27 January 2025 10:07 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Mutual Fund | टाटा तिथे नो घाटा, श्रीमंत करणारी टाटा म्युच्युअल फंडाची योजना, 1,06,81,334 रुपये परतावा दिला Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअरमध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर मालामाल करणार, 54 टक्क्यांच्या तेजीचे संकेत, व्हेंचुरा ब्रोकरेज बुलिश - NSE: ADANIPOWER IREDA Share Price | पीएसयू इरेडा शेअर फोकसमध्ये, मालामाल करणार शेअर, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक सहित या 5 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL Property Knowledge | 90% कुटुंबांना माहित नाही, लग्नानंतरही विवाहित मुलगी वडिलांच्या प्रॉपर्टीवर हक्क मागू शकते, कायदा लक्षात ठेवा Income Tax Returns | नोकरदारांनो, टॅक्स वाचवण्यासाठी पती-पत्नी जॉईंट ITR भरू शकतात, जाणून घ्या त्याचे फायदे
x

7th Pay Commission | सरकारी कर्मचारी आणि पेन्शनर्ससाठी मोठी खुशखबर! मिळणार ऍडव्हान्स पगार, महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांना विशेष फायदा

7th Pay Commission

7th Pay Commission | केंद्र सरकारने केरळ आणि महाराष्ट्र या दोन राज्यांतील कर्मचाऱ्यांना आगाऊ वेतन देण्याची घोषणा केली आहे. यासोबतच केंद्र सरकारच्या पेन्शनधारकांना पेन्शनची रक्कमही आगाऊ मिळणार आहे. ओणम आणि गणेश चतुर्थी लक्षात घेऊन केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. ओणम हा केरळमधील लोकप्रिय सण आहे, तर महाराष्ट्रात गणेश चतुर्थीचा सण धुमधडाक्यात साजरा केला जातो.

काय म्हणाले अर्थ मंत्रालय:

अर्थ मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार, केरळमधील कर्मचाऱ्यांना केंद्र सरकार ऑगस्टचे आगाऊ वेतन देईल, तर सप्टेंबरचे आगाऊ वेतन महाराष्ट्रातील केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना दिले जाईल. केरळमधील ओणमच्या पार्श्वभूमीवर सरकार शुक्रवारी, २५ ऑगस्ट रोजी आगाऊ वेतन आणि पेन्शन जारी करणार आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील गणपती उत्सवाच्या पाश्वभूमीवर बुधवार, २७ सप्टेंबर रोजी वेतन आणि पेन्शन देण्यात येणार आहे.

केरळ आणि महाराष्ट्रात कार्यरत असलेल्या केंद्र सरकारच्या औद्योगिक कर्मचाऱ्यांचे वेतनही वरील तारखांनुसार आगाऊ वितरित केले जाऊ शकते, असे अर्थ मंत्रालयाने म्हटले आहे. केरळ/महाराष्ट्रातील सर्व बँकांना यासंदर्भात आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश द्यावेत, असे निर्देश अर्थ मंत्रालयाने रिझर्व्ह बँकेला दिले आहेत.

केरळ सरकारची घोषणा :

केरळ सरकारने आगामी ओणम सणाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना चार हजार रुपयांचा बोनस जाहीर केला आहे. बोनससाठी पात्र नसलेल्या अशा सरकारी कर्मचाऱ्यांना २,७५० रुपये विशेष उत्सव भत्ता देण्यात येणार आहे.

या निर्णयाचा फायदा राज्यातील १३ लाख कर्मचारी व कामगारांना होणार आहे. सेवानिवृत्ती वेतनधारक व अंशदायी पेन्शन योजनेंतर्गत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना एक हजार रुपये उत्सव भत्ता देण्यात येणार आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या पगारावर २० हजार रुपये फेस्टिव्ह अॅडव्हान्स घेता येणार आहे. तर, तात्पुरत्या कर्मचाऱ्यांना सहा हजार रुपये अॅडव्हान्स घेता येणार आहे.

Disclaimer | म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : 7th Pay Commission advance salary 17 August 2023.

हॅशटॅग्स

#7th Pay Commission(165)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x