23 February 2025 8:38 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

Stock In Focus | हा स्टॉक देतोय तेजीचे संकेत, रेकॉर्ड हाय प्राईसपासून काही पावलं दूर, तज्ज्ञांकडून हा शेअर खरेदीचा सल्ला

stock in Focus

Stock In Focus | अदानी उद्योग समूह भारतातील प्रसिद्ध आणि अल्पावधीत जबरदस्त वाढलेला उद्योग समूह म्हणून प्रसिद्ध आहे. अदानी समूहातील अनेक कंपन्यांनी शेअर बाजारात अप्रतिम कामगिरी केली आहे. यामध्ये अदानी एंटरप्रायजेस लिमिटेड कंपनीचा ही समावेश आहे. लोकांना श्रीमंत बनवणाऱ्या या कंपनीचे तिमाही निकाल आज कंपनी जाहीर करणार आहे. यापूर्वी अदानी एंटरप्रायजेस लिमिटेड कंपनीचे शेअर्स आपल्या सर्वकालीन विक्रमी उच्चांक किमतीच्या जवळ पोहोचले आहेत. 2022 या चालू वर्षात अदानी एंटरप्रायझेस कंपनीने आपल्या दीर्घकालीन गुंतवणूकदारांना दुप्पट रिटर्न्स कमावून दिले आहेत.

मागील 5 वर्षांपासून अदानी एंटरप्रायझेस कंपनीच्या शेअरची किमत कमालीची वाढत आहे. या स्टॉक मध्ये सातत्याने भरघोस वाढ होत आहे. मागील काही काळात या कंपनीच्या शेअर्सच्या किमतीत 3500 टक्क्यांची अद्भूत वाढ पाहायला मिळाली होती. याशिवाय अदानी एंटरप्रायझेस कंपनीने 2022 या आर्थिक वर्षात सप्टेंबरमध्ये Nifty 50 निर्देशांकातही जागा बनवली आहे. या अदानी समूहातील कंपनीने श्री सिमेंटला बाजूला करून त्याची जाण घेतली आहे. सध्या या कंपनीचे शेअर्स आपल्या सर्वकालीन विक्रमी उच्चांक किमतीपासून फक्त 8 टक्के कमी आहे.

मागील वर्षभरात कंपनीची कामगिरी :
2022 मध्ये या कंपनीच्या शेअरची किमत 108 टक्क्यांनी वधारली आहे. 6 महिन्यांपूर्वी अदानी एंटरप्रायझेस कंपनीच्या शेअर्समध्ये पैसे लावणाऱ्या लोकांनी आतापर्यंत 58.75 टक्क्यांचा नफा कमावला आहे. त्याच वेळी अदानी समूहातील या स्टॉकने मागील एका महिन्यात आपल्या शेअर धारकांना 13.32 टक्केचा नफा कमावून दिला आहे. गेल्या एका वर्षापूर्वी अदानी एंटरप्रायझेस कंपनीचे शेअर 1472 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. सध्या या कंपनीच्या स्टॉकची किंमत 3584 रुपयांपर्यंत वाढली आहे. म्हणजेच या काळात कंपनीच्या शेअर्सची किमत 143 टक्क्यांनी वाढली आहे.

अदानी एंटरप्रायझेस कंपनीची बॅलेन्स शीट :
2022-23 या चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत अदानी एंटरप्रायझेस कंपनीच्या निव्वळ नफ्यात 73 टक्क्यांची वाढ झाली होती, आणि निव्वळ नफा 469 कोटी रुपये झाला होता. त्याच वेळी, वर्ष-दर-वर्ष या आधारावर जून तिमाहीत अदानी कंपनीच्या महसूलात 223 टक्क्यांची जबरदस्त वाढ होऊन, कंपनीने 41,066 कोटी रुपयेचा महसूल कमावला होता. अदानी एंटरप्रायझेस कंपनी पोर्ट-टू-पॉवर समूहासाठी नवीन व्यवसाय विकसित करण्यासाठी नावाजली आहे जी, ग्रीन एनर्जी, विमानतळ, सिमेंट, डेटा सेंटर्स आणि मीडिया यासारख्या नवीन क्षेत्रांमध्ये उद्योग विस्तार करत आहे. गुजरात मधील अहमदाबाद येथे मुख्यालय असलेली अदानी एंटरप्रायझेस लिमिटेड कंपनी भारतीय बिलिनियर गौतम अदानी यांच्या मालकीची असून अदानी समूहाचा एक भाग आहे. या मल्टीबॅगर कंपनीच्या स्टॉकने 2022 या वर्षात आतापर्यंत 108 टक्के परतावा मिळवून दिला आहे. गेल्या एका वर्षाच्या कालावधीत या कंपनीच्या शेअरची किंमत 142 टक्के पेक्षा अधिक वधारली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Adani Enterprises limited stock in Focus after declaring profitable Quarterly results on 04 November 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Stock in Focus(73)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x