महत्वाच्या बातम्या
-
संजय राठोड यांच्या समर्थनार्थ भाजपाच्या सरपंचाचा राजीनामा
परळीतील तरुणी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात संशयाच्या भोवर्यात अडकलेले वनमंत्री संजय राठोड आज ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीला उपस्थित राहणार का, याकडे लक्ष लागलं आहे. संजय राठोड या बैठकीला ऑनलाईन हजर राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पूजाच्या संशयास्पद मृत्यूनंतर राठोड नॉट रिचेबल आहेत.
4 वर्षांपूर्वी -
स्त्रियांकडे एकटक पाहणं हा देखील विनयभंग | रोड रोमिओला ६ महिने कारावासाची शिक्षा
स्त्रियांच्या होणाऱ्या विनयभंगावर न्यायालयाने एक महत्वपूर्ण निर्णय दिला आहे. स्त्रियांकडे एकटक पाहणं हा देखील विनयभंग असल्याचे औरंगाबाद सत्र न्यायालयाने म्हटले आहे. या संदर्भात एक निर्णय देत एका रोड रोमिओला सहा महिने कारावासाची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे.
4 वर्षांपूर्वी -
बीडमध्ये शिवसंग्रामला धक्का | बडे नेते विनोद हातांगळे यांच्यासह १५० कार्यकर्ते राष्ट्रवादीत
बीडमध्ये सध्या राजकीय वातावरण तापले आहे. काका- पुतण्याच्या राजकीय युद्धात आता शिवसंग्रामला मोठा धक्का सहन करावा लागला आहे. राष्ट्रवादीचे ४ नगरसेवक शिवसेनेत गेल्यानंतर आमदार संदीप क्षीरसागर यांनी शिवसंग्रामच्या एका बड्या नेत्याला फोडल्याने बीडमधील राजकीय समीकरण बदलले आहे. शिवसंग्रामचे विनोद हातांगळे यांच्यासह तब्बल १५० कार्यकर्ते राष्ट्रवादीत दाखल झाल्याने शिवसंग्रामला मोठा धक्का बसला आहे.
4 वर्षांपूर्वी -
स्वतःच्या अहंकारासाठी 'उखाड दिया'ची भाषा | आणि राज्याच्या अस्मितेचा विषय येताच...
शिवसेनेचे मुखपत्र सामनामध्ये शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपल्या रोखटोक या सदरामध्ये औरंगाबद शहराच्या नामकरणाविषयी आपली भूमिका मांडली. यावेळी औरंगजेब कधीच सेक्यूलर नव्हता असे म्हणत आधी इतिहास वाचण्याचा अप्रत्यक्ष सल्ला संजय राऊत यांनी काँग्रेसला दिला. त्यानंतर शेलार यांनी राऊत आणि शिवसेनेवर टीका केली.
4 वर्षांपूर्वी -
हे वागणं ‘सेक्युलर’ नव्हे! | सेक्युलरवाद्याच्या मुद्द्यावरून कॉंग्रेसला चिमटा
राज्यात सध्या औरंगाबादचं नामंतरण करण्याच्या मुद्दयावर सत्ताधारी पक्षामध्येचं दोन मतप्रवाह असल्याचे दिसत आहे. शिवसेनेने नामांतर करण्याचा विडा उचललाय तर कॉंग्रेस मात्र नामांतरण हा किमान समान कार्यक्रमाचा भाग नाही असे म्हणत या नामांतराच्या विरोधात आहे.काँग्रेसकडून नामांतर विरोधी सूर लावला जात असतानाच शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी आजच्या सामनाच्या अग्रलेखातून सेक्युलरवाद्याच्या मुद्द्यावरून कॉंग्रेसला चिमटा काढला आहे.
