15 January 2025 3:44 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्याला 20,000 रुपये मिळतील, ही सरकारी योजना ठरेल खूप फायद्याची NBCC Share Price | पीएसयू NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मिळेल मजबूत परतावा - NSE: NBCC IREDA Share Price | मल्टिबॅगर इरेडा शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली - NSE: IREDA Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: APOLLO Quant Mutual Fund | पगारदारांनो, टॅक्स वाचेल आणि पैसा 3 ते 4 पटीने वाढेल, ही म्युच्युअल फंड योजना मालामाल करेल IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, प्राईस बँड सह डिटेल्स नोट करा, कमाईची संधी सोडू नका 8th Pay Commission | 8'व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी
x

Adani Enterprises Share Price | मार्ग श्रीमंतीचा! 13000% परतावा देणाऱ्या अदानी एंटरप्रायझेस शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर

Adani Enterprises Share Price

Adani Enterprises Share Price | अदानी समुहाचा भाग असेलल्या अदानी एंटरप्रायझेस कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत खरेदी पाहायला मिळत आहे. ग्लोबल ब्रोकरेज हाऊस जेफरीजच्या तज्ञांनी अदानी एंटरप्रायझेस लिमिटेड कंपनीच्या शेअर्समधील वाढीबाबत सकारात्मक भावना व्यक्त केल्या आहेत. सध्या जेफरीज फर्मने अदानी एंटरप्रायझेस कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे.

जेफरीज फर्मच्या मते, अदानी एंटरप्रायझेस कंपनीचे शेअर्स अल्पावधीत 3800 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. म्हणजेच हा स्टॉक सध्याच्या किमतीवरून 20 टक्के वाढू शकतो. आज गुरूवार दिनांक 15 फेब्रुवारी 2024 रोजी अदानी एंटरप्रायझेस स्टॉक 0.52 टक्के वाढीसह 3,224 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अदानी एंटरप्रायझेस कंपनीचे शेअर्स 2 टक्क्यांच्या वाढीसह 3245.65 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. अदानी एंटरप्रायझेस कंपनीच्या विमानतळ आणि ग्रीन हायड्रोजन संबंधित नवीन व्यवसायामुळे ब्रोकरेज हाऊसला विश्वास आहे की, आर्थिक वर्ष 2026 पर्यंत कंपनीचा एकत्रित ऑपरेटिंग नफा दुप्पट होऊ शकतो. आर्थिक वर्ष 2028 पर्यंत त्यात 3 पट वाढ होऊ शकते.

ब्रोकरेज हाऊसने आपल्या अहवालात माहिती दिली आहे की, अदानी एंटरप्रायझेस कंपनी ग्रीन हायड्रोजन, विमानतळ, डेटा सेंटर, रस्ते, तांबे यांसारख्या नवीन व्यवसायात आघाडीची कंपनी म्हणून उदयास येत आहे. मागील एका वर्षात अदानी एंटरप्रायझेस कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 85 टक्के परतावा कमावून दिला आहे. 14 फेब्रुवारी 2023 रोजी अदानी एंटरप्रायझेस कंपनीचे शेअर्स 1750.30 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 14 फेब्रुवारी 2024 रोजी अदानी एंटरप्रायझेस कंपनीचे शेअर 3215.65 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

मागील 5 वर्षात अदानी एंटरप्रायझेस कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 2580 टक्के परतावा कमावून दिला आहे. 15 फेब्रुवारी 2019 रोजी या कंपनीचे शेअर्स 119.65 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 14 फेब्रुवारी 2024 रोजी अदानी एंटरप्रायझेस स्टॉक 3245.65 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. मागील एका दशकात अदानी एंटरप्रायझेस कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 13000 टक्के परतावा कमावून दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Adani Enterprises Share Price NSE Live 15 February 2024.

हॅशटॅग्स

#Adani Enterprises Share Price(38)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x