Adani Enterprises Share Price | हेराफेरीला जागतिक धक्के! अदानी एंटरप्रायजेसला अमेरिकी शेअर बाजारातून हटवले
Adani Enterprises Share Price | हायंडेनबर्ग आणि सिरच अहवालानंतर अदानी समूहाला मोठा धक्का बसला आहे. अमेरिकी शेअर बाजार डाऊ जोन्सने अदानी समूहाची कंपनी अदानी एंटरप्रायजेसला मोठा झटका दिला आहे. एस अँड पी डाऊ जोन्स इंडेक्सच्या नोटनुसार अदानी एंटरप्रायजेसला डाऊ जोन्स सस्टेनेबिलिटी इंडेक्समधून वगळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Adani Enterprises Share Price | Adani Enterprises Stock Price | BSE 512599 | NSE ADANIENT)
नॅशनल स्टॉक एक्स्चेंजने (एनएसई) अदानी एंटरप्रायजेस, अदानी पोर्ट्स आणि अंबुजा सिमेंट च्या शेअर्सना वॉच लिस्टमध्ये टाकल्यानंतर आता अदानी एंटरप्रायजेसच्या शेअर्सना अमेरिकन बाजारातून धक्का बसला आहे. आता हा शेअर डाऊ जोन्स सस्टेनेबिलिटी इंडेक्समधून बाहेर पडण्याच्या मार्गावर आहे. त्याची प्रभावी वेळ मंगळवार, ७ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. अमेरिकेच्या बाजाराकडून ही माहिती देण्यात आली आहे.
अदानी एंटरप्रायझेसला स्टॉक हेराफेरी आणि अकाउंटिंग घोटाळ्याच्या आरोपांचे विश्लेषण केल्यानंतर निर्देशांकातून माघार घेण्यास सांगण्यात आले आहे. यापूर्वी हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालात टॅक्स हेवनचा गैरवापर केल्याचा आरोप करण्यात आला होता. तसेच सात सूचीबद्ध कंपन्यांच्या कर्जाबाबत आणि मूल्यांकनाबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे.
शेअरमध्ये फेरफार आणि अकाऊंटिंग घोटाळ्याच्या आरोपांमुळे मीडिया आणि स्टेकहोल्डर्सच्या विश्लेषणानंतर अदानी एंटरप्रायजेसला डाऊ जोन्स स्टेबिलिटी इंडेक्समधून वगळण्यात येईल, असे अमेरिकन स्टॉक एक्स्चेंजने एका निवेदनात म्हटले आहे. एस अँड पी डाऊ जोन्स निर्देशांक मंगळवार, 7 फेब्रुवारी 2023 रोजी उघडण्यापूर्वी प्रभावी बदल करेल, असे निर्देशांकाच्या घोषणेत म्हटले आहे. हिंडेनबर्गच्या अहवालानंतर अदानी समूहाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. गेल्या सहा सत्रांमध्ये एनएसईवरील अदानी एंटरप्रायझेसच्या शेअरची किंमत ३,४४२ रुपयांवरून ५५ टक्क्यांनी घसरून १,५६५ रुपयांवर आली आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: Adani Enterprises Share Price crashed after removal from the Dow Jones Sustainability Indices 03 February 2023.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- BSNL Broadband Offer | BSNL ऑफर; मिळणार 1300GB डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा, डिटेल्स जाणून घ्या
- RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने कमाई होणार, मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: RVNL
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- BEL Vs Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 45% पर्यंत मिळेल परतावा - NSE: TATAMOTORS
- Infosys Share Price | आयटी इन्फोसिस शेअर चार्टवर रॉकेट तेजीचे संकेत, मजबूत कमाई होणार - NSE: INFY
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन