23 February 2025 2:04 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

आदित्य ठाकरेंची 'जन आशीर्वाद' यात्रा फडणवीसांना शहं देण्यासाठीच, भाजपात चर्चा रंगली

Yuvasena, Aaditya Thackeray, Uddhav Thackeray, Shivsena, Devendra Fadanvis, Ashirwad Yatra, State Assembly Election 2019

मुंबई: विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आदित्य ठाकरे यांना शिवसेनेकडून थेट सत्तेत महत्वाच्या पदावर विराजमान करण्याच्या हालचाली जोरदारपणे सुरु असल्याची चर्चा रंगली आहे. त्याच अनुषंगाने थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच शहं देण्यासाठी युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्र पिंजून काढणार असल्याचे वृत्त आहे. आदित्य ठाकरे येत्या शुक्रवारपासून ‘जन आशीर्वाद यात्रे’ला सुरुवात करणार आहेत. अंबाबाईच्या दर्शनानंतर कोल्हापूरातून या यात्रेला सुरुवात होईल. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदित्य यांची ही यात्रा शिवसेनेसाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार असून एकप्रकारे आदित्य ठाकरे यांना थेट मंत्रालयात सत्तेत विराजमान करण्याच्या योजना शिवसेनेने आखल्या आहेत.

दरम्यान फडणवीसांची ‘विकास यात्रा’ १ ऑगस्टपासून काढण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षासाठी सकारात्मक वातावरण निर्मिती आणि कार्यकर्त्यांना स्फूर्ती देण्यासाठी तसेच ५ वर्षातील कामं लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांकडून केला जाणार आहे. परंतु मुख्यमंत्र्यांची विकास यात्रा सुरू होण्याआधीच घाईघाईत आदित्य ठाकरे ‘जन आशीर्वाद’ यात्रेला सुरुवात करतील. येत्या शुक्रवारपासून या यात्रेला आरंभ होईल. कोल्हापूरातील अंबाबाईचा आशीर्वाद घेऊन या यात्रेला सुरुवात होईल. कोल्हापूरातील दोन्ही लोकसभा मतदारसंघांमध्ये यंदाच्या निवडणुकीत शिवसेनेला यश मिळालं आहे.

लोकसभा निवडणुकीत राज्यात चांगलं मतदान झाल्याने मतदान करणाऱ्यांचे आभार मानण्यासाठी आणि मतदान न केलेल्यांची मनं शिवसेनेकडे वळवण्यासाठी आदित्य ठाकरे ‘जन आशीर्वाद यात्रा’ काढणार असल्याचे समजते. सध्या शिवसेना, भारतीय जनता पक्षामध्ये सगळं काही आलबेल असल्याचं दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून सांगितलं जात आहे. परंतु तरी देखील शिवसेना कोणत्याही प्रकारचा धोका पत्करणाच्या मनस्थितीत नाही. २०१४चा अनुभव गाठीशी असल्याने आणि भाजपावर पूर्ण विश्वास नसल्याने भाजप थेट निवडणुकीच्या वेळी युती तोडूदेखील शकतो हे माहित असल्याने शिवसेना हा धोका टाळण्यासाठी कामाला लागली आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Aditya Thakarey(103)#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x