15 November 2024 10:13 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रेटिंग अपग्रेड, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट, कमाईची मोठी संधी - NSE: HAL Vedanta Share Price | वेदांता कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, मालामाल करणार शेअर - NSE: VEDL Tata Motors Share Price | रॉकेट तेजीने परतावा देणार टाटा मोटर्स शेअर, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATAMOTORS NHPC Share Price | NHPC शेअर चार्टवर महत्वाचे संकेत, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: NHPC EPFO Money | खाजगी कर्मचाऱ्यांचा बेसिक पगार वाढणार, प्रतिमहा मिळणारं 21000, जाणून घ्या आणखीन फायदे - Marathi News Post Office Scheme | आता 100 रुपये वाचवून तयार होईल लाखोंचा फंड, पोस्टाची खास योजना तुम्हाला श्रीमंत बनवू शकते - Marathi News
x

जगाला हेवा वाटेल अशी सेटलमेंट मला करायची आहे | पवार ED ऑफिसवर धडकले तर राज इडीला घाबरले

Writer Ghanshyam Patil, Raj Thackeray, MNS

मुंबई, ७ एप्रिल: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर लेखक घनश्याम पाटील यांनी त्यांच्या ब्लॉग मधून काही आरोप केले आहेत. ’जगाला हेवा वाटेल अशी सेटलमेंट मला करायची आहे’ अशा शीर्षका खाली त्यांनी एक ब्लॉग लिहला. या लिखाणामुळे सध्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून तीव्र स्वरुपाची नाराजी व्यक्त केली जात आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेपासून राज ठाकरे यांनी सातत्याने ज्या भूमिका बदलल्या त्या पाहता या पक्षाच्या भवितव्याची काळजी वाटतेय. जागतिक रंगभूमी दिनानिमित्त सर्वात मोठा ‘नटसम्राट’ म्हणून राज ठाकरे यांना पुरस्कार द्यायला हवा असे कुणाला वाटल्यास त्यातही आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही. ‘सगळ्या जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र मला घडवायचाय’ असे बेंबीच्या देठापासून ओरडत सांगणारे राज ठाकरे ‘जगाला हेवा वाटेल अशा कोलांटउड्या’ मारत आहेत.

‘नाणार, नाही म्हणजे, नाही म्हणजे, नाही म्हणजे, नाही!’ हे त्यांनी केवढ्या आवेशात सांगितले होते! त्यानंतर नाणारची मंडळी त्यांना भेटली आणि लगेच त्यांनी या प्रकल्पाला पाठिंबा दिला. टोलनाक्यावरून त्यांनी जे आंदोलन हाती घेतले त्यावेळीही त्यांच्या विश्वासार्हतेवर प्रचंड मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. समर्थ रामदास स्वामी म्हणायचे, ‘जयाचे जिवाशी वाटते भय, त्याने क्षात्रधर्म करू नये.’ लालूप्रसाद यादव तुरूंगात जाऊन बसले. देवेंद्र फडणवीस म्हणतात, ‘टाका मला जेलमध्ये. बघेन मी काय करायचं ते.’ शरद पवार तर ‘काय करताय ते बघू’ म्हणत न बोलावता स्वतःच इडीच्या ऑफिसमध्ये जाऊन धडकले. राज ठाकरे मात्र इडीला घाबरले असे चित्र आहे, असं त्यांनी लेखात म्हटलं आहे.

मात्र आता लेखक घनश्याम पाटील यांच्या लिखाणावरून महाराष्ट्र सैनिकांचा वाद पेटला आहे. पुण्यातील मनसेच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनीही फेसबुकवरुन घनश्याम पाटलांचा समाचार घेतला आहे. “घनश्याम तू लेखक म्हणून बिकावू तर आहेस पण माणूस म्हणून नीच आहेस” अशा शब्दाल रुपाली ठोंबरेंनी संताप व्यक्त केला आहे.

“महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेपासून राज ठाकरे यांनी सातत्याने ज्या भूमिका बदलल्या, त्या पाहता या पक्षाच्या भवितव्याची काळजी वाटते.” अशा आशयाचा ब्लॉग ‘चपराक’चे संपादक आणि प्रकाशक घनश्याप पाटील यांनी लिहिला आहे.

काय आहे रुपाली पाटील यांची फेसबुक पोस्ट

स्वतःला लेखक म्हणाऱ्या या बिकावू ,
स्वतःच स्टेलमेंट करून लेख लिहणाऱ्या लेखक म्हणाऱ्याचा तीव्र धिक्कार, निषेध
घनश्याम तू लेखक म्हणून बिकावू तर आहेस पण माणूस म्हणून नीच आहेस
आमच्या पक्ष अध्यक्ष मा. राज साहेब ठाकरे
बद्दल लिहायला तू एक सेटलमेंटचा पुरावा दे की
तुला कायदेशीर कारवाई तर करणार पण बिकावू लेखक म्हणून मनसे चोप पण देणार
अरे लेखक आहेस ना तू वास्तव्याचे प्रश्न समजत नसतील तर कसला आला रे लेखक
प्रसिद्धीसाठी कोणीही भुरटे लोक उठतात आणि स्वतःला लेखक म्हणून मानसिक रुग्णा सारखे लिहतात
घनश्याम तुझ्या माहितीसाठी कृष्णकुंज वर न्यायासाठी लोक येतात
कारण लोकांची आणि आमची विश्वासाची स्टेलमेंट झाली आहे
हे लक्षात ठेव
आणि तूच काढ पक्ष आणि चालवून दाखव
आमच्या साहेबांबद्दल लिहताना जरा वास्तव्याचे खरी परिस्थिती लिहिण्याचे धैर्य तुझ्या सारख्या स्वतःला लेखक म्हणाऱ्याकडे नाही
असो तू लेखक म्हणून छपरी आहेसच पण माणूस म्हणून तू बिकावू ,मानसिक रुग्ण आहेस.
आम्ही मनसे वास्तव्य आणि परिस्थितीचे गांभीर्य ओळखून जनतेच्या हिताचे राजकारण करणारा पक्ष आहे
उगीच नाही लोक प्रश्न घेऊन मा. राज साहेबांकडे येत
जय महाराष्ट्र
माझ्या बहिणींनो भावांनो नुसते वाचू नका या घनश्याम ला त्याची जागा दाखवून देऊ
की लेखक म्हणून तू छपरी ,बिकावू आहेस

स्वतःला लेखक म्हणाऱ्या या बिकावू ,
स्वतःच स्टेलमेंट करून लेख लिहणाऱ्या लेखक म्हणाऱ्याचा तीव्र धिक्कार, निषेध

घनश्याम तू…

 

News English Summary: Writer Ghanshyam Patil has made some allegations against Maharashtra Navnirman Sena president Raj Thackeray from his blog. “I want to make a settlement that the world will envy,” he wrote in a blog post. Maharashtra Navnirman Sena is currently expressing its displeasure over this article.

News English Title: Writer Ghanshyam Patil has made some allegations against MNS president Raj Thackeray from his blog news updates.

हॅशटॅग्स

#RajThackeray(190)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x