VIDEO | मराठीतला पहिला झॉम्बी सिनेमा | ‘झोंबिवली’ येतोय
मुंबई, १६ फेब्रुवारी: फास्टर फेणे, क्लासमेट्स, माऊली ह्यासारख्या अप्रतिम चित्रपटांचे दिग्दर्शक आदित्य सरपोतदार लवकरच त्यांचा बहूचर्चित ‘ झोंबिवली ‘ हा सिनेमा प्रेक्षकांसमोर सादर करणार आहेत. चित्रपटाच्या पोस्टर लाँचनंतर प्रेक्षकांची उत्सुकता वाढली होती. नुकताच ह्या चित्रपटाचा टिझर लाँच करण्यात आला आहे . अमेय वाघ, ललित प्रभाकर आणि वैदेही परशुरामी ह्यांची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट ३० एप्रिल पासून प्रेक्षकांना चित्रपटगृहात पाहता येईल.
२०२० मध्ये सिनेसृष्टीतल्या सर्वच कामांना ब्रेक लागला होता, पण झोंबिवली हा पहिला मराठी चित्रपट आहे ज्याचे चित्रीकरण अनलॉक फेजमध्ये करण्यात आले होते. यौडली फिल्म्सची निर्मिती असलेल्या झोंबिवलीचे चित्रीकरण मुंबईसह लातूरमध्ये करण्यात आले आहे. चित्रीकरण दरम्यान सर्व कलाकार व टीमने सरकारने आखून दिलेल्या नियमांचे पालन करूनच चित्रीकरण केले. त्याचबरोबर झोंबिवली हा असा पहिला मराठी चित्रपट असेल ज्याची चित्रपटगृहात रिलीज होण्याची घोषणा झाली आहे.
मुंबईच्या एका लोकप्रिय आणि गजबजलेल्या उपनगराचा ताबा घेणाऱ्या झोंबीवर हा चित्रपट आधारित आहे. टिझरमध्ये प्रेक्षकांना हॉरर आणि कॉमेडीचे मिश्रण बघायला मिळेल. अमेय, ललित आणि वैदेही हे तिन्ही कलाकार प्रेक्षकांच्या मनात कुतूहल आणि हास्याचे वातावरण निर्माण करतात.
अभिनेता ललित प्रभाकरनं याचं पोस्टरही आपल्या सोशल मिडिया अकाऊंटला पोस्ट केलं आहे. मराठीतला पहिला झॉम्बी सिनेमा – ‘झोंबिवली’!!!! टीझर येत आहे उद्या, ते पोहोचतीलच, तुमच्या दारापर्यंत अशा कॅप्शनसह त्याने या सिनेमाविषयी आपल्या चाहत्यांना सांगितलं. ३० एप्रिलला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
News English Summary: Aditya Sarpotdar, the director of amazing films like Faster Fene, Classmates, Mauli, will soon be presenting his much talked about film ‘Zombivali’. The curiosity of the audience was heightened after the poster launch of the film. The teaser of this movie has been launched recently. The film, starring Amay Wagh, Lalit Prabhakar and Vaidehi Parashurami, will be available in cinemas from April 30.
News English Title: Zombivli Teaser Aditya Sarpotdar Amey Lalit and Vaidehi news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा की - NSE: NBCC
- NTPC Share Price | NTPC कंपनीबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: NTPC
- ESIC Benefits | पगारदारांनो, हलक्यात घेऊ नका, ESIC अंतर्गत कर्मचाऱ्यांना मिळतात अनेक लाभ, डिटेल्स लक्षात ठेवा - Marathi News
- Diwali Special Ubtan | दिवाळीच्या दिवसांत दररोज करा अभ्यंगस्नान; घरच्या घरी बनवा सुगंधित उटणे, चेहऱ्यावर येईल सुंदर चमक
- Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today
- Edelweiss Mutual Fund | अजून काय हवं, महिना बचतीवर हा फंड 1.12 कोटी रुपये देईल, फायद्याची स्कीम सेव्ह करा - Marathi News
- Tata Steel Vs JSW Steel Share Price | पॉलिसी चेंज, टाटा स्टील आणि JWS स्टील शेअर्सला होणार फायदा- NSE: TATASTEEL
- Suzlon Share Price | सुझलॉन शेअरबाबत महत्वाचे संकेत, मल्टिबॅगर शेअर BUY, SELL की HOLD करावा - NSE: SUZLON
- Post Office Scheme | पोस्टाच्या या योजनेतून मिळेल चांगलाच फायदा, प्रत्येक महिन्याला मिळतील 9,250 रुपये - Marathi News