23 December 2024 10:19 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bank Cheque Double Line | चेकने पेमेंट करता? 99% लोकांना माहित नाही, त्या 2 क्रॉस रेषा म्हणजे 'अटी' असतात LPG Gas New Connection | एलपीजी गॅस कनेक्शन योजनेसह मिळेल 450 रुपयांच्या गॅस सिलेंडरचं कनेक्शन, कसा अप्लाय करा Bank Account Alert | बँक खात्यात किती रोख रक्कम जमा करता येते, लिमिट ओलांडल्यास टॅक्स भरावा लागेल, अनेकांना इन्कम टॅक्स नोटीस Nippon Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, टॉप 5 म्युच्युअल फंड योजना मालामाल करत आहेत, अनेक पटीत पैसा वाढवा Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE Ashok Leyland Share Price | बंपर कमाई होणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 7 शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, मिळेल मजबूत परतावा - NSE: TATATECH
x

VIDEO - स्वीटी सातारकर' चित्रपटाचा याड लावणारा टीजर आणि धमाकेदार गाणं

Marathi Movie Sweety Satarkar, Sangram Samel, Amruta Deshmukh

मुंबई: काही दिवसांपूर्वी अभिनेता संग्राम समेळनं स्वीटी सातारकर नामक तरुणी त्याला सतत मेसेजेस पाठवून हैराण करत असल्याची तक्रार सोशल मीडियात पोस्ट टाकून केली होती. त्यामुळे ही स्वीटी सातारकर कोण असा प्रश्न निर्माण झाला होता. या स्वीटी सातारकरचा पत्ता आता सापडला आहे. स्वीटी सातारकर या चित्रपटाचा धमाल टीजर सोशल मीडियाद्वारे सादर करण्यात आला आहे.

मुनाफ नाईक, संतोष साबळे यांनी निर्मिती केलेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन शब्बीर नाईक यांनी केलं आहे. सुमित गिरी यांनी चित्रपटाचं लेखन, संतोष मुळेकर यांनी संगीत दिग्दर्शन, फैसल महाडिक यांनी संकलन, मंगेश कांगणे आणि सुहास सावंत यांनी गीतलेखन केलं आहे. चित्रपटात अमृता देशमुख, संग्राम समेळ, विजय निकम, गौरी जाधव, वंदना वाकनीस, पुष्कर पुष्कर लोणारकर, विनम्र भाबल, प्रशांत विचारे अशी दमदार स्टारकास्ट आहे.

‘नाद नको दादा, पाठीशी बाय माझी… स्वीटी!’ असे मजेदार शब्द असलेलं ‘स्वीटी सातारकर’ या चित्रपटातलं गाणं सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आलं आहे. उडत्या चालीचं ताल धरायला लावणारं हे गाणं सोशल मीडियावर हिट होत आहे.

अत्यंत अतरंगी अशा स्वीटी सातारकर या तरुणीची गोष्ट या चित्रपटात मांडण्यात आली आहे. एका तरुणाच्या मागे लागलेल्या या स्वीटी सातारकरला तो तरुण मिळतो का अशी गोष्ट या चित्रपटात आहे. चित्रपटाचा टीजर आणि धमाकेदार गाण्यामुळे हा चित्रपट पुरेपूर मनोरंजक आणि फ्रेश दिसतो आहे. त्यामुळे या चित्रपटाकडे आता चित्रपटप्रेमींचं लक्ष लागलं आहे.

 

हॅशटॅग्स

#filmy(45)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x