5 November 2024 9:45 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | वोडाफोन आयडिया शेअर 8 रुपयांच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला नोट करा - NSE: IDEA IRFC Share Price | IRFC कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC Suzlon Share Price | मल्टिबॅगर शेअर 22% घसरला, स्वस्तात खरेदीची संधी, तज्ज्ञांनी काय सल्ला दिला - NSE: SUZLON Penny Stocks | 7 रुपयाचा पेनी शेअर पैशाचा पाऊस पाडतोय, रोज 20% अप्पर सर्किट, संधी सोडू नका - BOM: 532015 Tata Power Share Price | टाटा पॉवर सहित या 5 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, कमाईची मोठी संधी - NSE: TATAPOWER HAL Share Price | मल्टिबॅगर HAL सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 55% पर्यंत परतावा मिळेल - NSE: HAL Bank Account Alert | पगारदारांना 'या' 5 फायनान्शियल चुका पडू शकतात महागात, कधीच पैसा-संपत्ती वाढणार नाही - Marathi News
x

Adani Enterprises FPO | ब्रेकिंग! अदानी एंटरप्रायजेसचा एफपीओ रद्द, गुंतवणूकदारांचं काय होणार?, त्या व्हिडिओवर नेटिझन्सचा संताप

Adani Enterprises FPO

Adani Enterprises FPO | बुधवारी रात्री उशिरा अदानी समूहाने अदानी एंटरप्रायजेसचा एफपीओ रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आज 2 फेब्रुवारी 2023 रोजी गौतम अदानी यांनी एक व्हिडिओ जारी करत ग्रुपची बाजू सर्वांसमोर ठेवली आहे. बाजारातील अस्थिरतेमुळे अशा परिस्थितीत एफपीओसोबत जाणे नैतिकदृष्ट्या योग्य ठरणार नाही, असे आमच्या संचालक मंडळाला वाटले. हिंडनबर्ग वादानंतर गौतम अदानी पहिल्यांदाच समोर आले आहेत. अदानी एंटरप्रायझेसचा एफपीओ किरकोळ गुंतवणूकदारांसाठी २७ जानेवारी ते ३१ जानेवारी दरम्यान खुला होता.

एफपीओ रद्द केल्यानंतर अदानी समूहाने काय म्हटले
अदानी एंटरप्रायजेसने एका निवेदनात म्हटले आहे की, “कंपनीच्या संचालक मंडळाने आपल्या भागधारकांच्या हितासाठी एफपीओ रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. बोर्डाने निर्णय घेतला आहे की 20,000 कोटी रुपयांपर्यंतच्या एफपीओसह इक्विटी शेअर्स प्रत्येकी 1 रुपयांच्या अंकित मूल्यासह अंशत: पेड-अप तत्त्वावर वाढवले जाणार नाहीत. अदानी एंटरप्रायझेसच्या एफपीओचा आकार २०,००० कोटी रुपये होता.

अदानी एंटरप्राइजेजचे शेअर्स ३५ टक्क्यांनी घसरले
बुधवारी इंट्राडे व्यवहारात अदानी एंटरप्रायझेसचा शेअर जवळपास ३५ टक्क्यांनी घसरला. अदानी एंटरप्रायझेसचा शेअर बुधवारी बीएसईवर ३,०३० रुपयांवर उघडला. यानंतर डे ट्रेडिंगमध्ये हा शेअर 1942 रुपयांपर्यंत घसरला. म्हणजे दिवसभरातील उच्चांकी पातळीपेक्षा त्यात सुमारे १००८ रुपये म्हणजेच ३५ टक्के घट झाली. मात्र, बाजार बंद होताना शेअर्समध्ये किंचित सुधारणा झाली आणि बीएसईवर हा शेअर २८.४५ टक्क्यांनी घसरून २१२८.७० रुपयांवर बंद झाला. यामुळे अदानी एंटरप्रायझेसचे मार्केट कॅप २,४२,६७२.०४ कोटी रुपयांवर आले आहे.

गौतम अदानींनी व्हिडिओ शेअर केला… नेटिझन्सकडून तुफान फटकेबाजी
आज 2 फेब्रुवारी 2023 रोजी गौतम अदानी यांनी एक व्हिडिओ जारी करत ग्रुपची बाजू सर्वांसमोर ठेवली आहे. बाजारातील अस्थिरतेमुळे अशा परिस्थितीत एफपीओसोबत जाणे नैतिकदृष्ट्या योग्य ठरणार नाही, असे आमच्या संचालक मंडळाला वाटले असं त्यांनी म्हटले आहे. त्यावर नेटिझन्स मोठ्या प्रमाणात अदाणींवर टीका करत आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Adani Enterprises FPO cancel by Adani group check details on 02 February 2023.

हॅशटॅग्स

#Adani Enterprises FPO(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x