16 April 2025 9:24 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan | एसबीआय बँकेच्या कर्जाचे दर कमी झाले, आता गृहकर्जासाठी किती व्याज द्यावे लागेल पहा Horoscope Today | 16 एप्रिल 2025, तुमच्यासाठी बुधवारचा दिवस कसा असेल? तुमचे बुधवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार बुधवार 16 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Reliance Power Share Price | पॉवर कंपनीचा पेनी स्टॉक पुन्हा तुफान तेजीत, शॉर्ट टर्म टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RPOWER Vodafone Idea Share Price | हा पेनी स्टॉक मालामाल करणार, सध्याच्या लेव्हल पासून 63 टक्के परतावा मिळेल - NSE: IDEA Yes Bank Share Price | येस बँक शेअर्समध्ये तेजी, पेनी स्टॉकची जोरदार खरेदी, तज्ज्ञांनी काय म्हटलं - NSE: YESBANK Rattan Power Share Price | अप्पर सर्किट हिट, पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, संधी सोडू नका - NSE: RTNPOWER
x

Adani Group IPO | अदानी ग्रुपच्या अजून एका कंपनीचा IPO लाँच होतोय, पहिल्याच दिवशी मालामाल करणार

Adani Group IPO

Adani Group IPO | सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. लवकरच अदानी समूह आपल्या Adani Airports या कंपनीचा IPO लाँच करणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार अदानी समूह आर्थिक वर्ष 2028 पर्यंत आपला विमानतळ व्यवसाय शेअर बाजारात सूचीबद्ध करण्याचा विचार करत आहे.

अदानी समूहाचा भाग असलेल्या अदानी एंटरप्रायझेस कंपनीने अदानी एअरपोट्स कंपनीच्या इक्विटीद्वारे 2 अब्ज ते 3 अब्ज डॉलर्स भांडवल उभारणीची योजना आखली आहे. अदानी एंटरप्रायझेस कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 0.80 टक्क्यांच्या घसरणीसह 3169 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज बुधवार दिनांक 26 जून 2024 रोजी अदानी एंटरप्रायझेस स्टॉक 0.066 टक्के घसरणीसह 3,169 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

अदानी समूहाची फ्लॅगशिप कंपनी अदानी एंटरप्रायझेसने 1994 मध्ये शेअर बाजारात सूचीबद्ध झाल्यापासून सहा स्वतंत्र व्यवसायांची स्थापना केली आहे. आता अदानी एंटरप्रायझेस कंपनी आपले व्यवसाय शेअर बाजारात सूचीबद्ध करण्याची योजना आखत आहे. या सर्व कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल 10 बिलियन डॉलर्सपेक्षा जास्त आहे.

अदानी एंटरप्रायझेस कंपनीकडे भारतातील आठ विमानतळांची मालकी आहे. यातील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ 2024 अखेरीस पूर्ण होण्याची शक्यता आहे. ब्रोकरेज फर्म Cantor Fitzgerald ने अदानी एअरपोर्ट कंपनीच्या IPO शेअर्सचे मूल्य 1,622 रुपये निश्चित केले आहे.

ब्रोकरेज फर्म Cantor Fitzgerald ने अदानी एंटरप्रायझेस कंपनीच्या शेअर्सवर ‘बाय’ रेटिंग देऊन 4,368 रुपये टार्गेट प्राइससाठी गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. Jefferies ने अदानी एंटरप्रायझेस कंपनीच्या शेअर्सवर 3,800 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे. खाजगीकरण योजनेंतर्गत नवीन विमानतळांसाठी बोली लावणे हे अदानी एंटरप्रायझेस कंपनीचे लक्ष्य असल्याचे कंपनीने म्हंटले आहे. जेफरीज आणि कॅण्टोर फिट्झगेराल्ड फर्मनी अदानी एंटरप्रायझेस कंपनीच्या स्टॉकवर कव्हरेज सुरू केले आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Adani Group IPO GMP 26 June 2024.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Adani Group IPO(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या