महत्वाच्या बातम्या
-
मोदी तेरे राज मे, सायकल आगयी हाथ मे | इंधन दरवाढ, महागाईविरोधात काँग्रेसचा सायकल-बैलगाडी मोर्चा
राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात भरपावसात सभा घेतली होती. त्याचाच कित्ता गिरवीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही भरपावसात भिजत इंधन दरवाढ आणि महागाईच्या विरोधात सायकल मोर्चा काढला. यावेळी ‘माेदी तेरे राज मे, सायकल आगीय हाथ मे’, ‘मोदी सरकार मुर्दाबाद’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.
3 वर्षांपूर्वी -
मुंडे भगिनींचे राजकारण अजून खडतर | नाराजी नाट्याच्या प्रश्नावर उत्तरावेळी फडवणीस संतापले
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार केला. बुधवारी 43 जणांनी राष्ट्रपती भवनात मंत्रिपदाची शपथ घेतली. मोदीच्या मंत्रिमंडळामध्ये 36 नवे चेहरे सहभागी झाले आहेत. तर दुसरीकडे 12 विद्यमान मंत्र्यांनी राजीनामे दिले आहे. तर महाराष्ट्रातून चार जणांना संधी देण्यात आली आहे. यामध्ये प्रीतम मुडेंनाही स्थान मिळणार अशा चर्चा होत्या. मात्र प्रीतम मुडेंना मंत्रिपद देण्यात आले नाही. यामुळे मुंडे भगिनी नाराज असल्याच्या चर्चा आहेत. आता चर्चांवर देवेंद्र फडणवीसांनी भाष्य केले आहे.
3 वर्षांपूर्वी -
नांदेड 2018 | फडणवीसांच्या काळातील सर्वात मोठ्या शासकीय धान्य घोटाळ्यात CID नंतर ED'ची उडी
फडणवीसांच्या काळातील म्हणजे 2018 च्या जुलै मध्ये राज्यातील सर्वात मोठा शासकीय धान्य घोटाळा नांदेडमध्ये उघड झाला. तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीना यांनी हा घोटाळा उघडकीस आणला होता. या धान्य घोटाळ्यात जिल्ह्य़ातील बडे राजकीय मंडळी, व्यापारी आणि महसूलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा हाथ असल्याचे पोलीस तपासात उघड झाले होते. गोर गरीबांच्या तोंडचा घास पळवणारे मोठे रॅकेट नांदेडमध्ये कार्यरत असल्याचे यात उघड झालं. पोलीसांनी या कारवाईत दहा ट्रकसह एक कोटी 80 लाखांचे धान्य जप्त करुन गुन्हे दाखल केले होते. या धान्य घोटाळ्याची व्याप्ती एवढी मोठी आहे की पारदर्शक चौकशी झाली तर अनेक बडी मासे तुरुंगात जातील अशी माहिती प्रसार माध्यमांना मिळाली आहे.
3 वर्षांपूर्वी -
मराठा आरक्षण | सुप्रीम कोर्टाने आरसा दाखवला | मोर्चे काढून वातावरण गढूळ करणारे भाजप नेते पलटले
मराठा आरक्षणाबाबत सर्वाेच्च न्यायालयाने मे महिन्यात सुनावलेल्या निकालात १०२ व्या घटनादुरुस्तीच्या व्याख्येला आव्हान देणारी केंद्र सरकारची पुनर्विचार याचिका फेटाळली आहे. ५ न्यायमूर्तींच्या घटनापीठाने गुरुवारी म्हटले की, “केंद्राच्या याचिकेवर विचार करण्यासाठी कोणताही पुरेसा आधार नाही. त्यातील उपस्थिती मुद्द्यांवर मुख्य निकालात घटनापीठाने विचार केला होता. याचिकेत दिलेल्या विविध आधारांचा मुख्य निकालातच निपटारा करण्यात आला आहे.’
3 वर्षांपूर्वी -
शिवसेनेचे लग्न आमच्यासोबत झाले | आम्ही मंगळसूत्र घातल्यानंतर अचानक नवरी पळून गेली - आ. सुरेश धस
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मंत्री विजय वडेट्टीवार हे मनाला येईल ते बोलत आहेत. राज्य सरकार मात्र काहीच करत नाही. वडेट्टीवार फडतूस असून त्यांनी बीड जिल्ह्यात पाऊल ठेवून दाखवावे. पोलिस बंदोबस्तातच त्यांचा सत्कार केला नाही तर सुरेश धस नाही, असा इशारा भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश धस यांनी दिला. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बीड शहरात साेमवारी सकाळी काढलेल्या विराट मोर्चाची वेळी त्यांनी वडेट्टीवार यांच्यावर टीका केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केल्यांनतर विराट मोर्चाला सुरुवात झाली.
3 वर्षांपूर्वी -
Job Alert | वसंतराव ना. मराठवाडा कृषी विद्यापीठ (परभणी) 07 जागांसाठी भरती
व्ही एन मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी भरती 2021. व्हीएनएमकेव्ही परभणी भरती 2021: वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी यांनी 07 एसआरएफ, प्रकल्प सहाय्यक आणि कुशल मदतनीस (हेल्पर) पदासाठी अर्ज मागविले आहे. पात्र आणि इच्छुक अर्जदार मुलाखतीसाठी येऊ शकतात, मुलाखत 30 जून 2021 रोजी घेतली जाईल.