4 वर्षांपूर्वी -
औरंगाबादचं संभाजीनगर नामकरण | पुढे पुढे पाहा काय होतंय - आदित्य ठाकरे
औरंगाबाद संभाजीनगर वादावर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी पहिल्यांदाच जाहीरपणे प्रतिक्रिया दिली आहे. औरंगाबादचं संभाजीनगर नामकरण करणार का?; असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी सूचक विधान केलंय. पुढे पुढे पाहा काय होतंय..! महाविकास आघाडीचं एकमत करूनच आम्ही शहराचं नाव बदलू, पण त्यासोबतच शहराच्या विकासाचे प्रश्नही आम्ही सोडवत आहोत, असं आदित्य ठाकरे म्हणालेत.
4 वर्षांपूर्वी -
सत्य समोर येताच रेणू शर्मा यु-टर्न मारण्याच्या तयारीत? | केले ट्विट वर ट्विट
बलात्काराच्या आरोपांमुळे अडचणीत आलेल्या मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणींमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. धनंजय मुंडे यांच्याविरोधात आरोप करणाऱ्या महिलेचा आणि धनंजय मुंडे यांचा एक ते दोन दिवसांत मुंबई पोलीस जबाब नोंदवणार असल्याची माहिती मिळत आहे. जबाब नोंदवल्यानंतर पुढे काय कारवाई करायची, यासंदर्भातील निर्णय घेण्यात येणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
बलात्काराच्या आरोपांवर धनंजय मुंडेंकडून सविस्तर खुलासा | विषय न्यायालयात देखील
सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात ओशिवरा पोलीस ठाण्यात बलात्काराची तक्रार दाखल करण्यात आली आहे. बॉलिवूडमधील गायिका रेणू शर्मा हीने तक्रार दाखल केली आहे. बॉलिवूडमध्ये लॉन्च करण्यासाठी तसेच चित्रपट जगातील मोठे निर्माते आणि दिग्दर्शक यांच्याकडून काम मिळवून देण्याचे आमिष दाखवून धनंजय मुंडे यांनी वारंवार बलात्कार केल्याचे रेणू शर्मा हिने तक्रारीत म्हटले आहे.
4 वर्षांपूर्वी -
भाजप अडचणीत | औरंगाबाद विमानतळाचं नाव छत्रपती संभाजी महाराज करा | केंद्राला पत्र
एकाबाजूला औरंगाबाद शहराच्या नामांतराचा मुद्दा प्रचंड तापला असताना मुख्यमंत्री कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरन संभाजीनगर असा उल्लेख करण्यात आला आहे. औरंगाबाद शहराचे संभाजीनगर असं नामकरण करा, अशी शिवसेनेची गेल्या कित्येक वर्षांपासूनची भूमिका आहे. औरंगाबाद महापालिकेची निवडणूक आता तोंडावर आल्याने भाजप आणि मनसेकडून शिवसेनेच्या याच भूमिकेवरुन प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. राज्यात शिवसेना सत्तेत असताना औरंगाबाद शहराचं नामकरण का झालं नाही? असा सवाल करत भाजप आणि मनसेने शिवसेनेला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. तर काँग्रेसने संभाजीनगर नामकरणाला विरोध दर्शवला आहे.
4 वर्षांपूर्वी -
इनकमिंग सुरूच | सोलापुरात एमआयएमचे ६ नगरसेवक राष्ट्रवादीच्या वाटेवर
विधानसभा निवणुकीनंतर राज्यात पवारांच्या करिष्म्याने महाविकास आघाडी सरकार आलं आणि त्यानंतर शिक्षक आणि पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीनंतरच्या यशानंतर इतर पक्षातील नेते मंडळी राष्ट्रवादीत भविष्यकाळ शोधू लागले आहेत असंच म्हणावं लागेल. त्या अनुषंगाने राष्ट्रवादीत जोरदार इनकमिंग सुरु आहे.
4 वर्षांपूर्वी -
औरंगाबादचं संभाजीनगर नामकरण | भाजप आणि मनसेकडून शिवसेनेवर टीकास्त्र
औरंगाबादच्या नामकरणावरून महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नाहीत. एका शहराच्या नावावरून असे मतभेद होत नसतात. भारतीय जनता पक्षाला उकळ्या फुटण्याचे कारण नाही. भारतीय जनता पक्षाचे मागील ५ वर्षे केंद्रात सरकार होते. अलाहाबादचे प्रयागराज केले त्याचवेळी संभाजीनगर का नाही केले, असा सवाल खा. संजय राऊत यांनी केला. संभाजीनगर विमानतळाचे नाव छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळ करावे, असा प्रस्ताव केंद्राकडे पाठविला आहे.
