22 February 2025 2:51 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Home Loan Charges | 90 टक्के पगारदारांना माहित नाही, बँकेतून गृह कर्ज घेताना कोणकोणते चार्जेस वसूल केले जातात 5G Mobile Under 10000 | स्मार्टफोन सॅमसंग Galaxy F06 5G ची भारतात सेल सुरू, किंमत फक्त 10,000 रुपये, इथे पहा ऑफर्स VIDEO | पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या त्या कृत्याने टाळ्यांचा कडकडाट, शरद पवारांसोबत कार्यक्रमात हजेरी Bonus Share News | 1 वर 1 फ्री बोनस शेअर देणार ही कंपनी, स्टॉक खरेदीला गर्दी, रेकॉर्ड डेट पूर्वी गुंतवणूकदारांची धावपळ UPI ID | आता UPI द्वारे पेमेंट करताना मोजावे लागतील एक्सट्रा चार्जेस, या गुगल-पे ने केली सुरुवात, अपडेट जाणून घ्या Railway Ticket Booking | ऑनलाइन की काऊंटर रेल्वे टिकीट, दोघांमधील स्वस्त तिकीट कोणते, हे माहित असु द्या Home Loan with SIP | पगारदारांनो, होम लोन EMI सह 15% एसआयपी करा, लोन फिटताच संपूर्ण व्याज वसूल होईल
x

Accent Microcell IPO | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी मिळेल 89% पर्यंत परतावा, शेअरची प्राईस बँड सुद्धा स्वस्त

Accent Microcell IPO

Accent Microcell IPO | सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून भरघोस कमाई करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. एक्सेंट मायक्रोसेल लिमिटेड कंपनीचा IPO 8 डिसेंबर रोजी गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला आहे. या IPO ची शेवटची तारीख 12 डिसेंबर 2023 रोजी असेल. या कंपनीचे शेअर्स ग्रे मार्केटमध्ये जबरदस्त कामगिरी करत आहेत.

गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये एक्सेंट मायक्रोसेल लिमिटेड कंपनीचे IPO शेअर्स ग्रे मार्केटमध्ये 125 रुपये किंमतीवर ट्रेड करत आहेत. या कंपनीने अपक्या IPO ची किंमत बँड 133 रुपये ते 140 रुपये दरम्यान निश्चित केली आहे. IPO च्या माध्यमातून एक्सेंट मायक्रोसेल लिमिटेड कंपनी 78.40 कोटी रुपये भांडवल उभारणी करणार आहे.

या कंपनीच्या शेअरचे दर्शनी मूल्य 10 रुपये आहे. आपल्या IPO अंतर्गत एक्सेंट मायक्रोसेल लिमिटेड कंपनीने एका लॉटमध्ये 1000 शेअर्स ठेवले आहेत. गुंतवणूकदारांना एक लॉट खरेदी करण्यासाठी किमान 140,000 रुपये जमा करावे लागतील.

एक्सेंट मायक्रोसेल लिमिटेड कंपनीचे IPO शेअर्स 13 डिसेंबर 2023 रोजी वाटप केले जातील. ज्यां लोकांना शेअर्स वाटप केले जाणार नाहीत, त्यांना 14 डिसेंबर 2023 रोजी पैसे परत केले जातील. त्याच दिवशी गुंतवणूकदारांच्या डिमॅट खात्यात शेअर्स जमा केले जातील. एक्सेंट मायक्रोसेल लिमिटेड कंपनीचा IPO स्टॉक 15 डिसेंबर रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध केला जाईल.

या कंपनीचे शेअर्स NSE SME प्लॅटफॉर्मवर सूचीबद्ध केले जातील. 1 डिसेंबर 2023 पासून सेबीने IPO स्टॉक लिस्टिंगसाठी T+3 टाइमलाइन अनिवार्य केली आहे. T+3 टाइमलाइन अंतर्गत स्टॉक बिडिंग बंद झाल्यानंतर लगेच तीन दिवसांच्या आत शेअर सूचीबद्ध करणे बंधनकारक करण्यात आले आहेत.

