेच्या बाजू आहेत. पण मुख्यमंत्री झाल्यावर ‘मी म्हणजेच महाराष्ट्र… माझ्या आसपास कुणीच नाही…’ अशी त्यांची भूमिका होती. तो दर्प त्यांना नडला. आज भाजप महाराष्ट्रात सर्वात मोठा पक्ष असला तरी त्यात मोदींचं मोठं योगदान आहे. त्यांच्याकडं पाहून लोकांनी मतं दिलीत, हे विसरता कामा नये,’ असंही पवार म्हणाले.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x