4 वर्षांपूर्वी -
औरंगाबादचं संभाजीनगर नामकरण | आधी महापालिकेत ठराव करा - प्रवीण दरेकर
औरंगाबादचं शहराचं संभाजीनगर असं नामांतर करण्याच्या मुद्द्यावरून राज्यातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षामधील राजकारण सध्या तापलं आहे. महाविकास आघाडीतील काँग्रेसनं नामांतराला विरोध केल्यानं त्यात भर पडली असून शिवसेना व भारतीय जनता पक्षामध्ये वाकयुद्ध रंगलं आहे. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी शिवसेनेला प्रशासकीय प्रक्रिया समजावून सांगितली आहे. एखादी गोष्ट जमत नसली की शिवसेना पळवाट काढते,’ असा सणसणीत टोला देखील त्यांनी लगावला आहे आहे.
4 वर्षांपूर्वी -
Job Alert | लोकविकास नागरी सहकारी बँकेत भरती
लोकविकास नागरी सहकारी बँक भरती २०२१. लोकविकास नागरी सहकारी बँक (लोकविकास नागरी सहकारी बँक लि. औरंगाबाद) यांनी शाखा व्यवस्थापक, आयटी अधिकारी या रिक्त पदांची भरती करण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. पात्र उमेदवारांना या संकेतस्थळा www.lokvikasbank.in वर ऑनलाईन अर्ज भरण्याचे निर्देश आहेत. लोकविक्री नागरी सहकारी बँक (लोकविकास नागरी सहकारी बँक लि. औरंगाबाद) भरती मंडळ, औरंगाबाद यांनी एकूण 05 रिक्त पदांची घोषणा जानेवारी २०२१ रोजी केली आहे. अर्ज भरण्याची अंतिम तारीख १५ जानेवारी २०२१ आहे. तरी अहर्ता आणि इतर महत्वाची महिती तुम्ही खाली सविस्तर वाचू शकता. तसेच सरकारी आणि खाजगी नोकरी संदर्भात थेट मोबाईलवर अलर्ट हवे असल्यास महाराष्ट्रनामा मोबाईल अँप डाउनलोड करा.
4 वर्षांपूर्वी -
राष्ट्रवादी काँग्रेस नेत्याच्या नाहक बदनामीचा प्रयत्न | भाजपवर षडयंत्राचा आरोप
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांच्यावर नाहक आरोप करण्यात आले असून स्वतः महेबूब शेख यांनी नार्को टेस्ट करण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे. परंतु भारतीय जनता पक्ष राजकीय फायदा उठवण्यासाठी षडयंत्र करत आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राज्य प्रवक्ते महेश तपासे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
माझ्या प्रयत्नाने का होईना कुणाची तहान भागत असेल तर ते पुण्यही महत्वाचं - मुख्यमंत्री
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे (Chief MinisterUddhav Thackeray) आज औरंगाबाद दौऱ्यावर आहेत (Aurangabad Water Supply Scheme). यादरम्यान त्यांनी औरंगाबादचं प्रत्येक घर बदलणारवाऱ्या ‘पाणी पुरवठा योजने;चं उद्घाटन केलं. गरवारे स्टेडियम वरील भव्य शामियान्यात हा उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला. या योजनेअंतर्गत औरंगाबादकरांना 24 तास पाणी उपलब्ध होणार आहे. या योजनेने औरंगाबादेतील प्रत्येक घरात पुरेसं पाणी पोहोचेल असं आश्वासन देण्यात आलं आहे. या कार्यक्रमावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी अनेक विषयांवर भाष्य केले;.
