10 January 2025 12:49 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPF Provident Fund | तुम्हाला सुद्धा 50 हजार पर्यंत पगार आहे का, तुमच्या EPF खात्यात 2.5 कोटी रुपये जमा होणार, कसे पहा Srestha Finvest Share Price | 75 पैशाचा पेनी शेअर फोकसमध्ये, जोरदार खरेदी, अप्पर सर्किट हिट करतोय - Penny Stocks List IREDA Share Price | पीएसयू IREDA कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा की SELL, तज्ज्ञांनी दिला सल्ला - NSE: IREDA IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये शेअरचा धुमाकूळ, पहिल्याच दिवशी मिळेल मजबूत परतावा - IPO Watch Flipkart Sale 2025 | नव्या वर्षाच्या फ्लिपकार्ट सेलची तारीख जाहीर; लॅपटॉप, स्मार्टफोन आणि नवनवीन वस्तूंवर मिळणार बंपर डिस्काउंट Smart Investment | नुकतेच नोकरीला लागला असाल तर करा हे एक काम; कोटींच्या घरात पैसे कमवाल, जाणून घ्या सविस्तर माहिती Quant ELSS Tax Saver Fund | गुंतवणूक 10 हजारांची आणि नफा 3 कोटींचा; या फंडांची योजना करोडपती बनवतेय
x

VIDEO | 'कारभारी लयभारी' मालिकेतील अभिनेत्री गंगाला अज्ञातांकडून रस्त्यात मारहाण

Karbhari Layabhari,TV serial, actress Ganga

मुंबई, २७ फेब्रुवारी: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘कारभारी लयभारी’मधील अभिनेत्री गंगा हिला मुंबईतील रस्त्यावर काही लोकांनी मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. स्वत: गंगाने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत आपबिती कथन केली आहे.

‘कारभारी लयभारी’ मालिकेत गंगा रोजच्या प्रमाणे चित्रीकरण संपवून घरी जायला निघाली होती. नेहमी प्रमाणे ती बसस्टॉपवर बसची वाट पाहात बसली होती. दरम्यान काही लोकं तेथे आले आणि त्यांनी तिला विनाकारण मारहाण करायला सुरुवात केली. गंगा कशीबशी रिक्षा पकडून तेथून घरी पोहोचली. रिक्षामध्ये बसल्यानंतर तिने रडतरडत हा व्हिडिओ शूट केला आहे. गंगाला मारणार कोणी केली? का केली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

गंगाने काय सांगितले?
‘मी नेहमी प्रमाणे बस स्टॉपवर बसची वाट पाहात होते. अचानक तेथे काही मुले आली आणि मला विनाकारण मारहाण करु लागली. मी काय करु? कुठे जाऊ? कोणाची मदत घेऊ? प्लीज मला सांगा’ असे गंगा रडत व्हिडिओमध्ये सांगताना दिसत आहे.

 

News English Summary: Actress Ganga from the popular small screen series ‘Karbhari Layabhari’ has been beaten up by some people on the streets of Mumbai. Ganga herself has shared the video on social media.

News English Title: Karbhari Layabhari serial actress Ganga video viral on social media news updates.

हॅशटॅग्स

#Marathi TV Serial(10)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x