एक्सेंट मायक्रोसेल लिमिटेड कंपनीचे शेअर्स ग्रे मार्केटमध्ये जबरदस्त कामगिरी करत आहेत. सध्या हा स्टॉक ग्रे मार्केटमध्ये 125 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 100 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत होते. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 140 रुपये प्रीमियम किमतीवर पोहचले होते.

एक्सेंट मायक्रोसेल लिमिटेड कंपनीच्या IPO शेअरची प्राइस अप्पर किंमत बँड 140 रुपये आहे. त्यानुसार या कंपनीचे शेअर्स 265 रुपये किमतीवर सूचीबद्ध होऊ शकतात. एक्सेंट मायक्रोसेल लिमिटेड कंपनीचा IPO स्टॉक पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना 89.29 टक्के नफा कमावून देऊ शकतो.

एक्सेंट मायक्रोसेल लिमिटेड ही कंपनी मुख्यतः सेल्युलोज-आधारित उच्च दर्जाचे एक्सीपियंट्स तयार करण्याचा व्यवसाय करते. सेल्युलोज-आधारित एक्सिपियंट्स औषध आणि न्यूट्रास्युटिकल उद्योगांमध्ये मोठ्या प्रमाणात वापरले जातात. ते जेलिंग एजंट, स्टेबिलायझिंग एजंट, बाइंडर, जैव-चिपकणारे आणि औषध-वितरण प्रणाली म्हणून देखील उपयोगी पडतात. मायक्रोक्रिस्टलाइन सेल्युलोज हे फार्मास्युटिकल उद्योगात सेल्युलोज-आधारित सहायक म्हणून उपयोगात आणले जाते.

एक्सेंट मायक्रोसेल लिमिटेड ही कंपनी जागतिक स्तरावर मायक्रोक्रिस्टलाइन सेल्युलोजचे उत्पादन करणारी अग्रणी कंपनी मानली जाते. एक्सेंट मायक्रोसेल लिमिटेड कंपनीच्या प्रमुख ब्रँडमध्ये एक्सेल, मॅक्सेल आणि विन्सेल हे उत्पादने येतात. एक्सेंट मायक्रोसेल लिमिटेड ही कंपनी 20 मायक्रॉन ते 180 मायक्रॉन पर्यंत MCC चे 22 ग्रेड तयार करते, ज्याचा उपयोग टेक्सच्युरायझर, बाइंडर, वंगण, अँटीकेकिंग एजंट आणि बलकिंग एजंट म्हणून मोठ्या प्रमाणात केला जातो.

एक्सेंट मायक्रोसेल लिमिटेड कंपनी आपली उत्पादने भारतात तसेच यूएसए, कॅनडा, जर्मनी, यूके, जपान, चीन, ऑस्ट्रेलिया, कोरिया, नेदरलँड्स, तुर्की, व्हिएतनाम, इटली, इंडोनेशिया, पोलंड, इजिप्त, फ्रान्स, थायलंड, न्यूझीलंड, ब्राझील यासारख्या देशांमध्ये देखील विकते. यासह रशिया, मेक्सिको हे चिली, झिम्बाब्वे, डेन्मार्क, ग्रीस इत्यादी देशांमध्ये देखील कंपनीने आपली मजबूत उपस्थिती निर्माण केली आहे.

एक्सेंट मायक्रोसेल लिमिटेड कंपनीचे प्रमुख कारखाने पिराणा रोड, अहमदाबाद आणि दहेज, SEZ (भरूच) या ठिकाणी स्थित आहेत. या दोन्ही युनिटची एकूण उत्पादन क्षमता वार्षिक 8000 मेट्रिक टन एवढी नोंदवली गेली आहे. एक्सेंट मायक्रोसेल लिमिटेड कंपनीने नवागम खेडा जा ठिकाणी देखील एक कारखाना सुरू केला आहे. हा कारखाना मार्च 2025 पर्यंत कार्यरत होईल. या नवीन युनिटची एकूण उत्पादन क्षमता 2400 मेट्रिक टन असू शकते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Accent Microcell IPO GMP Today 08 December 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Accent Microcell IPO(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x