15 November 2024 4:19 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
GMP IPO | स्वस्त IPO आला रे, मजबूत कमाईची मोठी संधी, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल - IPO GMP NHPC Share Price | मल्टिबॅगर NHPC शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: NHPC Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 5 मेटल शेअर्स मालामाल करणार, 46% पर्यंत परतावा मिळेल - NSE: TATASTEEL Suzlon Share Price | सुझलॉन शेअरबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून रेटिंग अपडेट - NSE: SUZLON IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागणार, ग्रे-मार्केटमधून फायद्याचे संकेत - GMP IPO Horoscope Today | रखडलेली कामे पूर्ण होतील, आजचा दिवस 'या' राशींसाठी अत्यंत खास, आजचे राशीभविष्य काय सांगते पहा Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर रॉकेट होणार, फायद्याचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
x

मोदी व शहांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींना गोगलगाय करून टाकलंय

Vanchit Bahujan Aghadi, VBA, Prakash Ambedkar, Sonia Gandhi

औरंगाबाद, १४ मार्च : शेअर बाजारात दररोज फार काही आशादायक घडामोडी घडत नसून बाजार नीचांकी पातळीवर कोसळत असतानाही केंद्र सरकारला त्याची चिंता वाटत नाही. देशाची आर्थिक परिस्थिती ढासळली असून ती सावरण्यात केंद्राला अपयश येत आहे. हे अपयश लपविण्यासाठी नागरिकत्व कायद्याचा विरोध करणाऱ्या फळीकडे लक्ष केंद्रित करून देशामध्ये अराजकता माजवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवारी येथे केला.

एनआरसी, एनपीआरवरून केंद्र सरकारला देशात अराजकता निर्माण करायची आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना गोगलगाय करून टाकलं असल्याचं विधान वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. औरंगाबाद येथे वंचीत बहुजन आघाडीच्या वतीने एनआरसी,एनपीए, सीएएच्या विरोधात भटक्या विमुक्त आदिवासी परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.

भटके विमुक्त आदिवासी परिषदेस उपस्थित राहण्यापूर्वी ते सुभेदारी विश्रामगृह येथे पत्रकारांशी बोलत होते. एनपीआर, एनआरसी आणि सीएएचा देशभरात विरोध होत आहे. आंदोलनात कोणी सहभाग घेतला त्यांची नावे नागरिकत्व कायद्यातून कायमची वगळण्यात येऊ शकतात. त्यामुळे आंदोलन करणारी फळी कमकुवत होईल असं देखील त्यांनी सूचित केलं.

नागरिकत्व कायद्यावरून आंबेडकर यांनी यावेळी केंद्रसरकारवर जोरदार निशाणा साधला. या देशात राहण्यासाठी तुम्हाला हे सिद्ध करावे लागणार आहे की, तुमचा जन्म या देशात झाला आहे. त्यासाठी तुमच्या जन्म नोंदीचा दाखला द्यावा लागणार आहे. जर तो नसेल तर तुमच्या आई-वडील किंवा आजोबांचा जन्म दाखला दाखवा लागणार आहे. ते कुठून आणणार. तर एनआरसी, एनपीआरवरून केंद्र सरकारला देशात अराजकता निर्माण करायची असल्याचा आरोप आंबेडकर यांनी यावेळी केला.

 

News English Summery: The central government is not worried about the stock market not getting much promising happen every day and even with the market falling below ground level. The Center is failing to realize that the country’s economic situation is deteriorating. To hide this failure, deprived Bahujan leader Adhikari alleged that there was an attempt to create chaos in the country by focusing on the opposition to the citizenship law. Prakash Ambedkar did this here on Friday. He was speaking to a reporter at Subhedari restroom before attending the Ghatak Free Tribal Conference. NPR, NRC and CAA are facing protests across the country. The names of those who participated in the movement may be permanently excluded from the citizenship law. This will weaken the plank of the agitation. “Yes Bank has recently closed the central government and in the coming days, five big banks are on the verge of closure,” he said.

 

News English Title: Story Vanchit Bahujan Aghadi Chief Prakash Ambedkar criticized Congress President Sonia Gandhi News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Prakash Ambedkar(119)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x