Adani Enterprises Share Price | अदानी एंटरप्रायझेस शेअर्स वर डिव्हीडंड मिळणार, रेकॉर्ड तारीख पाहून फायदा घ्यावा, पुढे स्टॉकचं काय होणार?
Adani Enterprises Share Price | अदानी एंटरप्रायझेस लिमिटेड कंपनीने आपल्या शेअर धारकांना मोठा लाभ देण्याची घोषणा केली आहे. अदानी एंटरप्रायझेस कंपनी आपल्या पात्र शेअर धारकांना 1.20 रुपये प्रति शेअर म्हणजेच दर्शनी मुल्यावर 120 टक्के लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. (Adani Enterprises Share)
अदानी एंटरप्रायझेस लिमिटेड कंपनीच्या संचालक मंडळाने लाभांश पेमेंटसाठी 7 जुलै 2023 हा दिवस रेकॉर्ड तारीख म्हणून जाहीर केला आहे. काल या कंपनीचे शेअर्स 2,307.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज बुधवार दिनांक 28 जून 2023 रोजी अदानी एंटरप्रायझेस कंपनीचे शेअर्स 4.31 टक्के वाढीसह 2,394.45 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. (Adani Enterprises Share Price NSE)
अदानी एंटरप्राइझ डिव्हिडंड तपशील
अदानी एंटरप्राइजेस कंपनीने सेबीला दिलेल्या माहिती म्हंटले आहे की, कंपनीने आपल्या शेअर धारकांना लाभांश वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. आणि कंपनीने रेकॉर्ड तारख म्हणून 7 जुलै 2023 हा दिवस निश्चित केला आहे. अदानी एंटरप्रायझेस कंपनी आपल्या शेअर धारकांना 1 रुपये दर्शनी मूल्याच्या पूर्ण पेड – अप इक्विटी शेअरवर 1.20 रुपये म्हणजेच 120 टक्के लाभांश वाटप करणार आहे.
मार्च 2023 तिमाहीमध्ये अदानी एंटरप्राइजेस कंपनीने 31,346.05 कोटी रुपये ऑपरेशनल महसूल संकलित केला होता, जो Q4FY22 मध्ये संकलित करण्यात आलेल्या 24,865.52 कोटी रुपये महसुलापेक्षा 26 टक्के अधिक आहे. आर्थिक वर्ष 2023 मध्ये अदानी एंटरप्रायझेस कंपनीची कमाई 136,977.76 कोटी रुपये नोंदवली गेली होती. तर FY22 मध्ये कंपनीने फक्त 69,420.18 कोटी रुपये कमाई केली होती.
अदानी ग्रुप कंपनीने Q4FY23 मध्ये 30,179.51 कोटी रुपये निव्वळ खर्च केला होता, जो Q4FY22 च्या 24,673.25 कोटींच्या तुलनेत 22.31 टक्के अधिक आहे. FY23 मध्ये अदानी एंटरप्रायझेस कंपनीने निव्वळ खर्च 48,690 कोटी रुपये नोंदवला होता.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Adani Enterprises Share Price today on 28 June 2023.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
- EPFO Passbook | पगारदारांनो, EPF खात्यातून पैसे काढायचे आहेत, पण क्लेम रिजेक्ट होतोय, अर्जापूर्वी ही काळजी घ्या
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- FASTag Alert | तुमच्याकडे 4 चाकी वाहन आहे का, अत्यंत महत्त्वाची अपडेट, या तारखेपासून नवा नियम, मोठा दंड भरावा लागेल
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर मालामाल करणार - NSE: TATATECH
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- Income Tax Return | पगारदारांनो, नवीन वर्षात तुमची टॅक्स लायबिलिटी कमी करा, 'हे' 6 पर्याय पैसा वाचवतील
- RVNL Share Price | आरव्हीएनएल कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर बुलेट ट्रेनच्या स्पीडने परतावा देणार - NSE: RVNL
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरला आउटपरफॉर्म रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE
- Loan EMI Alert | कर्जबाजारी होण्यापासून वाचायचं असेल तर वर्षाच्या सुरुवातीपासूनच घ्या योग्य काळजी, या टिप्स फॉलो करा