15 January 2025 11:24 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन शेअरबाबत मोठे संकेत, तज्ज्ञांकडून SELL रेटिंग, नेमकं कारण काय - NSE: NTPCGREEN HDFC Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांनो महिना 2000 रुपयांची गुंतवणूक करा, मिळाले 4 कोटी रुपये परतावा Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या NPS Calculator | तुमच्या पत्नीमुळे महिन्याला 44,793 रुपये पेन्शन मिळेल आणि 1 कोटी 12 लाख रुपये परतावा देईल ही योजना IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC
x

'सेक्युलर' शब्द घटनेतच आहे, पण माध्यमांनी उगीच संभ्रम निर्माण करू नये: संजय राऊत

MP Sanjay Raut, Word Secular, Shivsena, Hindutva

नवी दिल्ली: राज्यात १ डिसेंबरपूर्वी सरकार स्थापन होईल. काल काँग्रेस आणि एनसीपी’ची पार पडलेली बैठक ही सकारात्मक झाली. सरकार स्थापनेसंदर्भात त्यांनी काही निर्णय घेतले असल्याची माहिती मिळाली आहे. बैठकीनंतर आघाडीच्या काही नेत्यांची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shivsena Chief Uddhav Thackeray) यांच्यासोबत फोनवरून चर्चा झाली आहे आणि लवकरच शिवसेनेच्या नेतृत्वाखाली राज्यात सरकार स्थापन होईल, अशी माहिती शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut) यांनी दिली.

दरम्यान, पत्रकार परिषदेत राऊत यांना विचारलं असता त्यांनी सेक्युलर शब्दाबद्दल आक्षेप असण्याचं काहीही कारण नसल्याचं स्पष्ट केलं. ‘देशातील शेतकऱ्यांना मदत देताना त्यांचा धर्म पाहिला जात नाही. नोकऱ्या देताना उमेदवारांना त्यांचा धर्म विचारला जात नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वत: तसा आदर्श घालून दिला आहे. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेबांनीही (Shivsena Chief Balasaheb Thackeray) न्यायालयात धर्मग्रंथावर हात ठेवून शपथ घेण्यास विरोध केला होता. राज्यघटनेवर (Constitution of India) हात ठेवून शपथ घेतली जावी, असं त्यांनी म्हटल्याची आठवण राऊत यांनी यावेळी दिली.

महाराष्ट्रात शिवसेनेचाच मुख्यमंत्री होईल’, असं सांगतानाच ‘उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद स्वीकारावं अशी जनतेची इच्छा आहे’, असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सांगितलं. दिल्लीत झालेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या संयुक्त बैठकीत (Congress NCP Meeting) सत्ता स्थापनेबाबत तब्बल तीन तास चर्चा झाली. या बैठकीनंतर राऊतांनी हे मत व्यक्त केलं. त्यामुळे महाशिवआघाडी सरकारचं नेतृत्व उद्धव ठाकरेच करतील, अशी चर्चा पुन्हा सुरू झालीय.

तसेच राज्यात सत्तास्थापनेबाबत सध्या दिल्लीत सुरू झालेल्या चर्चा आता अंतिम टप्प्यात पोहोचल्या आहेत. आता सत्तास्थापनेबाबतचे यापुढील निर्णय हे मुंबईतून होतील. तसेच सरकार कधी स्थापन होईल आणि कोण मुख्यमंत्री होईल, याबाबतचा अंतिम निर्णय लवकरच कळेल, असे सूचक वक्तव्यही राऊत यांनी या वेळी केले.

हॅशटॅग्स

#Sanjay Raut(262)#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x