VIDEO | मयुरी देशमुखचं लवकरच हिंदीत पदार्पण | ती दुःखातून सावरते आहे
मुंबई, ८ नोव्हेंबर: मराठी अभिनेत्री ‘मयुरी देशमुख’ लवकरच हिंदीत मालिकेत पदार्पण करत आहे. स्टार प्लस वाहिनीवरील ‘इमली’ या मालिकेत मयुरी झळकणार आहे. ‘खुलता कळी खुलेना’ या मराठी मालिकेतून मयुरी देशमुख प्रत्येक मराठी चाहत्यांच्या मनात पोहोचली होती.
पती आणि अभिनेता आशुतोष भाकरे याच्या धक्कादायक आत्महत्येनंतर ४ महिन्यांनी मयुरीने नवा प्रोजेक्ट हाती घेतल्याने तिचा चाहता वर्ग आनंद व्यक्त करत आहे. दरम्यान, ‘इमली’ या मालिकेत मयुरी देशमुखसह मराठी अभिनेता गश्मीर महाजनी आणि अभिनेत्री सुम्बुल तौकीर देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. यामध्ये ती अभिनेता गश्मीर महाजनीसोबत स्क्रीन शेअर करणार आहे.
‘कुल्फी कुमार बाजेवाला’ या लोकप्रिय मालिकेची ‘फोर लायन्स’ ही निर्मिती संस्था ‘इमली’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणतेय. ही मालिका हिंदी भाषेत असली तरी यात गश्मीर आणि मयुरी असे दोन ओळखीचे मराठी चेहरे झळकणार आहेत. यासंदर्भात मयुरीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर या मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. ‘तुम्हा सर्वांनी माझ्यासाठी व माझ्या कुटुंबीयांसाठी केलेल्या प्रार्थनांसाठी मी कृतज्ञ आहे. तुमच्या प्रेमातूनच प्रोत्साहन घेत मी नवीन सुरुवात करतेय. तुमच्या शुभेच्छा माझ्यासोबत असू द्या’, असं तिने या प्रोमो शेअर करत म्हटलंय.
News English Summary: Marathi actress ‘Mayuri Deshmukh’ is making her Hindi series debut soon. Mayuri will be seen in the series ‘Tamarind’ on Star Plus channel. Mayuri Deshmukh had reached the minds of every Marathi fan through the Marathi series ‘Khulta Kali Khulena’. Four months after the shocking suicide of her husband and actor Ashutosh Bhakre, Mayuri has taken up a new project and her fans are happy. Meanwhile, Marathi actor Gashmir Mahajani and actress Sumbul Taukir will also be seen in the lead roles in ‘Imli’. In this, she will share the screen with actor Gashmir Mahajani.
News English Title: Imli Mayuri Deshmukh Debut Starring Gashmir Mahajani entertainment updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Loan EMI Payment | तुम्ही सुद्धा EMI भरायला विसरता, तुमच्या एका चुकीमुळे होईल प्रचंड नुकसान, संपूर्ण डिटेल्स वाचा - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- NTPC Share Price | मल्टिबॅगर एनटीपीसी शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NTPC
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, पुन्हा मोठी कमाई होणार - NSE: TATAMOTORS