22 December 2024 4:16 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE Ashok Leyland Share Price | बंपर कमाई होणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 7 शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, मिळेल मजबूत परतावा - NSE: TATATECH Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन सहित हे 5 शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON NHPC Share Price | NHPC सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC SIP Calculator | 12 बाय 12 चा फॉर्म्युला! 1000 रुपयांच्या बचतीतून मिळेल 1 कोटी रुपयांचा परतावा, लक्षात ठेवा SBI Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा, SBI फंडाची ही योजना श्रीमंत करतेय, संधी सोडू नका
x

मराठा आरक्षण | नारायण राणे मुख्यमंत्री होते तेव्हा आरक्षण का दिले नाही? - अजित पवारांचा सवाल

Maratha reservation

पुणे, ०५ जून | उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल (४ जून) मराठा आरक्षणासंदर्भात भाष्य केले आहे. यावेळी बोलताना त्यांनी चंद्रकांत पाटील, देवेंद्र फडणवीस, नारायण राणेंवर टीकास्त्र सोडलं. ते म्हणाले की, नारायण राणे मुख्यमंत्री असताना त्यांनी आरक्षण का नाही दिलं. पवार साहेब समोर आलं की वाकून नमस्कार करायचा आणि नंतर असं बोलायचं, असं ते म्हणाले.

चंद्रकांत पाटलांवर बोलताना अजित पवार म्हणाले की, चंद्रकांत दादांनी सांगितलंय की ते कसे आहेत. त्यामुळं त्यांच्याबद्दल न बोललेलच बरं. मी तर सारखा झोपेतून जागा होतो आणि चॅनल लावतो. हे चॅनल ते चॅनल आणि बघतो. पडलं पडलं पडलं असं ऐकायला मिळतं असं असा उपहासात्मक टोला त्यांनी लगावला आहे. तर फडणवीसांवर बोलताना म्हणाले की, मी उद्धव ठाकरेंना सांगणार आहे की आपण फडणवीसांची शिकवणी लावू. मी पण त्या शिकवणीला जाईन, असं अजित पवार म्हणाले आहेत.

उद्धव ठाकरे, शरद पवार, सोनिया गांधी यांच्यानंतर दुसऱ्या फळीतील आम्ही देखील एकोप्याने राहत आहोत. पण हा एकोपा खालपर्यंत पोहोचायला वेळ लागेल, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. जिथं राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना किंवा जिथं शिवसेना विरुद्ध कॉंग्रेस अशी लढत झाली तिथं एकत्र बसून प्रश्न सोडवावे लागतील.

रायगडमध्ये आम्ही मार्ग काढला. आमच्याकडून जयंत पाटील आणि मी आणि त्यांच्याकडून उद्वव ठाकरे मार्ग काढतील, असंही अजित पवार म्हणाले. महापालिका निवडणुकीमधे प्रभाग रचना कशी असेल याबाबत आम्ही तिन्ही पक्ष एकत्र बसून निर्णय घेऊ, असंही ते म्हणाले आहेत.

 

News English Summary: Deputy Chief Minister Ajit Pawar has commented on Maratha reservation yesterday (June 4). Speaking on this occasion, he castigated Chandrakant Patil, Devendra Fadnavis and Narayan Rane. He asked why he did not give reservation when Narayan Rane was the Chief Minister. When Pawar Saheb came in front, he would bow down and say hello and then he would say that, he said.

News English Title: Why he did not give Maratha reservation when Narayan Rane was the Chief Minister of Maharashtra said Deputy CM Ajit Pawar news updates.

हॅशटॅग्स

#Maratha Kranti Morcha(221)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x