3 वर्षांपूर्वी -
राष्ट्रवादी जोमात | भाजप समर्थक आमदार करणार राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश
सध्या सगळे राजकीय पक्ष स्वतः ला सक्षम करत असून आपलं बळ वाढवताना दिसत आहेत. अशात पंढरपूर-मंगळवेढा येथील राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार भारत भालके यांचं काही महिन्यापूर्वी निधन झालं होतं. त्यामुळे येथे पोटनिवडणूक लावण्यात आली होती. ज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार भगीरथ भालके यांचा पराभव झाला होता. परंतु, आता एक आमदार राष्ट्रवादीच्या वाटेवर असून राष्ट्रवादीचं संख्याबळ पुन्हा वाढलं आहे.
3 वर्षांपूर्वी -
शिवसैनिकांसमोर आवाज न करता शांत बसलेले मेटे शिवसैनिक गेल्यावर पत्रकार परिषदेत गरजले.... काय म्हणाले?
शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या उपस्थितीत औरंगाबाद येथे बैठक सुरु होती. मात्र, या बैठकीत अचानक गदारोळ सुरु झाला. काही तरुण अचानक बैठकीत आले. त्यांनी जोरजोरात आरडाओरड करायला सुरुवात केली. ते विनायक मेटे यांच्याजवळ आले. भाजप सरकार असताना प्रश्न का सोडवला नाही? असा सवाल या तरुणांनी केला. या तरुणांनी ही बैठक उधळून लावली.
3 वर्षांपूर्वी -
भाजपचे सरकार असताना प्रश्न का सोडवला नाही? | संतप्त शिवसैनिकांचा मेटेंच्या शिवसंग्रामच्या बैठकीत राडा
शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या उपस्थितीत औरंगाबाद येथे बैठक सुरु होती. मात्र, या बैठकीत अचानक गदारोळ सुरु झाला. काही तरुण अचानक बैठकीत आले. त्यांनी जोरजोरात आरडाओरड करायला सुरुवात केली. ते विनायक मेटे यांच्याजवळ आले. भाजप सरकार असताना प्रश्न का सोडवला नाही? असा सवाल या तरुणांनी केला. या तरुणांनी ही बैठक उधळून लावली.
3 वर्षांपूर्वी -
पीडित पुरुष | पुढच्या जन्मी अशी बायको नको रे बाबा | पुरुषांनी चक्क पिंपळाच्या झाडाची केली पूजा
बायकोच्या जाचाला कंटाळलेल्या पुरुषांनी, माझ्या बायकोसोबत आणखी जन्म देऊ नको, अशी प्रार्थना केली. बुधवार (दि 23) वाळूज परिसरातील पत्नी पीडित पुरुष आश्रमात, संघटनेच्या वतीने पिंपळाच्या झाडाचे पूजन करत महिलांप्रमाणे पुरुषांसाठी देखील कायदे करण्याची मागणी करण्यात आली.
3 वर्षांपूर्वी -
पोलिसांवरील कारवाई | अर्जुन खोतकर आणि रावसाहेब दानवे पुन्हा आमने-सामने
भारतीय जनता पक्षाचे खासदार रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकर या दोघांचा वाद काही नवीन नाही. पोलिसांनी जालना जिल्ह्यातील जाफराबाद येथील भाजप कार्यालयाची झडती घेतल्याने केंद्रीय राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांच्या तक्रारीवरून पाच पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आलं होतं. दरम्यान, पोलिसांचे निलंबन आज मागे घेण्यात आलं असून, पोलिसांवरील ही कारवाई मागे घेतल्याने अर्जुन खोतकर आणि रावसाहेब दानवे यांच्यात पुन्हा वाद निर्माण झाला आहे.
3 वर्षांपूर्वी -
निलेश आणि नितेश राणे हे काहीही करू शकत नाही, ते नुसतेच बोलतात - चंद्रकांत खैरे
एकाबाजूला सिंधुदुर्गात शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा राडा झाल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी शिवसेनेचे आमदार वैभव नाईक हे भाजप कार्यकर्त्यांच्या अंगावर धावून गेले. परंतु, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे पुढील अनर्थ टळला.
3 वर्षांपूर्वी -
BHR Scam | बडे मासे आर्थिक गुन्हे शाखेच्या ताब्यात | २ आमदारही तपास यंत्रणेच्या रडारवर?
जळगावसह राज्यात एकाच दिवशी धरपकड करीत कारवाई केल्याने बीएचआर प्रकरण चांगलेच चर्चेत आले आहे. नुकत्याच झालेल्या कारवाईने अनेकांचे धाबे दणाणले असून ठेवीदारांशी दलाली करणारे देव पाण्यात टाकून बसले आहेत. एका आमदाराचे नाव दिवसभर जोडले जात असले तरी दुसरा आमदार थोडक्यात बचावला आहे. सध्या तरी ‘वेट अँड वॉच’ची भुमिका घ्यावी लागणार असून मोठा मासा पुढील आठवड्यात पथकाच्या गळाला लागण्याची शक्यता आहे.
