14 January 2025 9:22 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांनो महिना 2000 रुपयांची गुंतवणूक करा, मिळाले 4 कोटी रुपये परतावा Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या NPS Calculator | तुमच्या पत्नीमुळे महिन्याला 44,793 रुपये पेन्शन मिळेल आणि 1 कोटी 12 लाख रुपये परतावा देईल ही योजना IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, मिळेल 45 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: HAL RattanIndia Power Share Price | 12 रुपयाचा शेअर खरेदीला गर्दी, तुफान तेजी, यापूर्वी 502% परतावा दिला - NSE: RTNPOWER Motilal Oswal Mutual Fund | पगारदारांना सुद्धा श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, डिटेल्स सेव्ह करून ठेवा
x

Manoj Jarange Patil | जरांगे पाटील यांनी प्रचंड मेहनत केली, पण एक चुकीचा निर्णय त्यांचा 'अण्णा हजारे' करून जाईल - Marathi News

Manoj Jarange Patil

Manoj Jarange Patil | एका बाजूला मराठा आरक्षणाचा विषय आणि दुसऱ्या बाजूला जाहीर झालेल्या विधानसभा निवडणुका असे दोन विषय समोरासमोर आल्याने सर्वच राजकीय पक्ष चिंतेत आहेत. तसेच मराठा आरक्षण आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील नेमकी कोणती भूमिका घेणार यावर देखील सर्वाचं लक्ष आहे. पण मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेकडे सर्वाधिक लक्ष आहे ते सत्ताधारी पक्षाचे आणि विशेष करून भारतीय जनता पक्षाचे, असं म्हटलं जातंय.

मनोज जरांगे पाटील यांची भूमिका विधानसभेत नेमकं कोणाचं नुकसान करणार याबद्दल कोणीही १००% खात्रीने काहीच सांगू शकत नाहीत, पण अनुभवातून काही अंदाज नक्कीच व्यक्त करता येऊ शकतो.

मनोज जरांगे-पाटील यांनी उद्या म्हणजे 20 ऑक्टोबर रोजी आंतरवली सराटीत बैठक घेऊन उमेदवारांना पाडायचे की आपले स्वत:चे उमेदवार उभे करायचे याबाबत निर्णय घेणार आहे. माझा समाज माझ्यासोबत आहे, मला पुन्हा पुन्हा शक्ती प्रदर्शन करायची काहीही गरज नाही.

दसरा मेळावा आणि तिथे जमलेला जनसागर
विरोध करणाऱ्या लोकांची तोंड दसरा मेळावा आणि तिथे जमलेला जनसागर पाहून बंद झाली असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांना सांगितले. मराठा समाज भाजपात मोठ्या प्रमाणात आहेत. भाजप पक्षातील मराठ्यांना सुद्धा वाटत होते की देवेंद्र फडणवीस न्याय देतील.परंतू फडणवीसांनी इतर काही जातींना ओबीसीत घातले, परंतू मराठ्यांना नाही, हे पाहून भाजप पक्षातील मराठे देखील नाराज झाले आहेत असेही जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्यावर बरसले
फडणवीसांनी यांनी मराठ्यांच्या तोंडाशी आलेला घास घालवला असल्याची टीकाही मनोज जरांगे-पाटील यांनी केली आहे. मराठ्यांची लेकरंच जर जगली नाहीत तर नेत्याला मोठा करुन काय करायचं, नेत्यांची पोरं परदेशात शिकत आहेत. पण या लोकांमुळेच नाईलाजाने मला राजकारण शिकावं लागलं आहे, असे देखील मनोज जरांगे पाटील म्हणाले.

पण आता पुढे काय?
मनोज जरांगे-पाटील यांनी उद्या म्हणजे 20 ऑक्टोबर रोजी आंतरवली सराटीत बैठक घेऊन उमेदवारांना पाडायचे की आपले स्वत:चे उमेदवार उभे करायचे याबाबत निर्णय घेणार आहे. या विषयाला अनुसरून राजकीय विश्लेषकांनी त्याची मतं व्यक्त केली आहेत.

जरांगे-पाटील यांनी उमेदवार उभे करावेत असं भाजप नेते पडद्याआड का बोलत आहेत?
अनेक भाजप नेत्यांसोबत ऑफ कॅमेरा बोलताना सांगत आहेत की, जरांगे-पाटील यांनी उमेदवार उभे करावेत अशी भाजपाची इच्छा आहे, कारण त्याचा फटका सर्वांनाच बसले, पण सर्वात कमी फटका आणि अधिक फायदा भाजपाला होईल असं भाजपच्या श्रेष्ठींना वाटतंय. या विधानसभा निवडणुकीत मत विभागणी हाच निर्णायक मुद्दा ठरणार आहे.

