23 April 2025 6:16 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SJVN Share Price | मल्टिबॅगर परतावा देणाऱ्या पीएसयू शेअरबाबत फायद्याचे संकेत, रेटिंग सह टार्गेट अपडेट - NSE: SJVN Reliance Share Price | जेफरीज फर्म बुलिश, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर प्राईस अपडेट, टार्गेट जाणून घ्या - NSE: RELIANCE Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा स्टील शेअर देईल 27 टक्के परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATASTEEL NHPC Share Price | शेअर प्राईस 90 रुपये; तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: NHPC Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीचा शेअर देईल 39 टक्के परतावा, ही अपडेट जाणून घ्या - NSE: ADANIPOWER Tata Technologies Share Price | टाटा तिथे नो घाटा, गुंतवणूकदारांकडून जोरदार खरेदी, मोठी संधी आली - NSE: TATATECH RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL
x

360 One Wam Share Price | ही कंपनी गुंतवणुकदारांना देणार दुहेरी फायदा, मजबूत कमाई करण्यासाठी शेअरची कामगिरी पाहा

360 One Wam Share Price

360 One Wam Share Price | शेअर बाजारात सूचीबद्ध कंपन्यांचे शेअर्स आपल्या गुंतवणुकदारांना विविध लाभ मिळवून देतात. यात बोनस शेअर्स, लाभांश आणि स्टॉक स्प्लिटसारखे इतर लाभही सामील असतात. सध्या एका कंपनीचे शेअर्स गुंतवणुकदारांना लाभ देण्याबाबत चर्चेत आले आहेत. या कंपनीचे नाव आहे, ‘360 वन वॅम लिमिटेड’. या वित्तीय सेवा प्रदान करणाऱ्या कंपनीच्या संचालक मंडळाने आपल्या विद्यमान शेअर धारकांना 1 शेअरवर 1 शेअर बोनस मोफत वाटप करण्याची घोषणा केली आहे. तसेच कंपनी आपले शेअर्स दोन तुकड्यांमध्ये विभाजित करणार आहे. कंपनीची कामगिरी पाहता परकीय गुंतवणूकदारांनाही डिसेंबर 2022 तिमाहीत गुंतवणूक वाढवली आहे. ‘360 वन वॅम लिमिटेड’ कंपनीचा मागोवा घेणाऱ्या ब्रोकरेज फर्मला खात्री आहे की, या कंपनीच्या शेअर्समध्ये पुढील काळात मजबूत वाढ होऊ शकते. म्हणून त्यांनी स्टॉकला ‘बाय’ टॅग देऊन खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, 360 ONE WAM Share Price | 360 ONE WAM Stock Price | BSE 542772)

कंपनीचे स्पष्टीकरण :
‘360 वन वॅम लिमिटेड’ कंपनीच्या संचालक मंडळाने आपले 2 रुपये दर्शनी मूल्य असलेले शेअर्स दोन इक्विटी शेअर्समध्ये विभाजन करण्यास मंजुरी दिली आहे. या स्टॉक स्प्लिटनंतर कंपनीच्या एका शेअरचे दर्शनी मूल्य 2 रुपयांवरून 1 रुपयांवर येईल. त्याच वेळी कंपनी आपल्या पात्र शेअर धारकांना गुंतवणूकदारांना प्रत्येक शेअरवर 1 बोनस शेअर मोफत देणार आहे. ‘360 वन वॅम लिमिटेड’ कंपनीच्या संचालक मंडळाने स्टॉक स्प्लिट आणि बोनस शेअर्ससाठी 2 मार्च 2023 हा दिवस रेकॉर्ड तारीख म्हणून जाहीर केला आहे. मंगळवार दिनांक 28 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.43 टक्के घसरणीसह 1,772.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

कंपनीची तिमाही कामगिरी :
डिसेंबर 2022 तिमाहीत ‘360 वन वॅम लिमिटेड’ कंपनीने 180 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या डिसेंबर तिमाहीच्या तुलनेत या तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा 16 टक्के वाढला आहे. त्याच वेळी कंपनीचा PBT 513 कोटी रुपये होता. स्टॉक एक्सचेंज नियामक सेबीला दिलेल्या माहितीत कंपनीने म्हटले आहे की, ऑक्टोबर ते डिसेंबर 2022 या कालावधीत कंपनीने 415 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे.

स्टॉकबाबत तज्ञांचे मत :
ब्रोकरेज हाऊस मोतीलाल ओसवाल फर्मचे तज्ञ म्हणाले, ‘360 वन वॅम लिमिटेड’ कंपनी सर्वोत्तम संपत्ती व्यवस्थापन करणाऱ्या कंपन्यांपैकी एक आहे. ही कंपनी पारंपारिक दृष्टिकोनाऐवजी महसूल निर्माण करण्यावर जास्त लक्ष केंद्रित करते. म्हणून तज्ञांनी या स्टॉकवर 2300 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. मंगळवार दिनांक 28 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.43 टक्के घसरणीसह 1,772.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | 360 ONE WAM Share Price 542772 stock market live on 28 February 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#360 ONE WAM Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या