22 December 2024 7:40 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Nippon Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, टॉप 5 म्युच्युअल फंड योजना मालामाल करत आहेत, अनेक पटीत पैसा वाढवा Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE Ashok Leyland Share Price | बंपर कमाई होणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 7 शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, मिळेल मजबूत परतावा - NSE: TATATECH Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन सहित हे 5 शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON NHPC Share Price | NHPC सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC SIP Calculator | 12 बाय 12 चा फॉर्म्युला! 1000 रुपयांच्या बचतीतून मिळेल 1 कोटी रुपयांचा परतावा, लक्षात ठेवा
x

VIDEO - तर ‘हा’ अभिनेता आहे | लयभारी कारभारी मालिका

पुणे, ८ ऑक्टोबर : अडीच ते तीन महिन्यांच्या मोठ्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा कलाकार मंडळी प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाले आहेत. अनलॉकची प्रक्रिया सुरु झाल्यानंतर अनेक मालिका, चित्रपट यांचं पुन्हा एकदा नव्यानं चित्रीकरण सुरु झालं आहे. त्यामुळे सध्या नव्या, फ्रेश एपिसोडसह अनेक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

दरम्यान, याच पार्श्वभूमीवर झी मराठी वाहिनीने एका नव्या मालिकेची घोषणा केली ‘कारभारी लयभारी’ असं या नव्या मालिकेचं नाव आहे. या मालिकेचा प्रोमो काही दिवसांपूर्वी समोर आला होता. यामध्ये एक युवा नेता जोशपुर्ण भाषण करताना दिसत आहे. “अरे ही माणसं आमची, हा महाराष्ट्र आमचा आहे. मग सत्ता पण आमची. आम्ही का जायचं त्यांच्या दारात; ते येतील आमच्या दारी. आम्ही इथले कारभारी..” असे या भाषणातील बोल आहे.

 

View this post on Instagram

 

नवी मालिका ‘कारभारी लयभारी’ लवकरच….#KarbhariLaybhari #zeemarathi

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial) on

सध्या सोशल मीडियावर ‘कारभारी लयभारी’ या मालिकेच्या टिझरनं चांगलाच धुमाकूळ घातला आहे. पाठमोऱ्या दिसणाऱ्या या युवा नेत्याच्या भूमिकेत कोण असेल याबाबत प्रेक्षकांना मोठी उत्सुकता लागली होती. दरम्यान, आता मालिकेतील मुख्य भूमिका साकारणाऱ्या कलाकारांवरुन पडदा उचलण्यात आला आहे.

 

View this post on Instagram

 

लवकरच येतायत ‘कारभारी लयभारी’ #ZeeMarathi #KarbhariLaybhari

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial) on

‘लागीरं झालं जी’ या मालिकेतील विक्रम म्हणजेच निखिल चव्हाण ‘कारभारी लयभारी’ या मालिकेत मुख्य भूमिकेत झळकणार आहे. निखिल इथं एका नव्या भूमिकेतून तुमच्या भेटीला आला आहे. शिवाय ही राजकारणाची जोड असणारी एक प्रेमकहाणी आहे. हे सुद्धा मालिकेचा व्हिडिओ पाहून लक्षात येत. नुकतंच मालिकेचा ऑफिशल टिझर रिलीज करण्यात आला आहे.

 

News English Summary: Channel Zee Marathi is all set to come up with a new political drama titled Karbhari Lay Bhari. The promo of the serial was released recently and has been getting the audience anticipated with intriguing details. Fans have been speculating that the show will be based on the life of Raj Thackeray and have also been making guesses about the possible cast line up according to their observations.

News English Title: Karbhari Lay Bhari cast serial promo around Raj Thackeray Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#Marathi TV Serial(10)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x