Adani Enterprises Share Price | अदानी एंटरप्रायझेस शेअर्स तेजीत, कंपनीबाबत सकारात्मक बातमीने जोरदार खरेदी सुरु
Adani Enterprises Share Price | अदानी एंटरप्रायझेस कंपनीच्या शेअर्सने मागील काही महिन्यात आपल्या गुंतवणुकदारांना भरघोस कमाई करून दिली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या ऑक्टोबर-डिसेंबर 2023 तिमाहीत अदानी एंटरप्रायझेस लिमिटेड कंपनीने मागील वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत दुप्पट निव्वळ नफा कमावला आहे. त्यामुळे आज या कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी पाहायला मिळत आहे.
अदानी एंटरप्रायझेस कंपनीने अक्षय ऊर्जा, विमानतळ आणि रस्ते व्यवसायामध्ये मजबूत कामगिरी केली आहे. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4 टक्के वाढीसह 3236.55 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज शुक्रवार दिनांक 2 फेब्रुवारी 2024 रोजी अदानी एंटरप्रायझेस कंपनीचे शेअर्स 1.42 टक्के वाढीसह 3,198.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
अदानी एंटरप्रायझेस कंपनीने एका निवेदनात माहिती दिली की, ऑक्टोबर-डिसेंबर 2023 या तिमाहीत कंपनीने 1,888 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मागील वर्षी याच तिमाही कालावधीत कंपनीने 820 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. अदानी एंटरप्रायझेस कंपनीने सांगितले की, त्यांच्या ग्रीन हायड्रोजन व्यवसायातील करपूर्व नफा चार पट अधिक वाढून 1,655 कोटी रुपये नोंदवला गेला आहे.
त्याचप्रमाणे कंपनीने आपल्या रस्ते व्यवसायामधून जवळपास 910 कोटी रुपये, आणि विमानतळ व्यवसायातून 1774 कोटी रुपये करपूर्व नफा कमावला आहे. डिसेंबर 2023 तिमाहीत अदानी एंटरप्रायझेस कंपनीने मागील वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत 89 टक्के वाढीसह एकूण 3,717 कोटी रुपये करपूर्व नफा नोंदवला आहे.
अदानी समुहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी आपल्या निवेदनात माहिती दिली की, “अदानी एंटरप्रायझेस कंपनीच्या अक्षय ऊर्जा आणि विमानतळ या व्यवसायामुळे कंपनीने डिसेंबर तिमाहीत जबरदस्त कामगिरी केली आहे. यासह कंपनी आपल्या ग्राहकांना आणखी चांगले अनुभव प्रदान करण्यास वचनबध्द आहे. ग्रीन हायड्रोजन उत्पादनासाठी कंपनी पूर्णतः एकात्मिक उत्पादन साखळी स्थापन करण्याची योजना आखत आहे”. चालू आर्थिक वर्षाच्या डिसेंबर तिमाहीत अदानी एंटरप्रायझेस कंपनीचे परिचालन उत्पन्न मागील वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत 7 टक्के वाढून 28,827 कोटी रुपये नोंदवले गेले आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Adani Enterprises Share Price NSE Live 02 February 2024.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
- EPFO Passbook | पगारदारांनो, EPF खात्यातून पैसे काढायचे आहेत, पण क्लेम रिजेक्ट होतोय, अर्जापूर्वी ही काळजी घ्या
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- FASTag Alert | तुमच्याकडे 4 चाकी वाहन आहे का, अत्यंत महत्त्वाची अपडेट, या तारखेपासून नवा नियम, मोठा दंड भरावा लागेल
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर मालामाल करणार - NSE: TATATECH
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- Income Tax Return | पगारदारांनो, नवीन वर्षात तुमची टॅक्स लायबिलिटी कमी करा, 'हे' 6 पर्याय पैसा वाचवतील
- RVNL Share Price | आरव्हीएनएल कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर बुलेट ट्रेनच्या स्पीडने परतावा देणार - NSE: RVNL
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरला आउटपरफॉर्म रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE
- Loan EMI Alert | कर्जबाजारी होण्यापासून वाचायचं असेल तर वर्षाच्या सुरुवातीपासूनच घ्या योग्य काळजी, या टिप्स फॉलो करा