20 April 2025 10:05 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत, मल्टिबॅगर इरेडा शेअर देईल मजबूत परतावा, ही आहे टार्गेट प्राईस - NSE: IREDA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार सोमवार 21 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | बापरे, तब्बल 1,33,786% परतावा दिला या शेअरने, पुन्हा तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर ऑटो कंपनीचा शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट जाहीर - NSE: ASHOKLEY Vodafone Idea Share Price | चिल्लर प्राईस पेनी स्टॉकबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Yes Bank Share Price | येस बँकेच्या नफ्यात प्रचंड वाढ, पण तज्ज्ञांनी पेनी स्टॉकबद्दल काय म्हटलं? टार्गेट जाणून घ्या - NSE: YESBANK Vedanta Share Price | या शेअरला मोठा भविष्यकाळ, खरेदी करून ठेवा, अनेक तज्ज्ञांनी दिला सल्ला - NSE: VEDL
x

7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता वाढीबाबत मोठी अपडेट, तारीख निश्चित, पगारात नेमका किती फरक पडणार?

7th Pay Commission

7th Pay Commission | लोकसभा निवडणूक जवळ आल्याने मोदी सरकारने एलपीजी सिलिंडरवर 100 रुपये अतिरिक्त सबसिडी देऊन कोट्यवधी लोकांना मतांसाठी का होईना पण ‘अल्प’ दिलासा दिला आहे. आता केंद्रीय कर्मचारीही महागाई भत्त्यात (डीए) वाढ होण्याची वाट पाहत आहेत.

मोदी सरकार 2023 सालच्या दुसऱ्या सहामाहीसाठी महागाई भत्त्याची घोषणा करणार आहे. यामुळे एक कोटींहून अधिक केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना दिलासा मिळणार आहे. काही दिवसांपूर्वी दिल्लीत जुन्या पैशांच्या मागणीवरून सरकारी कर्मचारी आणि त्यांच्या कटुंबीयांनी काढलेल्या महामोर्चाला जनसागर उसळला होता निया त्यामुळे मोदी सरकार निवडणुकीच्या तोंडावर धास्तावलं आहे.

त्याची घोषणा कधी होणार?
मीडिया रिपोर्ट्सनुसार, केंद्र सरकार नवरात्रीदरम्यान कॅबिनेट बैठकीत महागाई भत्ता वाढीची घोषणा करू शकते. किंबहुना दरवर्षी नवरात्रीत सरकार बैठक घेऊन महागाई भत्ता वाढीला मंजुरी देते, असा पॅटर्न आहे.

त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना १५ ऑक्टोबरनंतर केव्हाही महागाई भत्त्यावर आनंदाची बातमी मिळू शकते. निवडणूक आयोग लवकरच पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखाही जाहीर करणार आहे. आचारसंहिता लागू झाल्यानंतर हा निर्णय घेणे सरकारसाठी आव्हानात्मक ठरू शकते.

जुलैपासून प्रतीक्षा
केंद्र सरकारचे कर्मचारी आणि पेन्शनधारक जुलैपासून महागाई भत्त्यात (डीए) वाढीच्या प्रतीक्षेत असून सरकार महागाई भत्ता ४२ टक्क्यांवरून ४५ टक्क्यांपर्यंत वाढवू शकते, अशी अपेक्षा आहे. त्यात वाढ झाल्यास ऑक्टोबरमहिन्याच्या पगारात वाढीव महागाई भत्ता मिळणार आहे. त्याचबरोबर जुलै ते सप्टेंबर पर्यंतची थकबाकीही मिळणे अपेक्षित आहे. या निर्णयाचा फायदा ४७ लाख कर्मचारी आणि ६८ लाख पेन्शनधारकांना होणार आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : 7th Pay Commission DA Hike Salary increment 05 October 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#7th Pay Commission(173)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या