24 November 2024 3:25 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Multibagger Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय हा मल्टिबॅगर शेअर, तब्बल 4300% परतावा दिला, फायद्याची अपडेट - BOM: 543620 IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News SBI Online | सरकारी SBI बँकेची जबरदस्त योजना, 50,000 रुपयांची गुंतवणूक देईल 13 लाखांपर्यंत परतावा - Marathi News 8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर, नव्या वर्षात पगारात 186 टक्क्यांनी वाढ होणार, अपडेट जाणून घ्या Penny Stocks | 10 रुपयाचा शेअर श्रीमंत करणार, 6 महिन्यात 116% परतावा दिला, संधी सोडू नका - BSE: 540259 Apollo Micro Systems Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: APOLLO
x

Matrimonial Partner | वयात आलेल्या मुलांना आपला जोडीदार निवडण्याचा पूर्ण अधिकार – हायकोर्ट

Allahabad high court

अलाहाबाद, १७ सप्टेंबर | एका आंतरधर्मीय जोडप्याला संरक्षण देण्याचा निर्णय घेताना वयात आलेल्या मुला-मुलींना, त्यांचा धर्म (religion) कुठलाही असो पण त्यांना त्यांच्या पसंतीच्या व्यक्तीबरोबर लग्न करण्याचा पूर्ण अधिकार आहे, असे अलाहाबाद उच्च न्यायालयाने पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे. पालकही त्यांच्या नात्यावर आक्षेप घेऊ शकत नाहीत, असे न्यायाधीश मनोज कुमार गुप्ता आणि न्यायाधीश दीपक वर्मा यांच्या खंडपीठाने सांगितले.

Matrimony, वयात आलेल्या मुलांना आपला जोडीदार निवडण्याचा पूर्ण अधिकार – Two adults have a right to choose their partner irrespective of their religion says Allahabad high court :

धर्म कुठलाही असो, वयात आलेल्या मुला-मुलींना लग्नासाठी त्यांच्या पसंतीचा जोडीदार निवडण्याचा पूर्ण अधिकार आहे. सध्या समोर असलेली याचिकाही दोन व्यक्तींनी केलेली संयुक्त याचिका आहे. त्यांनी परस्परांवर प्रेम असल्याचा दावा केला असून त्यामुळे आमच्या मते कोणालाही, त्यांच्या पालकांनाही नात्यावर आक्षेप घेण्याचा अधिकार नाही. असे कोर्टाने म्हटले आहे” बार अँड बेचने ही माहिती दिली आहे.

शीफा हसन आणि तिच्या जोडीदाराने ही याचिका दाखल केली होती. दोघेही उत्तर प्रदेशचे रहिवासी आहेत. आम्ही परस्परांच्या प्रेमात आहोत. स्वेच्छेने एकत्र राहत आहोत. धर्मांतर करुन हिंदू बनण्यासाठी आपण अर्ज केला आहे. जिल्हा न्यायदंडाधिकाऱ्यांनी संबंधित पोलीस ठाण्यातून अहवालही मागवला आहे, अशी माहिती शीफा हसनने तिच्या याचिकेतून दिली आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल.

News Title: Two adults have a right to choose their partner irrespective of their religion says Allahabad high court.

हॅशटॅग्स

#Matrimony(12)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x