20 April 2025 2:03 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRB Share Price | 46 रुपयांचा आयआरबी इन्फ्रा शेअर खरेदी करा, तज्ज्ञांकडून BUY रेटिंगसह टार्गेट अपडेट - NSE: IRB Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर्समध्ये मोठ्या अपसाईड तेजीचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: JIOFIN Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, मिळेल मोठा परतावा, अपडेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्स गुंतवणूकदारांसाठी महत्वाची अपडेट, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON HDFC Mutual Fund | पगारदारांनो, ही फंडाची योजना गुंतवणूकदारांचे पैसे 4 ते 5 पटीने वाढवत आहे, इथे पैसा वाढवा Horoscope Today | 20 एप्रिल 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Kalyan Jewellers Share Price | सोनं नव्हे, सोनं बनवणाऱ्या कंपनीचे शेअर्स खरेदी करा, झपाट्याने पैसा वाढेल - NSE: KALYANKJIL
x

फडणवीस पक्षात असेपर्यंत न्याय मिळणार नाही असे वाटल्याने पक्ष सोडला

Devendra Fadnavis, Eknath Khadse

जळगाव, २२ ऑक्टोबर : ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी अखेर भाजपचा रामराम ठोकला आहे. मागील विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळीच राष्ट्रवादीत आपण प्रवेश करणार होतो. एबी फॉर्म सुद्धा देण्यात आला होता, असा खळबळजनक खुलासा एकनाथ खडसे यांनी केला आहे. प्रसार माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली आहे. त्याचबरोबर, इतक्या वर्षांनंतर आपण भाजप का सोडताय असा सवाल केला असता खडसेंनी मोठा खुलासा केला आहे. माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस जोपर्यंत पक्षात आहेत तोपर्यंत आपल्याला न्याय मिळणार नाही असे वाटल्याने आपण पक्ष सोडल्याचे त्यांनी म्हटले आहे.

सर्व नेत्यांची भेट घेऊन मांडले गाऱ्हाणे:
या मुलाखतीत खडसे यांनी सांगितले की ते भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा यांना भेटले आणि त्यांच्याशी एक तास चर्चा केली. गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान मोदी यांनाही ते भेटले. नितिन गडकरी यांच्यासह अनेक नेत्यांची भेट त्यांनी घेतली. या सर्वांसमोर त्यांनी आपले गाऱ्हाणे मांडले, आपले काही चुकले असल्यास सांगण्याची विनंती केली. त्या सर्वांनी हे ऐकून घेतले. पण विधानसभेच्या तिकिटापासून ते इतर सर्व निर्णय हे देवेंद्र फडणविसांच्या शब्दावरच घेतले जात. त्यामुळे आपल्याला न्याय मिळणार नाही असे वाटल्याने त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला.

काय आहे विनयभंगाच्या खटल्याचा प्रकार?
मुक्ताईनगरमधील भाषणाच्या वेळच्या या प्रकाराबद्दल बोलताना खडसे म्हणाले की त्यांनी काहीही अश्लील वक्तव्य केले नाही. विषय हा त्यांच्या शेतातील आंब्यांचा होता, पण अंजली दमानिया यांनी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करायला भाग पाडले. कायद्यानुसार विनयभंगाचा गुन्हा दाखल करणारी व्यक्ती ही तिथे प्रत्यक्ष उपस्थित असावी लागते.

 

News English Summary: In an interview to the media, Eknath Khadse has once again slammed BJP leader Devendra Fadnavis. At the same time, when asked why he is leaving the BJP after so many years, Khadse has made a big revelation. Former Chief Minister and current Leader of the Opposition Devendra Fadnavis has said that he left the party as he felt that he would not get justice as long as he was in the party.

News English Title: Would Not get justice till Devendra Fadnavis in the party said Eknath Khadse quits BJP to join NCP News updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Eknath Khadse(94)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या