22 November 2024 6:41 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News Railway Ticket Booking | रेल्वेचं तात्काळ तिकीट बुक करण्यास अडचण निर्माण होत आहे; थांबा, 'या' टिप्समुळे झटपट होईल काम
x

Accent Microcell IPO | होय! पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल! एकाच दिवसात हा IPO शेअर 145 टक्केपर्यंत परतावा देईल

Accent Microcell IPO

Accent Microcell IPO | एक्सेंट मायक्रोसेल कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. या स्मॉल कॅप कंपनीच्या IPO मध्ये गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. IPO ओपनिंगच्या दुसऱ्याच दिवशी एक्सेंट मायक्रोसेल कंपनीचा IPO 145 पट अधिक भरला होता.

एक्सेंट मायक्रोसेल कंपनीचा IPO 8 डिसेंबर ते 12 डिसेंबर 2023 पर्यंत खुला करण्यात आला आहे. ग्रे मार्केटमध्ये एक्सेंट मायक्रोसेल कंपनीचे शेअर्स जबरदस्त कामगिरी करत आहे. तज्ञांच्या मते, ग्रे मार्केटमध्ये एक्सेंट मायक्रोसेल IPO स्टॉक 145 टक्के प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहे.

तज्ञांच्या मते, IPO लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी एक्सेंट मायक्रोसेल कंपनीचे शेअर्स 340 रुपये किमतीवर सूचीबद्ध होऊ शकतात. एक्सेंट मायक्रोसेल कंपनीच्या शेअरची किंमत बँड 133-140 रुपये निश्चित करण्यात आली आहे. त्याच वेळी या कंपनीच्या शेअर्सचा ग्रे मार्केट प्रीमियम 202 रुपये किमतीवर पोहचला आहे.

जर या कंपनीचे शेअर्स 140 रुपये अप्पर प्राइस बँडवर वाटप करण्यात आले तर, एक्सेंट मायक्रोसेल स्टॉक 342 रुपये किमतीवर सूचीबद्ध होऊ शकतो. ज्या गुंतवणूकदारांना IPO शेअर वाटप केले जातील, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य पहिल्याच दिवशी 145 टक्के वाढतील. 13 डिसेंबर 2023 रोजी IPO शेअर्स गुंतवणुकदारांना वाटप केले जातील. आणि 15 डिसेंबर 2023 रोजी हा स्टॉक सूचीबद्ध केला जाईल.

एक्सेंट मायक्रोसेल कंपनीचा IPO अवघ्या दोन दिवसात 145 पट अधिक सबस्क्राइब झाला आहे. या कंपनीच्या IPO मध्ये किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आलेला कोटा 215.19 पट अधिक सबस्क्राइब झाला आहे. तर गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांचा राखीव कोटा 160.56 पट अधिक सबस्क्राईब झाला आहे. ए

क्सेंट मायक्रोसेल कंपनीच्या IPO मध्ये क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल बायर्सचा राखीव कोटा 9.90 पट अधिक सबस्क्राइब झाला आहे. किरकोळ गुंतवणूकदार या IPO मध्ये 1 लॉट खरेदी करू शकतात. आणि एका लॉटमध्ये कंपनीने 1000 शेअर्स ठेवले आहेत. म्हणजेच किरकोळ गुंतवणूकदारांना एक लॉट खरेदी करण्यासाठी किमान 140000 रुपये जमा करावे लागणार आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Accent Microcell IPO GMP Today 12 December 2023.

हॅशटॅग्स

Accent Microcell IPO(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x