29 January 2025 11:31 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | पोस्टाची प्रत्येक महिन्याला नफा मिळवून देणारी फायद्याची योजना, महिन्याला मिळतील 9250 रुपये Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरबाबत फायद्याची अपडेट, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: TATAMOTORS Vedanta Share Price | वेदांता शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, टॉप ब्रोकरेज फर्म बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: VEDL SIP Mutual Fund | 500 रुपयांची SIP केल्यानंतर 5, 10, 20, 25 आणि 30 वर्षांमध्ये किती परतावा मिळणार, रक्कम जाणून घ्या Penny Stocks | 1 रुपया 88 पैशाचा पेनी स्टॉक श्रीमंत करणार, कंपनीच्या नफ्यात 10,000 टक्क्यांनी वाढ, खरेदीला गर्दी - BOM: 542724 IRFC Share Price | रेल्वे स्टॉक फोकसमध्ये, टेक्निकल चार्टवर फायद्याचे संकेत, होईल मजबूत कमाई - NSE: IRFC Trident Share Price | 28 रुपयांच्या ट्रायडेंट शेअरमध्ये तेजीचे संकेत, शेअर 1 वर्षात 35 टक्क्यांनी घसरला - NSE: TRIDENT
x

Adani Green Share Price | मागील 1 महिन्यात 60% परतावा देणाऱ्या अदानी ग्रीन शेअर्समध्ये पुढे काय होणार? फायदा की नुकसान?

Adani Green Share Price

Adani Green Share Price | अदानी समूहाचा भाग असलेल्या अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनीने बुधवारी टोटल एनर्जी रिन्युएबल सिंगापूर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीसोबत संयुक्त उपक्रम करार केल्याची माहिती दिली आहे. टोटल एनर्जी रिन्युएबल सिंगापूर कंपनीने अदानी ग्रीन एनर्जी कंपनीमधील 50 टक्के भाग भांडवल 300 दशलक्ष डॉलर्सला घेऊन अदानी रिन्युएबल एनर्जी लिमिटेड या संयुक्त उपक्रमा अंतर्गत धारण केले आहे.

अदानी रिन्युएबल एनर्जी कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये 1050 मेगावॅट क्षमतेचे विविध अक्षय ऊर्जा प्रकल्प कार्यरत आहेत. आज गुरूवार दिनांक 28 डिसेंबर 2023 रोजी अदानी ग्रीन एनर्जी स्टॉक 0.83 टक्के घसरणीसह 1,587.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

टोटल गृप आणि अदानी समूह भारतातील विविध सौर आणि पवन ऊर्जा निर्मिती प्रकल्पांमध्ये एकत्रित काम करत आहेत. टोटल एनर्जी गृपने अदानी ग्रीन एनर्जी कंपनी लिमिटेडमध्ये 4013 कोटी रुपये गुंतवणूक केली आहे. त्या बदल्यात त्यांना परिवर्तनीय डिबेंचर्स देण्यात आले आहेत.

टोटल एनर्जीसोबत अदानी ग्रीन एनर्जी कंपनीने 1050 मेगावॅट क्षमतेचा संयुक्त व्यावसायिक उपक्रम सुरू केला आहे. या संयुक्त उपक्रमांतर्गत, टोटल एनर्जी कंपनीने अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनीमध्ये 300 दशलक्ष डॉलर्सची मोठी गुंतवणूक केली असून त्याबदल्यात 50 टक्के भाग भांडवल घेतले आहे.

टोटल एनर्जी कंपनी आणि अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनीच्या सोबतच्या या धोरणात्मक सहकार्यामुळे अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनीला 2030 पर्यंत 45 GW ऊर्जा निर्मिती क्षमतेचे लक्ष्य साध्य करता येईल. अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड आणि टोटल एनर्जी यांनी संयुक्त उपक्रम सुरू केली असल्याची घोषणा सप्टेंबर 2023 मध्ये जाहीर करण्यात आली होती.

बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अदानी ग्रीन एनर्जी स्टॉक 1620 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. मागील 5 दिवसांत अदानी ग्रीन एनर्जी कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना पाच टक्के परतावा मिळवून दिला आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या शेअरधारकांना 60 टक्के नफा मिळवून दिला आहे.

मागील 6 महिन्यांत अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनीच्या शेअर्सची किंमत 960 रुपये या नीचांक किंमत पातळीवरून 70 टक्के वाढली आहे. 2023 या वर्षात अदानी ग्रीन एनर्जी कंपनीच्या शेअर्सची किंमत 15 टक्के घसरली आहे. 18 जानेवारी 2023 रोजी अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनीचे शेअर्स 2096 रुपये या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. मात्र हिंडेनबर्ग फर्मच्या संशोधन अहवालामध्ये जे आरोप करण्यात आले होते, त्यामुळे अदानी ग्रीन एनर्जी स्टॉक क्रॅश झाला होता.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Adani Green Share Price NSE Live 28 December 2023.

हॅशटॅग्स

#Adani Green Share Price(27)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x