23 February 2025 8:26 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

खुशखबर! पोलिस भरतीसाठी प्रथम मैदानी चाचणी आणि त्यानंतर लेखी परीक्षा: सरकारचा निर्णय

MPSC, Police Bharti, Mahapariksha, Talathi Bharti, sarkari Bharti

मुंबई: अनेक त्रुटी असल्याने महापोर्टल विरोधात राज्यभर आंदोलन पेटली होती. कारण विद्यार्थ्यांना याविषयी प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत होता, तसेच या ऑनलाईन प्रक्रियेत अनेक त्रुटी असल्याचं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. त्यात अनेक निवेदनं आणि आंदोलनं करून देखील फडणवीस सरकारने याची दखल घेतली नव्हती.

दरम्यान, राज्य सरकारतर्फे विविध खात्यांच्या भरती प्रक्रिया सुरु झाल्याने उमेदवारांमध्ये नव्या सरकारकडून यासंदर्भात अनेक अपेक्षा होत्या. कारण राज्य शासनाच्या विविध विभागांच्या नोकरभरतीच्या परीक्षा महापोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने घेतल्या जाणार आहेत. दरम्यान, यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी महापोर्टल बंद करुन नवे आणि त्रुटी नसलेले उत्तम पोर्टल सुरु करण्याची विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे प्रत्यक्ष भेट घेऊन केली होती. तसेच मनसे, शिवसेना, काँग्रेस आणि स्वाभिमानी शेतकरी सेनेची देखील हीच मागणी होती.

त्यामुळे आंदोलक विद्यार्थी आणि मागणी करणाऱ्या सर्व पक्षांच्या निवेदनांचा विचार करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तूर्तास या महापोर्टल मार्फत होणाऱ्या ऑनलाईन भरती प्रक्रियेला स्थगिती दिली होती. आदेशानुसार, सदर पोर्टलमधील सर्व त्रुटी अशी दूर करून, त्यानंतर सुसज्य आणि त्रुटी विरहित पोर्टल बनवून सदर भरती प्रक्रिया पुढे पार पाडली जाईल असे आदेश मुख्यमंत्री कार्यालयाने प्रशासनाला दिले होते.

त्यामुळे राज्य पोलिस दलातील जवानांच्या भरतीचे निकष बदलले जाणार असून, पोलिस भरतीसाठी प्रथम मैदानी चाचणी आणि त्यानंतर लेखी परीक्षा होईल. या निकषानुसार लवकरच सुमारे ११ हजार रिक्‍त जागांसाठी भरती मोहीम राबविण्यात येईल. यासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळातील भरतीचे निकष बदलण्यात येणार असून, याबाबतचा शासन आदेश गृहमंत्रालयाकडून काढला जाणार आहे. या माध्यमातून पोलिस दलास सक्षम जवान मिळणार असून, याचा लाभ ग्रामीण भागातील युवकांना होईल असे बोलले जाते. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीरनाम्यातच याबाबतचे सूतोवाच केले होते.

पोलिस भरतीसाठी सध्या प्रथम लेखी परीक्षा घेतली जाते. त्यानंतर शारीरिक क्षमता सिद्ध करण्यासाठी मैदानी चाचणी घेतली जाते. दोन्ही चाचण्यांतील एकूण गुणांच्या आधारे अंतिम निवडीची यादी जाहीर होते. या निवड प्रक्रियेमुळे लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेले अनेक उमेदवार पुढे शारीरिक चाचणीत अनुत्तीर्ण होतात. परिणामी पोलिस दलाला योग्य आणि सक्षम जवान मिळण्यात अनेक अडचणी येत होत्या. ही बाब लक्षात आल्याने पोलिस भरतीसाठी इच्छुक असलेल्या अनेक बेरोजगार युवा-युवतींनी अगोदर मैदानी परीक्षा व नंतर लेखी परीक्षा घ्यावी, अशी मागणी केली होती.

हे नव्याने होणार पोलिस भरतीची प्रक्रिया दुरुस्तीनंतर आता उमेदवारांना अनेक नव्या बदलांना सामोरे जावे लागेल. त्यांना सोळाशे आणि शंभर मीटर अशा दोन गटांमध्ये धावावे लागेल. गोळाफेक, लांब उडी, पुलअप्स या प्रकाराची १०० गुणांची शारीरिक चाचणी होणार आहे. याआधी लांब उडी आणि पुलअप्स हे दोन प्रकार वगळण्यात आले होते, त्यांचा नव्याने समावेश करण्यात आला आहे.

 

Web Title:  Written examination be done after ground physical test in Maharashtra police recruitment.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x