18 November 2024 8:01 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर चार्टवर मोठे संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक ब्रेकआऊट देणार का - NSE: RVNL NTPC Share Price | एनटीपीसी शेअरला 'आउटपरफॉर्म' रेटिंग, स्टॉक मालामाल करणार, यापूर्वी 218% परतावा दिला - NSE: NTPC EPFO Passbook | पगारदारांनो, टेन्शन फ्री रहा, EPF खात्यातून सहज ऑनलाईन पैसे काढता येतील, बॅलन्स चेक करून काढा पैसे HDFC Mutual Fund | SIP केवळ 3 हजारांची, मिळेल 5 करोडोंचा घसघशीत परतावा, पहा या म्युच्युअल फंडाची कमाल - Marathi News Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News Pension Scheme | टेन्शन नको, ही सरकारी योजना महिना 1 लाख रुपये पेन्शन देईल, फायद्याची योजना लक्षत ठेवा - Marathi News
x

Adani Green Share Price | अदानी ग्रीन शेअर्समध्ये मजबूत तेजी येणार, नवीन अपडेट येताच शेअर्सची खरेदी वाढली

Adani Green Share Price

Adani Green Share Price | अदानी ग्रीन एनर्जी कंपनीच्या शेअर्समध्ये आज जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. नुकताच श्रीलंका सरकारने अदानी समूहाचा भाग असलेल्या अदानी ग्रीन एनर्जी कंपनीसोबत 20 वर्षांसाठी वीज खरेदी करार केला आहे. श्रीलंका सरकारने हा करार ईशान्य भागातील प्रदेशात 484 मेगावॅट क्षमतेचा पवन ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी केला आहे. ( अदानी ग्रीन एनर्जी कंपनी अंश )

दरम्यान मंगळवारी शेअर बाजारातील जबरदस्त घसरणीमुळे अदानी ग्रीन एनर्जी कंपनीचे शेअर्स मजबूत विक्रीच्या दबावात ट्रेड करत होते. आज बुधवार दिनांक 8 मे 2024 रोजी अदानी ग्रीन एनर्जी स्टॉक 1.07 टक्के वाढीसह 1,744.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अदानी ग्रीन एनर्जी स्टॉक 2.28 टक्के घसरणीसह 1725.10 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. श्रीलंकेचे ऊर्जा मंत्री कांचना विजयसेकरा यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर माहिती दिली की, अदानी ग्रीन एनर्जी कंपनीसोबतच्या करारामुळे होणारा जो वीज खरेदीचा खर्च असेल, तो सध्याच्या ऊर्जा निर्मिती खर्चापेक्षा खूप कमी असेल. हा वीज खरेदीचा दर 39.02 श्रीलंकन रुपये प्रति किलोवॅट/तास असणार आहे. श्रीलंका सरकारने जारी केलेल्या अधिकृत निवेदनानुसार, त्यांनी मार्च 2022 मध्ये मन्नार आणि पुणेरीन याठिकाणी 484 मेगावॅट क्षमतेचा पवनऊर्जा प्रकल्प उभारण्याची मंजुरी दिली होती.

श्रीलंका सरकारने अदानी ग्रीन एनर्जी कंपनीसोबतच्या कराराला मंजुरी दिल्यानंतर, प्रकल्प प्रस्तावाचे मूल्यांकन करण्यासाठी एक समिती नेमली आहे. या समितीच्या शिफारशींनुसार श्रीलंका सरकारच्या मंत्रिमंडळाने अंतिम किंमत म्हणून 8.26 डॉलर्स हा दर स्वीकारण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली. आर्थिक वर्ष 2023-24 च्या मार्च तिमाहीत अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनीचा निव्वळ नफा 38.85 टक्क्यांच्या घसरणीसह 310 कोटी रुपये नोंदवला होता.

आर्थिक वर्ष 2022-23 च्या जानेवारी-मार्च तिमाहीत या कंपनीने 507 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. आर्थिक वर्ष 2023-24 च्या मार्च तिमाहीत अदानी ग्रीन एनर्जी कंपनीने 2,806 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. आर्थिक वर्ष 2022-23 च्या मार्च तिमाहीत कंपनीने 2,977 कोटी रुपये महसूल संकलित केला होता.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Adani Green Share Price NSE Live 08 May 2024.

हॅशटॅग्स

#Adani Green Share Price(27)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x