24 November 2024 1:44 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट आली, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Mutual Fund SIP | पैशाने पैसा जोडा, करोडपती बनवण्याचा राजमार्ग, 15 वर्षांत व्हाल श्रीमंत, फॉर्म्युला जाणून घ्या BEL Vs Reliance Share Price | BEL आणि रिलायन्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 38% पर्यंत परतावा - NSE: BEL Pension Life Certificate | जीवन प्रमाणपत्र जमा करण्यासाठी केवळ 7 दिवस बाकी, घाई करा नाहीतर पेन्शन विसरा - Marathi News Suzlon Vs BHEL Share Price | सुझलॉन आणि BHEL सहित या 8 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 67% पर्यंत परतावा - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA
x

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळानंतर आता महाराष्ट्रातील व्यापारी मार्गावरही अदानी समूहाचा ताबा

Gautam Adani

मुंबई, ०४ सप्टेंबर |  मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळापाठोपाठ आता राज्यातील व्यापारी मार्गावरही अदानी समूहाच्या ताब्यात गेला आहे. महाराष्ट्राच्या सहा राज्यांशी लागून असलेल्या सीमेवरील तपासणी नाक्यांच्या प्रकल्पांचा कारभार आता अदानी समूहकाडे असेल. या 24 तपासणी नाक्यांची उभारणी करून व्यापारी मालवाहतुकीवरील सेवा शुल्क संकलनाचे अधिकार ‘सद्भाव इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट लिमिटेड’कडे होता.

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळानंतर आता महाराष्ट्रातील व्यापारी मार्गावरही अदानी समूहाचा ताबा – Adani acquires 49 percent stake in Maharashtra Border Check Post Network :

मात्र, अदानी समूहाने या कंपनीतील 49 टक्के वाटा विकत घेतला आहे. यासाठी 1680 कोटी रुपये मोजण्यात आले. त्यामुळे आता महाराष्ट्रातून बाहेर जाणाऱ्या किं वा महाराष्ट्रात येणाऱ्या व्यापारी वाहतुकीवरील ‘सेवा शुल्क’ वसुलीचे अधिकार अदानी समूहाला मिळाले आहेत.

काही दिवसांपूर्वीच अदानी समूहाने मुंबई विमानतळाचा कारभार हातात घेतला होता. मुंबई विमानतळ व्यवस्थापनामध्ये अदानी समूहाचा 74 टक्के हिस्सा असेल. जीव्हीके समूहाकडे असलेला 50.5 टक्के हिस्सा या समूहाने यापूर्वीच संपूर्णपणे मिळविला असून, आणखी 23.5 टक्के हिस्सा हा एअरपोर्ट कंपनी साऊथ आफ्रिका (एसीएसए) आणि बिडवेस्ट समूह या अन्य अल्पसंख्य भागीदारांकडून खरेदी केला जाईल, अशी माहिती अदानी समूहाकडून देण्यात आली होती.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Adani acquires 49 percent stake in Maharashtra Border Check Post Network.

हॅशटॅग्स

#GautamAdani(13)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x