‘बहिर्जी’ स्वराज्याचा तिसरा डोळा | महाराजांच्या शिलेदाराची गाथा मोठ्या पडद्यावर

मुंबई, २६ ऑक्टोबर : छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यनिर्मितीचं स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी त्यांना मोलाची साथ लाभली ती त्यांच्या निडर मावळ्यांची. त्यामुळे त्यांच्या एका एका मावळ्याच चरित्र आणि मोहिमा या इतिहासात सुवर्णाक्षराने लिहिले गेले आहेत. त्यामुळे आता सिनेमाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जेव्हा पडद्यावर अनुभवला जातो त्यावेळी प्रेक्षकांसाठी तो रोमांच उभे करणारा अनुभव असतो. जोवर आपला राजा सोबत आहे तोवर आपण मोठी मजल मारु हे प्रत्येक मावळ्यांनी मनावर बिंबवून घेतलं होतं.
हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेदरम्यान अशा उद्धवलेल्या समस्यांचा मागोवा घेताना शूर मावळ्यांचा इतिहास उलगडत जातो आणि या दरम्यान इतिहास आपल्याला अशाच एका अज्ञात यशस्वी शिलेदाराचे नाव समोर आणतो. अर्थात या धाडसी शिलेदाराचे नाव बरेचजण ऐकून असतील, पण त्यांचे कर्तृत्व मात्र अजूनही इतिहासाच्या पानांमध्ये कैद आढळते. हा शूर मावळा म्हणजे निष्णात बहुरूपी आणि जगातील सर्वश्रेष्ठ गुप्तहेर ‘बहिर्जी नाईक’. अशा या शूर, धाडसी, विश्वासू शिलेदाराची गाथा लवकरच ‘बहिर्जी’ स्वराज्याचा तिसरा डोळा या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
नेहमीच पडद्याआड असणाऱ्या, विविध वेषांतरे करून समोरच्याला पुरते अचंबित करून सोडणाऱ्या या बहुरुप्याची कला निर्माती मंदाकिनी किशोर काकडे सर्व सिने रसिकांच्या भेटीस घेऊन येत आहेत. लेखक किरण माने यांनी या चित्रपटाकरीता लेखनाची धुरा सांभाळली असून ‘काक माय एंटरटेनमेंट’ प्रॉडक्शन अंतर्गत निर्माती मंदाकिनी किशोर काकडे या वेगळ्या धाटणीच्या चित्रपटातून पुन्हा एकदा इतिहासाला उजाळा देत आहेत. नुकतेच या चित्रपटाचे शीर्षक पोस्टर प्रदर्शित झाले असून नेमके कोणते कलाकार या चित्रपटात दिसणार, चित्रपट कोण दिग्दर्शित करणार याकडे सिनेप्रेमींच्या नजरा वळल्या आहेत. स्वराज्याचा तिसरा डोळा म्हणून इतिहासामध्ये बहिर्जीना दिली गेलेली उपाधी लवकरच मोठ्या पडद्यावर येण्यास सज्ज होणार आहे.
News English Summary: The multi-faceted art creator and filmmaker Mandakini Kishor Kakade is all set to bring the saga of a brave, courageous warrior Bahirji Naik on the big screen. Bahirji Naik was an Indian spy and military commander in the army of Chhatrapati Shivaji Maharaj during a time when the Maratha Empire and Mughal Empire were at war. An official announcement about the launch of this film has been made by the makers of the film on their social networking page, by displaying first looks poster from the film.
News English Title: Marathi Movie Bahirji Naik a detective of Chhtrapati Shivaji Maharaj News updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 71 रुपयांची टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक रेटिंग अपडेट, फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 5 टक्क्यांनी घसरला, घसरणीचे वादळ येणार की पुन्हा तेजी येणार – NSE: RVNL
-
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स डिफेन्स शेअर फोकसमध्ये, पुढे तेजी की मंदी येणार – NSE: BEL
-
Tata Steel Share Price | 131 रुपयांचा टाटा स्टील शेअर 190 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक आजही तेजीत – NSE: TATASTEEL
-
Post Office GDS Recruitment | महाराष्ट्र सहित ग्रामीण टपाल सेवेक पदाच्या 21,413 जागांसाठी भरती, महिना 29,380 रुपये पगार
-
NHPC Share Price | पीएसयू एनएचपीसी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, फायद्याचे संकेत - NSE: NHPC
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांकडून मोठे संकेत, टॉप ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू, गुंतवणूकदार संभ्रमात – NSE: RELIANCE
-
Zomato Share Price | मजबूत कमाईचे संकेत, 214 रुपयांचा झोमॅटो शेअर 400 रुपयांची पातळी गाठणार – NSE: ZOMATO
-
Post Office Scheme | मुद्दलापेक्षा जास्त व्याज मिळणार या पोस्ट ऑफिस योजनेत, 20 लाख रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळेल