15 January 2025 10:33 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांनो महिना 2000 रुपयांची गुंतवणूक करा, मिळाले 4 कोटी रुपये परतावा Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या NPS Calculator | तुमच्या पत्नीमुळे महिन्याला 44,793 रुपये पेन्शन मिळेल आणि 1 कोटी 12 लाख रुपये परतावा देईल ही योजना IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, मिळेल 45 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: HAL RattanIndia Power Share Price | 12 रुपयाचा शेअर खरेदीला गर्दी, तुफान तेजी, यापूर्वी 502% परतावा दिला - NSE: RTNPOWER Motilal Oswal Mutual Fund | पगारदारांना सुद्धा श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, डिटेल्स सेव्ह करून ठेवा
x

Aaditya Thackeray | आदित्य ठाकरेंच्या रत्नागिरीतील सभेत तुफान गर्दी, महिला आणि तरुणांची लक्षणीय उपस्थिती, शिंदें गटाला केलं लक्ष

Yuvasena leader Aaditya Thackeray

Aaditya Thackeray on Konkan Tour | युवसेना प्रमुख आदित्य ठाकरे सध्या कोकणच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या आजच्या रत्नागिरीतील सभेत तुफान गर्दी जमल्याचं पाहायला मिळाली. विशेष म्हणजे यामध्ये महिला आणि तरुणांची उपस्थिती लक्षणीय होती. दरम्यान, शिवसेना युवा नेता आदित्य ठाकरेंच्या झालेल्या आजच्या सभेमध्ये आदित्य शाहरुखच्या 29 वर्ष जुन्या सिनेमातील डायलॉग वापरुन जबरदस्त फटकेबाजी करताना दिसले. ‘हारके भी जितने वाले को बाजीगर कहते’, म्हणत आदित्य ठाकरेंनी शिंदे फडणवीस सरकारवर चांगलाच निशाणा साधला.

फॉक्सकॉन-वेदांता प्रकरणावरून माजी मंत्री आणि आमदार आदित्य ठाकरेंनी उदय सामंत यांच्यावर टीकास्त्र डागलं. दुसऱ्या राज्यात हे घडलं असतं, तर तिथल्या मुख्यमंत्र्यांनी उद्योगमंत्र्यांचा राजीनामा घेतला असता. या डबल इंजिन सरकारचं एक इंजिन फेल झालंय, असंही आदित्य ठाकरे म्हणाले.

1 लाख नोकऱ्या आपल्या राज्यात येणार होत्या :
शिव संवाद यात्रेदरम्यान आदित्य ठाकरे म्हणाले, “ज्या एक लाख नोकऱ्या आपल्या राज्यात येणार होत्या, त्या गेल्या कशा? जी पावणेदोन लाखांची गुंतवणूक आपल्या राज्यात येणार होती. ती गेली कशी? जो प्रोजेक्ट शंभर टक्के येणार होता. इथल्या मुलामुलींना नोकऱ्या देणार होता. याची उत्तर तर देत नाहीत, पण आमच्यावर आरोप करताहेत आमच्यामुळे गेला”, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

आम्हाला तुम्ही सरकारमधून बाहेर काढलं. तुम्ही आमच्यापेक्षा सक्षम आहात, तर मग हा प्रोजेक्ट हातातून गेला कसा. दुसरा प्रोजेक्ट रायगड लोह्यामध्ये आणणार होतो. बल्क ड्रग्ज पोर्टचा प्रोजेक्ट. महाराष्ट्रात औषधी बनवणाऱ्या कंपना सर्वाधिक आहेत. लस बनवणाऱ्या कंपन्या आहेत. त्या प्रोजेक्टमुळे ७० ते ८० हजार नोकऱ्या उपलब्ध झाल्या असत्या”, असं सांगत आदित्य ठाकरेंनी शिंदे सरकारला प्रकल्प जाण्यासाठी जबाबदार ठरवलं.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Yuvasena leader Aaditya Thackeray on Konkan Tour check details 16 September 2022.

हॅशटॅग्स

#Aaditya Thackeray(9)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x