5 February 2025 9:19 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
PPF Scheme | सरकारी PPF योजना ठरेल फायद्याची, अवघी 100 रुपयांची गुंतवणूक 10 लाख रुपयांचा परतावा देईल SBI Car Loan | एसबीआय बँकेकडून 5 वर्षांसाठी 8 लाखांचे कार लोन घेतल्यानंतर किती EMI हप्ता भरावा लागेल, रक्कम जाणून घ्या TATA Punch EV | धमाका ऑफर, 19,500 रुपयांच्या मासिक EMI वर घरी घेऊन या 'टाटा पंच EV, संधी सोडू नका Rent Agreement | सावधान, भाड्याने घर घेताना ॲग्रीमेंटमधील 'ही' कलमे अवश्य वाचा, अन्यथा मोठं नुकसान होईल IRB Infra Share Price | 54 रुपयाचा शेअर मालामाल करणार, ब्रोकरेज फर्म बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IRB Tata Mutual Fund | जबरदस्त फंड, 2000 च्या SIP बचतीवर 2 कोटी रुपये मिळतील, तर एकरकमी 1 लाखावर 3.5 कोटी मिळतील Old Vs New Tax Regime | पगारदारांसाठी कोणती टॅक्स प्रणाली फायदेशीर ठरेल, तुमचा फायदा कुठे सोप्या शब्दांत जाणून घ्या
x

Adani Enterprises Share Price | अदानी एंटरप्रायझेस कंपनीचे शेअर वाढणार? गौतम अदानी कंपनी वाचवण्यासाठी काय प्रयत्न करत आहेत?

Adani Enterprises Share Price

Adani Enterprises Share Price | ‘अदानी एंटरप्रायझेस लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स हिंडनबर्ग अहवाल आल्यानंतर क्रॅश झाले होते. मात्र गुरूवार दिनांक 2 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.57 टक्के वाढीसह 1,588.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. यापूर्वी हिंडनबर्ग अहवाल आल्यानंतर एका महिन्यात या कंपनीचे शेअर्स 63 टक्के खाली आले होते. तथापि मागील पाच दिवसांत या कंपनीचे स्टॉक 15.30 टक्के वाढले आहेत. शेअर बाजारातील जाणकारांच्या मते ‘अदानी एंटरप्रायझेस लिमिटेड’ कंपनीच्या शेअरमध्ये तेजी येऊ शकते.

स्टॉक मार्केट तज्ञांचे मत :
मुंबईस्थित सोव्हरेन ग्लोबल मार्केट्स प्रायव्हेट लिमिटेडचे इक्विटी रिसर्च फर्म तज्ञ म्हणतात की, टेक्निकल चार्टवर ‘अदानी एंटरप्रायझेस’ कंपनीचे शेअर्स मजबूत काउंटर ट्रेंड मूव्ह दर्शवत आहेत. पुढील काळात स्टॉकमध्ये आणखी चढ-उतार पाहायला मिळू शकतात. चार्ट पॅटर्नचा आढावा घेतला तर आपल्या समजेल की, हा स्टॉक पुढील काळात 1,900 रुपयेपर्यंत वाढू शकतो. तज्ज्ञांच्या मते पुढील काळात या स्टॉकमध्ये 40 टक्के वाढ पाहायला मिळू शकते. ‘अदानी एंटरप्रायझेस लिमिटेड’ कंपनीच्या शेअरला 1,400 रुपयेजवळ मजबूत सपोर्ट आहे.

कंपनी वाचवण्यासाठी अदानीचे प्रयत्न :
हिंडेनबर्ग अहवाल आल्यानंतर अडचणीत सापडलेला गौतम अदानी उद्योग समूहतील कंपनीचे शेअर्स कोसळले. कंपनीच्या गुंतवणूकदारांचा विश्वास पुन्हा जिंकण्यासाठी गौतम अदानी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. अदानी उद्योग समूहाने हाँगकाँग आणि सिंगापूरमध्ये रोड शो आयोजित केले होते. या रोड शोमध्ये सहभागी असलेल्या अधिकाऱ्यांच्या मते, अदानी समूहाकडे सध्या 800 दशलक्ष डॉलर्स क्रेडिट सुविधे व्यतिरिक्त पुढील तीन वर्षांत कर्जाची परतफेड करण्यासाठी पुरेसा पैसा आहे. याचा अर्थ कंपनी सहज कर्ज परतफेड करू शकते, इतका पैसा कंपनीकडे आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Adani Enterprises Share Price stock market live on 02 March 2023.

हॅशटॅग्स

#Adani Enterprises Share Price(38)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x