जरांगे-पाटील यांनी उमेदवार दिल्यास कोणती भीती?
जरांगे-पाटील यांनी उमेदवार दिल्यास, उमेदवारीच्या विषयामुळे आपसात भांडणं आणि एकमेकांच्या विरोधातील वक्तव्य मूळ आरक्षणाच्या विषयावरच घाव घालू शकतात असं राजकीय विश्लेषकांना वाटतंय. तसेच उमेदवारीवरून जरांगे-पाटील यांच्या विरोधात एक गट निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात येतेय. तसेच जर उमेदवार निवडून आले नाही किंवा मोठ्या प्रमाणात पराभूत झाल्यास, त्यानंतर होणारे तंटे देखील आरक्षणाला मारक ठरू शकतात. आणि मराठयांनी एकमेकांना पाडलं असा संदेश जाईल.

समजा जरी काही निवडून आले तर ते राजकीय दृष्ट्या विकले जाणार नाहीत किंवा सत्तेच्या मागे धावणार नाहीत याची खात्री कोणीही देऊ शकत नाही. त्यामुळे उमेदवार देणं मूळ आरक्षणाच्या हेतूला धक्का देईल. कारण, एकदा निर्णय चुकला तर अमित शहा आणि देवंद्र फडणवीस जरांगेचा पूर्ण कार्यक्रम करतील असं देखील राजकीय विश्लेषक सांगत आहेत. कारण, जरांगे यांच्या चुकीच्या निर्णयामुळेच अमित शहा आणि देवंद्र फडणवीस अधिक मजबूत होतील असं म्हटलं जातंय.

तिसऱ्या आघाडीपासून सावध राहणं गरजेचं?
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तिसऱ्या आघाडीचे नेते सुद्धा जरांगे-पाटील यांच्यासोबत फोटो काढण्यास उत्सुक असल्याचं पाहायला मिळतंय. राजू शेवटी वगळल्यास तिसऱ्या आघाडीचे नेते भाजपच्या जवळचे असल्याने त्यांचा हेतू केवळ ‘वोट कटवा’ पक्ष म्हणून होऊ लागला आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर एखादा निवडून आला तरी तो पुन्हा जरांगे-पाटील यांच्या आजूबाजूला सुद्धा फिरकताना दिसणार नाही असं राजकीय विश्लेषक अंदाज व्यक्त करत आहेत.

अण्णा हजारे आणि ते आंदोलन
अण्णा हजारे यांनी काही वर्षांपूर्वी मोठं आंदोलन केलं होतं, पण आज अण्णा हजारे नेमके कुठे आहेत हाच प्रश्न विचारला जातो. कारण, २०१४ सत्तेत आलेल्या भाजपने त्यांचा पूर्ण कार्यक्रम केला हा मागील अनुभव आहे. उद्या मनोज जरांगे पाटील यांचा सुद्धा ‘अण्णा हजारे’ होईल याची चर्चा समाज माध्यमांवर सुरु झाली आहे. आणि त्याच कारण म्हणजे, त्यांनी घेतलेल्या निर्णयाने भाजपचा फायद्या होणार की नुकसान यावर सगळं अवलंबून आहे.

केंद्रात भाजपकडे बहुमत नाही आणि महाराष्ट्रातही सत्तेतून बाहेर गेल्यास
केंद्रात भाजपकडे बहुमत नाही आणि महाराष्ट्रात सुद्धा भाजप सत्तेतून बाहेर गेल्यास फडणवीस सुद्धा राजकीयदृष्ट्या अडचणीत येतील असं म्हटलं जातंय. तसं झाल्यास सर्वच नेते जरांगे-पाटील यांचा धसका घेतील. पण मनोज जरांगे-पाटील यांच्या कोणत्याही चुकीच्या निर्णयाने भाजप मजबूत झाली, तर अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस सुद्धा मजबूत होतील. त्यानंतर मात्र मनोज जरांगे-पाटील यांचं काही खरं नाही, असं राजकीय विश्लेषक मत व्यक्त करत आहेत. कारण SIT सारख्या धमक्या त्यांना आधीच दिल्या गेल्या होत्या.

मनोज जरांगे-पाटील यांच्याकडे सर्वात मोठं एकमेव अस्त्र
मनोज जरांगे-पाटील यांच्याकडे सर्वात मोठं एकमेव अस्त्र आहे आणि ते म्हणजे ‘उमेदवारांना पाडा’. कारण हेच अस्त्र निवडणुकीच्या निकालानंतरही प्रभावी राहील आणि समाज सुद्धा एकत्र राहील. परिणामी, मूळ आरक्षणासाठी येणारं नवं सरकार सुद्धा प्रचंड दबावाखाली राहील. अन्यथा जरांगे यांच्या चुकीच्या निर्णयाने सर्वकाही संपुष्टात येऊ शकतं आणि नंतर कितीही आंदोलनं करा, कोणीही बघणार नाही. त्यामुळे उद्या मनोज जरांगे-पाटील कोणता निर्णय घेणार ते पाहावं लागणार आहे.

Latest Marathi News | Manoj Jarange Patil on Maratha  Reservation 19 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Manoj Jarange(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x