4 वर्षांपूर्वी -
लोटसचं ऑपरेशन | अशोक चव्हाणांनी नांदेडमध्ये भाजपचा मोठा नेता फोडून स्पर्धक संपवले
राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाचे निकाल लागले आणि भारतीय जनता पक्षाची राज्यातील दशा आणि दिशा दिसू लागली आहे. आमदार फुटले तरी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या महाविकास आघाडीसमोर पुन्हा निवडून येणे जवळपास अशक्य असल्याचे संकेत महाविकास आघाडीतील आमदारांना देखील मिळले असतील. मात्र भारतीय जनता नेते मंडळींना देखील त्या मिळाले असावेत. परिणामी भारतीय जनता पक्षाचं ऑपरेशन लोटस आता बारगळलं असलं तरी दुसऱ्या बाजूला ‘लोटसचच ऑपरेशन’ सुरु झाल्याचं पाहायला मिळत आहे.
4 वर्षांपूर्वी -
भाजपाला खिंडार | माजी केंद्रीय मंत्री जयसिंगराव गायकवाड यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
उत्तर महाराष्ट्रातील दिग्गज नेते एकनाथ खडसे यांनी भारतीय जनता पक्षाला रामराम ठोकत राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला होता. त्यानंतर भाजपाला मोठी गळती लागल्याचं पाहायला मिळत आहे. केंद्र तसेच राज्यात मंत्री पद भूषविणारे नेते देखील भाजपाला सोडचिट्ठी देत असल्याचा पाहायला मिळत आहे. दरम्यान, भारतीय जनता पक्षाला एका माजी केंद्रीय पद भूषविणाऱ्या नेत्याने रामराम ठोकला होता आणि त्यामुळे भाजपाची चिंता कमी होण्याची चिन्ह दिसत नाही.
4 वर्षांपूर्वी -
उ. महाराष्ट्रात खडसेंविरोधी जे राजकारण शिजलं | तेच मराठवाड्यात पंकजा मुंडेंच्या बाबतीत? - सविस्तर
गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या माध्यमातून ऊसतोड कामगारांची नोंदणी करून विविध योजना राबविण्याबरोबरच महामंडळाचे लवकरच बळकटीकरण करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.
4 वर्षांपूर्वी -
ऊसतोडणी कामगारांनो गरज कारखानदारांना आहे | लक्षात घ्या - प्रकाश आंबेडकर
बीडमध्ये एकाबाजूला ऊसतोड कामगारांच्या प्रश्नांवरून पंकजा मुंडे आणि आमदार सुरेश धस समोरासमोर आले आहेत. आमच्या ऊसतोड कामगारांना १५० टक्के, १०० टक्के, ७० टक्के वाढ नको तर कमीत कमी प्रति टनाला २१ रुपये वाढ द्या, असे आवाहन पवार साहेबांना केलं आहे. अंबेजोगाई येथील आज कार्यक्रमात पंकजा मुंडे यांनी ऊसतोड मजुरांसंदर्भात मोठी घोषणा केली. यावर क्रिया प्रतिक्रिया उमटत आहेत. आमच्या ऊसतोड कामगारांना उद्या भगवान बाबांचे दर्शन घेऊन ऊसतोड करण्यासाठी कारखान्याला गाड्या भरण्याचे आदेश दिले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
ऊसतोड मजुरांच्या प्रश्नावर पंकजा मुंडे आणि आ. सुरेश धस आमनेसामने
२१ रुपयांच्या पुढे दरवाढ मिळाली तर कोयता उचलून तोडणीला जाण्याचे पंकजा मुंडे (BJP Ex MLA and Minister Pankaja Munde) यांनी आदेश दिले आहेत. मात्र दुसरीकडे या घोषणेला विरोध करत भाजप आमदार सुरेश धस (BJP MLA Suresh Dhas) यांनी १५० टक्के वाढ झाल्याशिवाय एकही मजूर जाणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. ऊसतोड मजुरांच्या आंदोलनात फूट पडल्याचं चित्र आहे. कारण या प्रश्नावरून भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि आमदार सुरेश धस आमने-सामने आल्याचं पाहायला मिळत आहे.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार