15 January 2025 1:59 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: APOLLO Quant Mutual Fund | पगारदारांनो, टॅक्स वाचेल आणि पैसा 3 ते 4 पटीने वाढेल, ही म्युच्युअल फंड योजना मालामाल करेल IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, प्राईस बँड सह डिटेल्स नोट करा, कमाईची संधी सोडू नका 8th Pay Commission | 8'व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन शेअरबाबत मोठे संकेत, तज्ज्ञांकडून SELL रेटिंग, नेमकं कारण काय - NSE: NTPCGREEN
x

Adani Group Bonds | अदाणी ग्रुपवर आर्थिक संकटांची सुनामी, शेअरनंतर जागतिक बाजारात बाँड्सची स्थिती बिघडली, कोणी कर्ज देईना

Adani Group Bonds

Adani Group Bonds | गेले काही दिवस अदानी समूहासाठी खूप तणावपूर्ण होते. हिंडेनबर्गचा अहवाल आल्यापासून अदानी समूहाच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण होत आहे. या ग्रुपसाठी आणखी एक वाईट बातमी आहे. अदानी ग्रीन एनर्जी आणि अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोनने जारी केलेल्या बाँड्सची स्थिती जागतिक बाजारात वाईट आहे. त्यात मोठी घसरण झाली आहे. सविस्तर जाणून घेण्याआधी हे बाँड्स म्हणजे काय हे समजून घेऊया.

बाँड्स म्हणजे काय?
एखादी व्यक्ती जेव्हा एखादी कंपनी सुरु करते तेव्हा कंपनी आपले संपूर्ण भांडवल गुंतवण्यापेक्षा कर्ज घेणे पसंत करतो. तीच कंपनी मोठी झाल्यावर आयपीओ आणि त्यानंतर एफपीओच्या माध्यमातून पैसा उभा करण्याचा प्रयत्न करते. या सर्वांव्यतिरिक्त कंपन्यांकडे बाँड्स जारी करून पैसे उभे करण्याचा पर्यायही असतो. उदाहरणार्थ, समजा मला १ हजार रुपये हवे आहेत. अशा परिस्थितीत मी ५ टक्के व्याजाने ३ वर्षांसाठी १० बाँड्स जारी केले. लोक पैसे देऊन बाँड्स विकत घेतात. त्यामुळे कंपनीचे कामही मार्गी लागतं आणि लोकांना चांगला परतावाही मिळतो.

अदानी समूहाच्या कंपन्यांच्या बाँड्समध्ये मोठी घसरण
ट्रेडिंग आकडेवारीनुसार, अदानी पोर्ट्स आणि स्पेशल इकॉनॉमिक झोनमधील ३.३७५ टक्के बाँड्स (जे जुलै २०२४ मध्ये मॅच्युअर होतील) सेकंडरी बाजारात सर्वाधिक घसरले आहेत. सेकंडरी मार्केटमध्ये कंपनीचे बाँड्स २० सेंटने घसरून ६९.७५ सेंट झाले आहेत.

अदानी ग्रीन एनर्जीचा ४.३७५ टक्के बाँड्स सप्टेंबर २०२४ मध्ये लाँच होणार होता, तो १२ सेंटने घसरून ६६.७५ सेंटझाला. मात्र, अदानी ग्रीन एनर्जीची स्थिती इतर दोन कंपन्यांच्या तुलनेत चांगली आहे. त्यात ९ सेंटची घसरण दिसून आली आहे. असे असूनही अदानी ग्रीन आणि अदानी पोर्ट्सचे बाँड्स यील्ड ३० टक्क्यांच्या जवळपास आहे. जे बाजाराच्या सरासरी परताव्याच्या पातळीपेक्षा खूप जास्त आहे. अदानी समूहाने काल म्हणजेच बुधवारी रात्री आपला एफपीओ रद्द केल्याची घोषणा केली.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Adani Group Bonds crashed in Global Market check details on 02 February 2023.

हॅशटॅग्स

#Adani Group Bonds(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x