29 January 2025 11:23 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरबाबत फायद्याची अपडेट, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: TATAMOTORS Vedanta Share Price | वेदांता शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, टॉप ब्रोकरेज फर्म बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: VEDL SIP Mutual Fund | 500 रुपयांची SIP केल्यानंतर 5, 10, 20, 25 आणि 30 वर्षांमध्ये किती परतावा मिळणार, रक्कम जाणून घ्या Penny Stocks | 1 रुपया 88 पैशाचा पेनी स्टॉक श्रीमंत करणार, कंपनीच्या नफ्यात 10,000 टक्क्यांनी वाढ, खरेदीला गर्दी - BOM: 542724 IRFC Share Price | रेल्वे स्टॉक फोकसमध्ये, टेक्निकल चार्टवर फायद्याचे संकेत, होईल मजबूत कमाई - NSE: IRFC Trident Share Price | 28 रुपयांच्या ट्रायडेंट शेअरमध्ये तेजीचे संकेत, शेअर 1 वर्षात 35 टक्क्यांनी घसरला - NSE: TRIDENT BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीने परतावा देणार डिफेन्स कंपनी शेअर - NSE: BEL
x

Adani Green Share Price | अदानी ग्रीन शेअर्समध्ये तुफान तेजी, आज 15% वाढला, अजून एक सकारत्मक बातमी

Adani Green Share Price

Adani Green Share Price | मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. या रॅलीत परकीय गुंतवणूकदारांनी ही मोठ्या प्रमाणात भाग घेतला आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बीएसई सेन्सेक्स निर्देशांक 210 अंकांच्या वाढीसह 69099 च्या पातळीवर पोहोचला होता. तर निफ्टी निर्देशांक 57 अंकांच्या वाढीसह 20744 अंकांवर पोहोचला होता.

मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सुरुवातीच्या काही तासात, निफ्टी मिडकॅप 100, बीएसई स्मॉल कॅप आणि निफ्टी बँक निर्देशांकात जबरदस्त तेजी पाहायला मिळाली होती. तर निफ्टी आयटी निर्देशांक किंचित कमजोरीसह ट्रेड करत होता. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सुरुवातीच्या काही तासात अदानी एंटरप्रायझेस आणि अदानी पोर्ट्स कंपनीचे शेअर्स पाच टक्क्यांच्या अप्पर सर्किटमध्ये अडकले होते. तर अदानी ग्रीन कंपनीचे शेअर्स मागील सहा ट्रेडिंग सेशनमध्ये 25 टक्क्यांनी मजबूत झाले आहेत.

अदानी ग्रीन कंपनीचे शेअर्स मंगळवारच्या रॅलीमध्ये 1280 रुपये किमतीवर पोहचले होते. तर आज देखील या कंपनीचे शेअर्स मोठ्या प्रमाणात खरेदी केले जात आहे. अदानी ग्रीन कंपनीचे शेअर्स 24 नोव्हेंबर रोजी 938 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज बुधवार दिनांक 6 डिसेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 14.86 टक्के वाढीसह 1,548.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

अदानी ग्रीन एनर्जी कंपनीने मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये माहिती दिली की, त्यांनी सीनियर डेबिट सुविधेद्वारे 1.36 अब्ज डॉलर्स फॉलो-ऑन फंडिंगला मान्यता दिली आहे. हा कन्स्ट्रक्शन फायनान्सिंग फ्रेमवर्कचा भाग म्हणून आतापर्यंत केला गेलेला सर्वात मोठा वित्तपुरवठा मानला जात आहे.

मार्च 2021 मध्ये झालेल्या प्रारंभिक वित्तपुरवठापासून आता अदानी ग्रीन कंपनीद्वारे 3 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. अदानी ग्रीन कंपनीच्या कन्स्ट्रक्शन फायनान्सिंग फ्रेमवर्कला जागतिक पातळीवरील आंतरराष्ट्रीय बँकांच्या कन्सोर्टियमने आपले समर्थन प्रदान केले आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Adani Green Share Price NSE 06 December 2023.

हॅशटॅग्स

#Adani Green Share Price(27)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x