3 वर्षांपूर्वी -
लोकसभा २०२४ | रावसाहेब दानवे यांना पराभूत करण्यासाठी हर्षवर्धन जाधव यांची तयारी
मराठवाड्यातील सर्वाधिक चर्चेत असणारं म्हणजे कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव असंच म्हणावं लागेल. तेच हर्षवर्धन जाधव पुन्हा सक्रिय झाले आहेत आणि ते सुद्धा भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांच्या विरोधातच असं दिसतंय. कन्नड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्यातील वाद अधिक पेटण्याची शक्यता आहे. कारण, हर्षवर्धन जाधव यांनी आता थेट जालना लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत.
3 वर्षांपूर्वी -
बीड | परळी तालुक्यातील सिरसाळा येथे MIDC उभारण्याचा मार्ग मोकळा | उद्योग मंत्रालयाची मंजुरी
बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील सिरसाळा येथे MIDC उभारण्यात येणार आहे. सिरसाळा येथे MIDC उभारण्याच्या प्रस्तावाला महाराष्ट्राच्या उद्योग मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नानंतर ही एमआयडीसी साकारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
3 वर्षांपूर्वी -
मोर्चातील मेटेंच्या भाषणात केंद्राच्या जवाबदारीचा उल्लेखच नाही | फक्त फडणवीसांचा जयजयकार अन राज्य सरकारवर टीका
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन शिवसंग्रामचे नेते आणि आमदार विनायक मेटे यांनी महाविकास आघाडी सरकारला निर्वाणीचा इशारा दिलाय. येत्या 5 जुलैपर्यंत मराठा समाजाच्या मागण्या मान्य करा. अन्यथा 7 जुलैला सुरु होणारं पावसाळी अधिवेशन चालू देणार नाही, अशा शब्दात मेटे यांनी ठाकरे सरकारला इशारा दिला आहे. मराठा आरक्षणाची लढाई फक्त आजच्या मोर्चापुरती नाही. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोवर हा लढा सुरुच राहणार, ही तर फक्त सुरुवात आहे, असंही मेटे यांनी म्हटलंय.
4 वर्षांपूर्वी -
बीड | मराठा मोर्चा सांगून भाजपच मोर्चा काढण्याच्या तयारीत?
मराठा आरक्षणासाठी मराठा समाज मोठ्या प्रमाणात आक्रमक झाला आहे. अशात आज (५ जून) मराठा मोर्चा निघणार आहे. “बीडमध्ये कितीही हजार पोलिसांचा बंदोबस्त असला, तरी मोर्चा निघणार,” असा निर्धार शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांनी केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाचे सामाजिक आणि शैक्षणिक आरक्षण रद्द केल्यानंतर बीडमध्ये राज्यातील पहिला मराठा मोर्चा निघणार आहे. शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात येणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
लेकीला जमलं नाही ते पुतण्याने करून दाखवलं | ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींसाठी 82 वसतिगृहे मंजूर
सामाजिक न्याय विभागांतर्गत गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या संत भगवानबाबा वसतिगृह योजनेस आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. या योजने अंतर्गत ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींच्या शिक्षणासाठी तालुकास्तरावर वसतिगृहे उभारण्यात येणार आहेत.
4 वर्षांपूर्वी -
राणे स्वतः पत्रकारितेत | तरी लिखाणावरून लोकपत्र वृत्तपत्राच्या कार्यालयावर समर्थकांचा हल्ला
नारायण राणे स्वतः पत्रकारितेत असून प्रहार नावाचं वृत्तपत्रं चालवतात. मात्र आज घडलेल्या धक्कादायक प्रकारातून त्यांनी स्वतःच पत्रकारितेची मूल्य आणि स्वातंत्र्य बाजूला ठेवल्याचं पाहायला मिळालं. कारण लोकपत्र’ वृत्तपत्राचे संपादक रवींद्र तहकीक यांच्यावर हल्ला झाल्याची माहिती आहे. भारतीय जनता पक्षाचे राज्यसभेचे खासदार नारायण राणे यांच्या कार्यकर्त्यांनी तहकीक यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे.
4 वर्षांपूर्वी -
उजनी पाणीसंघर्ष शांत झाला | उजनीतून इंदापूरला पाणी नेण्याचा निर्णय अखेर रद्द
उजनी पाणी प्रश्नावरून वातावरण कालपर्यंत अधिकच तापल्याचं पाहायला मिळालं होतं. या धरणाच्या पाणी वाटपावरून काल सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बारामतीमधील गोविंदबाग या निवास्थानासमोर आंदोलनाच्या तयारीत असलेल्या नागेश वनकळसे व महेश पवार या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर शरद पवार यांच्या गोविंदबागतील निवासस्थासह उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहयोग सोसायटीतील घराबाहेरील सुरक्षेत वाढ करण्यात आली होती.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News