23 February 2025 5:06 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

VIDEO | अखेर आज अनिरुद्ध-संजनाच्या नात्याचे सत्य कुटुंबाला कळणार

Aai Kuthe Kay Karte, Sanjana and Aniruddh, Deshmukh family

मुंबई, ३ नोव्हेंबर: स्टार प्रवाह वाहिनीवरील मराठी टीव्ही मालिका ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe kay karte) सध्या प्रकाशझोतात असून सध्या सर्वांच्या आवडीची मालिका झाली आहे. TRP बाबतीतही ही मालिका उच्चांक गाठत असून यातील व्यक्तिरेखा देखील लोकांना आवडू लागल्या आहेत. मात्र सध्या या मालिकेतील कुटुंब सध्या धक्कादायक वळणार आहे आणि त्यामुळे प्रेक्षकांची देखील उत्कंठा वाढली आहे.

स्वतःच्या कुटुंबाटच जग शोधणारी आई म्हणजे अरुंधतीला पतीचं सत्य माहित असलं तरी आता हे सत्य पतीच्याच तोंडून कुटुंबासमोर येणार आहे. अनिरुद्धचे संजनासोबत असणारे नाते कुटुंबासमोर उघड झाल्यानंतर अनिरुद्ध बद्दल कुटूंबाचा नेमका विचार काय होणार याची उत्कंठा प्रेक्षकांना आहे. विशेष म्हणजे यावर आई-अप्पांपासून घरातील मुलांच्या मनात अनिरुद्ध बद्दल काय प्रतिमा निर्माण होणार ते पाहावं लागणार आहे. विशेष म्हणजे मालिकेतील व्हिलन असलेला अनिरुद्ध त्याच्या आईच्या मनातील हिरो आहे आणि नेमकी आईची मुलाबद्दल भूमिका काय असणार याची देखील प्रेक्षकांना उत्कंठा आहे.

विशेष म्हणजे अरुंधतीचं आयुष्य नेमकं कोणत्या वळणावर जाणार हे देखील महत्वाचं ठरणार आहे. घरातील वडीलधारे म्हणजे अप्पांच्या आजारपणानंतर मोकळ्या वातावरणात वेळ व्यथित करण्यासाठी देविकाने अरुंधतीला (Aai Kuthe kay Karte) एक छान ‘हॉलिडे पॅकेज’ भेट म्हणून दिले आहे. त्यासाठीच संपूर्ण कुटुंब लोणावळ्याला सध्या एका रिसॉर्टवर वास्तव्यास आहेत. नेमके याच ठिकाणी संजना आणि अनिरुद्ध सुद्धा वास्तव्यास असून येथेच त्यांच्या नात्याचं गुपित कुटुंबासमोर येणार आहे आणि तेदेखील अनिरुद्धच्या तोंडून.

 

News English Summary: The Marathi TV series ‘Aai Kuthe Kay Karte’ on Star Pravah is currently in the limelight and has become everyone’s favorite series. The series is also reaching its peak in terms of TRP and people are also starting to like the personas in it. But right now the family in the series is about to take a shocking turn and so has the audience’s curiosity.

News English Title: Aai Kuthe Kay Karte today Sanjana and Aniruddh will caught by Deshmukh family News updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Marathi TV Serial(10)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x