काय घाबरू नका, वेळ आली तर शिवसेना भवनही फोडू असं वक्तव्य | आता प्रसाद लाड यांच्याकडून सारवासारव
मुंबई, ०१ ऑगस्ट | भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रसाद लाड यांनी शिवसेनेबद्दल केलेल्या विधानावरून आता पुन्हा एकदा भारतीय जनता पक्ष विरुद्ध शिवसेना असा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. वेळ आली तर शिवसेना भवन फोडू असं वादग्रस्त वक्तव्यं प्रसाद लाड यांनी केल्याचं समोर आलं आहे. तर, त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजल्याचे दिसत आहे. आज भारतीय जनता पक्षाच्यावतीने माहीम विधानसभा कार्यलायच्या बाहेर पक्षाच्या ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला आणि या कार्यक्रमाप्रसंगी बोलताना आमदार प्रसाद लाड यांनी हे वक्तव्य केल्याचं समोर आलं आहे.
भाजप आ. प्रसाद लाड नेमकं काय म्हणाले होते?
नारायण राणे आणि राणे कुटुंबीयांना मानणारा देखील स्वाभिमानचा एक खूप मोठा गट आज राणे साहेबांच्या निमित्तानं, नितेशजीं निमित्तानं भारतीय जनता पार्टीमध्ये आलाय. त्यामुळं भारतीय जनता पार्टीची ताकद निश्चितपणे डबल झाली आहे. त्यामुळे नितेशजी पुढच्या वेळेस कार्यकर्ते कमी आणुयात, कारण आपण आलो की पोलिसचं खूप येतात. फक्त त्यांना सांगुयात की ड्रेसमध्ये पाठवू नका म्हणजे त्यांना हॉलमध्ये बसता येईल. “एवढी तुमची आमची भीती तुमची आमची की ह्यांना असं वाटतं की हे माहिम मध्ये आले की सेनाभवन फोडणार आहेत.काय घाबरू नका वेळ आली तर ते देखील करुयात, असं प्रसाद लाड म्हणाले.
शिवसेनेतून प्रतिक्रिया:
भाजप आमदार प्रसाद लाड यांनी केलेल्या वक्तव्यानंतर शिवसेनेतून देखील प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली. शिवसेना नेते सचिन आहिर यांनी देखील प्रसाद लाड यांना प्रत्युत्तर दिलं आहे. कोणी किती बोलावे आणि काय बोलावं हे लक्षात घ्यायला पाहिजे. कोण प्रसाद लाड त्यांना माहीत नाही का शिवसेना भवनवर आधी कोणाला किती प्रसाद मिळाला आहे. कोणीही प्रसिद्धीसाठी वाटेल ते वक्तव्य करू नये, असा इशारा सचिन आहिर यांनी दिला आहे.
शिवसेना भवनच्या फुटपाथवर येऊन दाखवा ते आमचं मंदिर आहे. त्यांना शिवसेना स्टाईल उत्तर देऊ. बाळासाहेबांचा शिवसैनिक आजही सेनाभवनला आपल्या ह्रद्यात ठेवतो. माहीम, दक्षिण मुंबई परिसरात शिवसेना काय आहे, हे विरोधकांना माहिती आहे. भाजपनं अशी 100 कार्यालय खोलली तरी शिवसेनेला फरक पडणार नाही, शक्तिप्रदर्शन करून काही फायदा होणार नाही, असं प्रत्युत्तर शिवसेना नेते सचिन आहिर यांनी प्रसाद लाड यांना दिलं.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.
News Title: We will also break Shivsena Bhavan statement of BJP MLA Prasad Lad news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा की - NSE: NBCC
- NTPC Share Price | NTPC कंपनीबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: NTPC
- ESIC Benefits | पगारदारांनो, हलक्यात घेऊ नका, ESIC अंतर्गत कर्मचाऱ्यांना मिळतात अनेक लाभ, डिटेल्स लक्षात ठेवा - Marathi News
- Diwali Special Ubtan | दिवाळीच्या दिवसांत दररोज करा अभ्यंगस्नान; घरच्या घरी बनवा सुगंधित उटणे, चेहऱ्यावर येईल सुंदर चमक
- Edelweiss Mutual Fund | अजून काय हवं, महिना बचतीवर हा फंड 1.12 कोटी रुपये देईल, फायद्याची स्कीम सेव्ह करा - Marathi News
- Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today
- Tata Steel Vs JSW Steel Share Price | पॉलिसी चेंज, टाटा स्टील आणि JWS स्टील शेअर्सला होणार फायदा- NSE: TATASTEEL
- Suzlon Share Price | सुझलॉन शेअरबाबत महत्वाचे संकेत, मल्टिबॅगर शेअर BUY, SELL की HOLD करावा - NSE: SUZLON
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 70% पर्यंत कमाई होणार - NSE: TATAPOWER