1 February 2025 10:24 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Loan EMI Alert | कर्ज घेण्याचा विचार करताय, या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, पुढे अडचणी वाढणार नाहीत PPF Scheme | PPF योजनेतून लखपती होण्याचं स्वप्न पूर्ण होणार, केलेल्या गुंतवणुकीवर मिळणारं 68 लाखांचे रिटर्न Vivo Y58 5G | विवोच्या 50MP कॅमेरासह येणाऱ्या 'या' जबरदस्त स्मार्टफोनवर मिळतोय बंपर डिस्काउंट, स्वस्तात मस्त स्मार्टफोन SBI Mutual Fund | श्रीमंत करणाऱ्या 7 म्युच्युअल फंडांची यादी सेव्ह करा, वेगाने वाढेल पैशाने पैसा, नोकरदारांचे खास पसंती New Income Tax Slab | पगारदारांनो, तुमचं 12 लाख रुपयांपर्यंतचे वार्षिक उत्पन्न टॅक्स फ्री कसं झालं 'या' चार्टमधून जाणून घ्या IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रा शेअर फोकसमध्ये, फायद्याची अपडेट आली, टार्गेट प्राईस नोट करा - BSE: IRB Bonus Share News | जबरदस्त संधी, ही कंपनी 1 शेअरवर 1 फ्री बोनस शेअर देणार, फायदा घ्या - BSE: 512008
x

Subodh Bhave Post on Petrol Diesel Rates | नेहमी वाटायचं की सोनं-चांदीचा माज कोणीतरी उतरवला पाहिजे

Subodh Bhave Post on Petrol Diesel Rates

मुंबई, 10 ऑक्टोबर | मराठीतील सुप्रसिद्ध अभिनेते सुबोध भावे नेहमीच समाज माध्यमांवर सक्रीय असतात, प्रत्येक विषावर ते आपलं मत व्यक्त करत असतात. आता अभिनेते सुबोध भावे यांची एक फेसबुक पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये त्यांनी सोनं आणि चांदीची तुलना पेट्रोल डिझेलसोबत (Subodh Bhave Post on Petrol Diesel Rates) केली आहे.

Subodh Bhave Post on Petrol Diesel Rates. Well known Marathi actor Subodh Bhave is always active on social media, he is expressing his opinion on every subject. Now, a Facebook post by actor Subodh Bhave is going viral on social media. In this post, he compares gold and silver with petrol and diesel rates :

काय म्हटलं आहे अभिनेते सुबोध भावे यांनी:
सतत असं वाटायचं की या सोनं आणि चांदीचा माज कोणीतरी उतरवला पाहिजे,त्यांना त्यांच्या किंमतीमुळे आपण लैच भारी असं वाटायला लागलं होतं.दरवर्षी सण आला की त्यांचा रुबाब वाढायचा. पण आता नाही ….. कारण आता पेट्रोल आणि डिझेल यांनी सोन्या,चांदीची मस्ती उतरवली. आता दागिने पण यांचेच करणार,बँकेत ठेव म्हणून पण हेच ठेवणार. स्वतःबरोबर अख्खा बाजारभाव वाढवण्याच यांचं कर्तृत्व अफाट आहे . हे दोन नवीन भारीतले दागिने आम्हाला दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!

सुबोध भावे यांचा जन्म 9 नोव्हेंबर 1975 ला झाला. ते एक लोकप्रिय भारतीय अभिनेते, लेखक, निर्माते आणि दिग्दर्शक आहेत जे मराठी चित्रपटातील त्यांच्या कामासाठी ओळखले जातात. त्यांनी अनेक व्यावसायिक यशस्वी आणि समीक्षकांनी प्रशंसित केलेल्या मराठी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. डॉ. काशिनाथ घाणेकर, बालगंधर्व, कट्यार काळजात घुसली या चित्रपटांमधील कामासाठी ते खास ओळखले जातात.

सुबोधने असंख्य मराठी टीव्ही मालिका, चित्रपट आणि थिएटरमध्ये अभिनय केला आहे. अनेक नामवंत व्यावसायिकांनी त्यांचं कौतुक केलं आहे. त्यांच्या प्रख्यात भूमिकांमध्ये लोकमान्य-एक युग पुरुष या चित्रपटातील बाल गंगाधर टिळक यांच्या भूमिकेचा समावेश आहे, जो देशातील सर्वात मोठ्या समाज सुधारकांपैकी एक बायोपिक आहे. कलाकार नारायणराव राजहंस आणि गंधर्व गाथा नावाच्या पुस्तकावर आधारित असलेल्या बालगंधर्व चित्रपटातही त्यांच्या बालगंधर्वांच्या भूमिकेचं कौतुक झालं.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: Subodh Bhave Post on Petrol Diesel Rates comparing with Gold and Silver rates.

हॅशटॅग्स

#Petrol Price(96)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x