तुम्ही ED लावली | आता माझ्याकडून सीडी लावण्याचं काम बाकी | जामनेरमध्येच इशारा

जामनेर, १२ फेब्रुवारी: भारतीय जनता पक्षाचे नेते गिरीश महाजन यांच्या जामनेर मतदारसंघात येऊन राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी डरकाळी फोडली आहे. सीडी लावण्याबाबत मी गंमतीने बोललो होतो. पण खरंच माझ्या मागे ईडी लावलीत, आता सीडी लावण्याचे काम अजून बाकी आहे, असा इशारा एकनाथ खडसे यांनी दिला आहे.
राष्ट्रवादी संवाद यात्रेला संबोधित करताना एकनाथ खडसे यांनी हा इशारा दिला. काल गुरुवारी रात्री 12 वाजता जामनेर येथे राष्ट्रवादी संवाद यात्रेला एकनाथ खडसे संबोधित करत होते. राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश घेताना माझ्या मागे ईडी लावली तर मी सीडी लावेल, असं मी गंमतीने म्हणालो होतो. जयंतराव मला म्हणाले, तुमच्या मागे ईडी लागली तर तेव्हा मी म्हणालो मग मी सीडी लावेल. पण खरंच माझ्या मागे ईडी लागली. त्यामुळे आपलं काम अजून बाकी आहे. त्यांनी ईडी लावली. आता सीडी लावण्याचं काम बाकी आहे, असा इशारा खडसेंनी दिला. खडसे यांच्या या इशाऱ्यामुळे भाजपमध्ये पुन्हा खळबळ निर्माण होण्याची शक्यता आहे. खडसेंनी सीडी लावल्यास कुणाकुणाचे पितळ बाहेर पडणार? असा प्रश्न सध्या चर्चिला जात आहे.
राष्ट्रवादी संवाद यात्रा | एकनाथ खडसेंचा थेट जामनेरमध्येच भव्य मेळावा pic.twitter.com/1tycGa3T2j
— महाराष्ट्रनामा न्यूज (@MahaNewsConnect) February 12, 2021
दरम्यान, नाथाभाऊ आपल्या सोबत असल्यामुळे चिंता करण्याची गरज नाही. त्यांनी सुरु केलेल्या सिंचनाच्या प्रकल्पांमुळे या भागातील सिंचन क्षेत्र वाढले. नाथाभाऊंच्या कामामुळे खान्देशातील जनतेचा पक्षाला नक्कीच पाठिंबा मिळेल, असा विश्वास राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यावेळी व्यक्त केला. जळगाव जिल्ह्यात आपण १० जागा लढवतो. इथे पक्ष बळकट करण्यासाठी एकनाथ खडसे यांच्या अनुभवाचा फायदा आपण करून घ्यायला हवा. आपण ताकदीने काम केलं तर इथे सहकार क्षेत्र, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आपल्याला जिंकता येतील, असं जयंत पाटील म्हणाले.
News English Summary: BJP leader Girish Mahajan’s Jamner constituency has been intimidated by NCP leader Eknath Khadse. I was joking about putting up a CD. But in fact, ED was installed behind me, now the work of installing CD is still left, Eknath Khadse has warned.
News English Title: You put ED enquiry against me now my time to play CD said NCP leader Eknath Khadse news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 71 रुपयांची टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक रेटिंग अपडेट, फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 5 टक्क्यांनी घसरला, घसरणीचे वादळ येणार की पुन्हा तेजी येणार – NSE: RVNL
-
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स डिफेन्स शेअर फोकसमध्ये, पुढे तेजी की मंदी येणार – NSE: BEL
-
Tata Steel Share Price | 131 रुपयांचा टाटा स्टील शेअर 190 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक आजही तेजीत – NSE: TATASTEEL
-
NHPC Share Price | पीएसयू एनएचपीसी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, फायद्याचे संकेत - NSE: NHPC
-
Post Office GDS Recruitment | महाराष्ट्र सहित ग्रामीण टपाल सेवेक पदाच्या 21,413 जागांसाठी भरती, महिना 29,380 रुपये पगार
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू, गुंतवणूकदार संभ्रमात – NSE: RELIANCE
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांकडून मोठे संकेत, टॉप ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE
-
Zomato Share Price | मजबूत कमाईचे संकेत, 214 रुपयांचा झोमॅटो शेअर 400 रुपयांची पातळी गाठणार – NSE: ZOMATO
-
Post Office Scheme | मुद्दलापेक्षा जास्त व्याज मिळणार या पोस्ट ऑफिस योजनेत, 20 लाख रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळेल