22 November 2024 11:06 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA
x

Adani Green Energy Share Price | अदानी ग्रीन एनर्जी शेअरने अवघ्या 14 दिवसांत 102 टक्के परतावा दिला, स्टॉक खरेदी वाढली

Adani Green Energy Share Price

Adani Green Energy Share Price | हिंडनबर्ग प्रकरणानंतर अदानी ग्रुपच्या शेअर्समध्ये हळूहळू सुधारणा होत आहे. अदानी ग्रुपचे बरेच शेअर्स सध्या रिकव्हरीच्या ट्रॅकवर परत येत आहेत. ‘अदानी ग्रीन एनर्जी’ कंपनीच्या शेअर्सने जबरदस्त रिकव्हरी केली आहे. अल्पावधीत या कंपनीच्या शेअरने आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवरून 102 टक्के वाढ नोंदवली आहे. म्हणजेच अवघ्या 14 दिवसांत ‘अदानी ग्रीन एनर्जी’ कंपनीच्या शेअरने एक लाखावर दुप्पट परतावा दिला आहे. (Adani Green Energy Limited)

बुधवार दिनांक 22 मार्च 2023 रोजी ‘अदानी ग्रीन एनर्जी’ कंपनीचे शेअर्स 5.00 टक्के वाढीसह 935.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. अदानी ग्रीन एनर्जी कंपनीच्या शेअर्समध्ये बऱ्याच काळापासून 5 टक्के अप्पर सर्किट लागत आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 439.35 रुपये होती. मागील एका महिन्यापेक्षा कमी कालावधीत ‘अदानी ग्रीन एनर्जी’ कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 100 टक्के पेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. तथापि हा शेअर अजूनही 3,048 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीच्या खाली ट्रेड करत आहे. ‘अदानी ग्रीन एनर्जी’ कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1,41,161.05 कोटी रुपये आहे.

कंपनीबद्दल थोडक्यात :
‘अदानी ग्रीन एनर्जी’ कंपनी ही अदानी उद्योग समूहाचा भाग असून अक्षय ऊर्जा क्षेत्रात व्यापार करणारी कंपनी आहे. ही कंपनी युटिलिटी स्केल ग्रिड कनेक्टेड सौर आणि पवन कृषी प्रकल्प विकसित करण्याचे काम करते. कंपनीचे पूर्ण लक्ष डिकार्बोनाइजिंग वीज निर्मितीवर केंद्रित आहे. 2 मार्च 2023 रोजी यूएस स्थित ‘GQG Partners’ या अग्रगण्य जागतिक इक्विटी गुंतवणूक फर्मने 4 अदानी ग्रुप कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. अदानी ग्रीन एनर्जी कंपनी देखील त्यापैकी एक आहे. GQG फर्मनी अदानी ग्रीन एनर्जीमधील 55.6 दशलक्ष शेअर्स 504.60 रुपये प्रति शेअर किमतीवर खरेदी करण्यासाठी 2,806 कोटी रुपये खर्च केले आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Adani Green Energy Share Price 541450 on 22 March 2023.

हॅशटॅग्स

#Adani Green Energy Share Price(9)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x