23 January 2025 6:59 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
New Income Tax Regime | खुशखबर, 10 लाख रुपये वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांना गिफ्ट, 1 रुपयाचाही टॅक्स भरावा लागणार नाही EPF Pension Money | खाजगी नोकरदारांना EPFO कडून इतकी महिना पेन्शन मिळणार, रक्कम फॉर्म्युला जाणून घ्या Rattanindia Power Share Price | 12 रुपयांचा पॉवर कंपनीचा शेअर तेजीत, कंपनीने महत्वाची अपडेट दिली - NSE: RTNPOWER Penny Stocks | 1 रुपयाचा शेअर खरेदी गर्दी, 1 दिवसात 9 टक्क्यांनी वाढला, मालामाल करतोय शेअर - Penny Stocks 2025 IRFC Share Price | आयआरएफसी शेअरबाबत महत्वाचे संकेत, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 34 टक्क्यांनी घसरला, तज्ज्ञांकडून महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: RVNL Tata Steel Share Price | टाटा स्टील कंपनी शेअरमध्ये तेजीचे संकेत, रेटिंग अपडेट, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL
x

Marathi Matrimony | कितीही प्रयत्न करुन लग्न जुळत नाही? | ही असू शकतात कारणं - नक्की वाचा

Delay in marriage

मुंबई, २७ जून | आयुष्यात काहीही झाले तरी वर हात दाखवून ते सगळं वरच्याच्या हातात असे कायम म्हटले जाते. आयुष्यातील चांगल्या आणि वाईट गोष्टी होण्यासाठी देवाला आणि नशिबाला नेहमी दोष दिला जातो. लग्नाच्या बाबतीतही अगदी तसेच आहे. लग्न ठरणे न ठरणे , योग जुळणे न जुळणे या गोष्टी कितीही खऱ्या असल्या तरी देखील त्यासाठी नशिबाला दोष देण्याची सवयच आपल्याला लागलेली आहे. पण लग्न हा आयुष्यातील सगळ्यात मोठा निर्णय तो घेताना थोडासा विचार आणि वेळ घ्यावा लागतो. कधी कधी जुळणार जुळणार आता लग्न जुळणार असे वाटत असले तरी ते स्थळ चांगले असून लग्न जुळत नाही. लग्न जुळत नाही म्हटल्यावर घरात अनेकांना टेन्शन येऊ लागते. विशेषत: घरात असणाऱ्या मुलींची लग्न होत नसतील तर पालकांना अधिक काळजी वाटू लागते. पण आयुष्यात अशा काही गोष्टी संकेत देत असतात. त्या गोष्टी चुकवून चालत नाही. त्यामुळे या गोष्टीकडे तुम्ही कधीही दुर्लक्ष करु नका.

योग चुकणे:
लग्न जुळवायला घेतल्यानंतर लग्नाची स्थळ यायला सुरु होतात.काही स्थळ आवडतात काही नाही. पण ज्याला प्रत्यक्ष लग्न करायचं आहे. त्याला एखादं स्थळ आवडत असेल आणि तुम्ही नाही म्हणत असाल तर अशी चूक अजिबात करु नका. कारण काही योग आयुष्यात आलेले असतात. एखाद्या मनपसंत जोडीदारासोबत लग्न करणे हे नेहमी चांगले असते. ज्या उभयंताना लग्न करायचे आहे. ते एकमेकांना आवडले असतील तर तुम्ही तुमच्या इच्छा आणि अपेक्षा त्या स्थळांवर लादू नका. एखादा योग आल्यानंतर तो योग चुकवणे ही सगळ्यात मोठी चूक आहे. कारण कधी कधी एखादा चांगला योग आल्यानंतर पुन्हा योग येणे हे थोडे कठीण असते. काहींचा एक योग चुकला की, पुढचा योग येण्यासाठी बराच कालावधी जाऊ शकतो. यामध्ये वर्षही निघून जातात. त्यामुळे घरातील इतरांच्या लग्नासही बाधा निर्माण होऊ शकते.

योग आलेला नसणे:
कधी कधी लग्नासाठी स्थळ येऊनही लग्न होत नाही. कारण त्यासाठी तुमचे लग्नाचा योग आलेला नसतो. तुम्ही कितीही लग्न जुळवण्याचा प्रयत्न केला तरी देखील काहीना काही कारणामुळे हे स्थळ आणि लग्न जुळून येत नाही. वर सांगितल्याप्रमाणे योग चुकवणे जसे चुकीचे आहे अगदी त्याचप्रमाणे लग्नासाठी योग आलेला नसताना काळजी करणेही चुकीचे. काही जणांनी लग्नासाठी एक आदर्श वय घालून दिलेले असते. पण त्या वयात लग्न झाले नाही तर आयुष्याचे नुकसान होईल अशा गटात असणारी लोकं. लग्न जुळावे यासाठी आटोकाट प्रयत्न करतात. पण काही केल्या लग्न काही जुळत नाही.यासाठी कारणीभूत त्यांचे वय किंवा त्यांची आवड नसते तर त्यांचा योग जुळून आलेला नसतो. जर असा योग जुळून आलेला नसेल तर तुम्ही कितीही चांगले स्थळ आणले किंवा काहीही केले तरी देखील लग्न जुळू शकणार नाही. काही जणांच्या पत्रिकेत लग्नाचे योगच नसतात. त्यामुळेही लग्न जुळत नाहीत.

बाशिंग जड असणे:
बाशिंग जड असण्याबाबत तुम्ही कधी ऐकले आहे का? असे म्हणतात कोणाचेही लग्न घरातील कोणत्याही व्यक्तीवर अवलंबून नसते. एखाद्याच्या आयुष्यात लग्न योग आलेलाच नसेल तर त्याला ती व्यक्तीही काही करु शकत नाही. पण त्याच घरात एखाद्या दुसऱ्या मुलाचे किंवा मुलीचे लग्न होण्याच्या मार्गावर असेल तर ते लग्न अगदी करायलाच हवे. कारण असे म्हणतात घरात जर बाशिंग जड झाले असेल तर ज्या दुसऱ्या व्यक्तीचे लग्न घरात ठरत असेल तर ते लग्न करुन घ्यावे म्हणजे घरात अडकलेले एखादे लग्न कार्य पूर्ण होते किंवा मार्गी लागते. बरेचदा एखाद्याचे वय लहान असते म्हणून त्याचे लग्न नंतर करु असे करत त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यात येते. पण जर एखाद्या व्यक्तीचा योग आला असेल आणि उत्तम जोडीदार मिळत असेल तर अशा व्यक्तीचे लग्न लावून दिल्याने खूप फरक पडतो. उदा. तुमच्या घरातील मुलाचे लग्न मुलीच्या आधी केले आणि एखादी मुलगी बाहेरुन तुमच्या घरी आली की, तरी देखील उरलेल्यांची लग्न मार्गी लागण्याची शक्यता असते.

आता लग्न का जुळत नाही याचा विचार करण्यापेक्षा या गोष्टींचाही विचार करा. म्हणजे तुम्हाला नक्कीच फायदा होईल.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा.

News Title: Big astrological reasons behind delay in marriage news updates.

हॅशटॅग्स

#Astrology(336)#Matrimony(12)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x