7 January 2025 4:14 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | पोस्टाची सर्वोत्तम योजना, व्याजाने कमवाल 2 लाख रुपये, लोन सुविधा देखील होईल प्राप्त, फायदा घ्या TCS Share Price | टाटा तिथे नो घाटा, TCS शेअरमध्ये 39 टक्के तेजीचे संकेत, IT स्टॉक मालामाल करणार - NSE: TCS Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअरबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईस अजून घसरणार की तेजी येणार - NSE: SUZLON Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 737% परतावा दिला - NSE: ADANIPOWER EPF Withdrawal | पगारदारांनो, या कारणांचा वापर करून EPF खात्यातून पैसे काढू शकता, 90 लोकांना माहित नाही Reliance Share Price | रिलायंस इंडस्ट्रीज सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 64 टक्केपर्यंत परतावा - BOM: RELIANCE Penny Stocks | 5 रुपयाचा पेनी शेअर श्रीमंत करणार, 1 महिन्यात 156 टक्के परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 531663
x

Matrimony | लग्न झाल्यावर मुली चिडचिड्या का होतात | कारणं जाणून घ्या

Wedding Article, Free Marriage, Matrimony

मुंबई, ६ ऑक्टोबर : लग्नानंतर प्रत्येक मुलीचे आयुष्य खूप बदलते. मुलीचे फक्त घरच बदलत नाही तर तिच्या अनेक सवयीसुद्धा बदलतात. ज्या घरात ती आधी राहात होती अचानक ते घर तिला परके होते. त्याच वेळी सासरी सगळे नवीन असते. अशा वेळी अनेक आव्हाने तिला पेलवावी लागतात. इतके सगळे झेपावताना परीणामी मुली खूप चिडचिड्या होतात. तर आता पाहूया अशी काय कारणे आहेत ज्यामुळे मुली लग्न झाल्यावर चिडचिड्या होतात.

आपलेपणा न वाटणे:
जर सासरच्यांनी आपुलकीने वागवले नाही तर मुलीचा स्वभाव बदलतो. त्यांच्या वागण्यात आपलेपणा नसेल तर त्याचा तिच्या स्वभावावर परिणाम होतो. असे असल्यास सुनेने कितीही प्रकारे प्रयत्न केले तरी तिला मुलीचे प्रेम मिळू शकत नाही. अशात तिचा स्वभाव खूप चिडचिडा होऊ शकतो.

लग्नानंतर जर मुलीला पर्सनल स्पेस मिळाली नाही आणि तिला इतरांच्या हिशोबाने चालावे लागले तर ते चिडचिड होण्याचे मुख्य कारण असते. घरतल्या माणसांनी जर तिच्याशी नीट वागणूक केली नाही तर तिला एकटे वाटू शकते आणि ज्यामुळे तिच्या स्वभावात बदल होतो.

जर तिला इतक्यात कुटुंब वाढवायची इच्छा नसेल तर त्यावरून तिला खूप ऐकून घ्यावे लागते. यांमुळेसुद्धा ती चिडचिडी होऊ शकते. मुलींचा लग्नानंतर कुटुंबाचे करण्यात इतका वेळ जातो कि त्यांना स्वतःसाठी वेळच मिळत नाहीत आणि म्हणून त्यांचा स्वभाव चिडचिडा होऊ शकतो. त्या स्वतःकडे लक्ष देऊ शकत नाहीत. बरेचदा त्यांना लग्न केल्याचा पश्चात्ताप सुद्धा होऊ शकतो.

स्वतःला बदलणे:
लग्नानंतर मुलीला खूप बदलावे लागते आणि ह्यामुळे सुद्धा तिला खूप त्रास होऊ शकतो. अशा वेळी मुलीला स्वतःला सिद्ध करावे लागते. त्यामुळे मुलींची चिडचिड होऊ शकते.

घरातले वातावरण:
जर घरात चांगले वातावरण नसेल तर मुलींची जास्त चिडचिड होते. तिच्या माहेरी ती लाडकी असते आणि तसे लाड सासरी झाले नाहीत तर त्याचा मुलीला त्रास होतो. लग्नाआधी कितीही उशिरा उठत असली तरी सासरी तिला सुट्टीच्या दिवशीही लवकर उठावे लागते आणि सगळी कामे पार पाडावी लागतात. यामुळेच मुलींची जास्त चिडचिड होते.

जर मुलीला सासरी आपलेपणा मिळाला तर नक्की तिचे मनस्वास्थ्य चांगले राहील आणि घरात वातावरण आनंदी राहील.

 

Article English Summary: Every girl’s life changes a lot after marriage. Not only does a girl’s home change but so do many of her habits. The house she had lived in before was suddenly a stranger to her. At the same time, husband’s family members and everything is new to her. At such times she has to face many challenges. As a result, the girls get very irritated. So let’s see what are the reasons why girls get irritated when they get married.

Article English Title: Why girls get irritated after getting marriage wedding article.

हॅशटॅग्स

#Matrimony(12)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x